Friday, May 1, 2026
Homeदेसाईगंजआता देसाईगंज शहरातील नागरिकांना मिळणार आखिव पत्रिका…-काँग्रेस नेत्या डॉ.शिलू चीमुरकरांच्या चक्काजाम आंदोलनाचे...

आता देसाईगंज शहरातील नागरिकांना मिळणार आखिव पत्रिका…-काँग्रेस नेत्या डॉ.शिलू चीमुरकरांच्या चक्काजाम आंदोलनाचे फलित…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

देसाईगंज(गडचिरोली):-देसाईगंज शहराचा यथाशिघ्र सिटी सर्व्हे करून आखिव पत्रिका देण्यात यावी; या मागणीला घेऊन काँग्रेस नेत्या डाॅ.शिलु चिमुरकर यांच्या नेतृत्वात शहराच्या कुरखेडा टी-पाईन्ट जवळ आज,१८ जुलै ला चक्काजाम आंदोलन करण्यात आले असता देसाईगंज भुमिअभिलेख कार्यालयीन अधिकाऱ्यांनी येत्या तीन महिण्याच्या आत सर्व्हेक्षण करून नागरीकांना सनद व आखिव पत्रीका देण्यात येणार असल्याबाबत लेखी आश्वासन दिले आहे.काँग्रेस नेत्या डाॅ.शिलू चिमुरकरांच्या चक्काजाम आंदोलनाचे हे फलित असुन सर्व्हेक्षणाच्या कामाला गती देण्यात येणार असल्याने नागरिकांनी सुटकेचा निश्वास टाकला आहे.

देसाईगंज शहर सिटी सर्व्हेच्या कामासाठी देसाईगंज नगर पालिकेच्या वतीने सन २०१८ मध्ये जवळपास ८० टक्के रक्कम शासना जमा केली आहे.मात्र, भुमिअभिलेख कार्यालयाच्या वतिने सिटी सर्व्हेचे काम किमान जमा करण्यात आलेल्या रकमेच्या प्रमाणात करण्यात आलेले नाही.या संदर्भात दि.९ जुलै २०२४ रोजी उपविभागीय कार्यलयास निवेदन सादर करून यथाशिघ्र आखिव पत्रिका देण्यासंदर्भात कळविले होते.मात्र,देसाईगंज शहराचा सिटी सर्व्हे करून आखिव पत्रिका देण्याच्या कामाला अद्यापही सुरुवात करण्यात आली नसल्याने आज,गुरुवार दि.१८ जुलै २०२४ रोजी कुरखेडा टी-पाईन्ट जवळ चक्का जाम आंदोलन करण्याचे नियोजित करण्यात आले होते. त्या अनुषंगाने डाॅ.शिलु चिमुरकर यांच्या नेतृत्वात देसाईगंज शहरातील शेकडो नागरिक रस्त्यावर उतरले असता भुमिअभिलेख कार्यालयीन अधिकाऱ्यांने पुढाकार घेत लेखी आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आला.

लेखी आश्वासनाचे पत्र देतेवेळी जिल्हा अधिक्षक  भुमी अभिलेख गडचिरोलीच्या नंदा आंबेकर,देसाईगंज भुमिअभिलेख कार्यालयाच्या प्रभारी उपअधीक्षक एस.एन.पवार,चौकशी अधिकारी पी.एल.कुरवाडे प्रामुख्याने उपस्थित होते.आंदोलनात युवा नेते पिंकु बावणे,लिलाधर भर्रे,काँग्रेस ओबीसी विभाग तालुका अध्यक्ष कैलास वानखेडे,युवक काँग्रेस उपाध्यक्ष विजय पिल्लेवान,महादेव कुंमरे,भुमेश्वर शिंगाडे, महिला काँग्रेस तालुकाध्यक्ष पुष्पा कोहपरे,रजनी आत्राम,मालता गेडाम,विमल मेश्राम,वैष्णवी आकरे,गीता नाकाडे,पुजा ढवळे,प्रमोद दोनाडकर, नितीन घुले,भुमित मोगरे, सुनिल चिंचोळकर,अमन गुप्ता,शुभम शिवुरकर,संदीप प्रधान,मनिष मेश्राम, सरस्वती मराठे,शालुबाई कोराम,प्रेमिला लिचडे आदी शेकडो काँग्रेस कार्यकर्ते सहभागी झाले होते.दरम्यान कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये करीता चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

‘आदिशा’ प्रकल्पांतर्गत महिला बचत गटातील लाभार्थ्यांना मिळणार दोन टक्के व्याजदराने १ लाख रुपये..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-महिला बचत गटांना केवळ २ टक्के व्याजदराने फिरता निधी उपलब्ध करून देत गावपातळीवर आर्थिक साखळी निर्माण करणारा ‘आदिशा’ प्रकल्प जिल्ह्याच्या विकासात...

चक्क चोरट्यांनी खासदारांच्या शेतातील वीज मीटरसह मोटरपंप नेला चोरून.

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-जिल्ह्यात चोरीच्या घटनांनी जोर धरलेला असतांनाच आता थेट लोकप्रतिनिधीही यातून सुटलेले नाहीत.भंडारा-गोंदिया लोकसभा क्षेत्राचे खासदार डॉ.प्रशांत पडोळे यांच्या वडिलोपार्जित शेतातून अज्ञात...

तब्बल २१ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; चंद्रपूर पोलिस अधीक्षक पदाची सूत्रे आता आयुष नोपानी यांच्याकडे..

उद्रेक न्युज वृत्त :-ऐन महाराष्ट्र दिनाच्या पूर्वसंध्येला म्हणजेच आज,गुरुवार ३० एप्रिल रोजी राज्यातील तब्बल २१ आयपीएस अधिकाऱ्यांच्या(भारतीय पोलीस सेवा)बदल्या करण्यात आल्या आहेत.यात चंद्रपूरचे विद्यमान...

“आपण लोकांची कामे करण्यासाठी बसलो आहोत; अडवणूक करण्यासाठी नाही”.. -सहपालकमंत्र्यांकडून अधिकाऱ्यांची कानउघडणी..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे संपूर्ण मॅपिंग करून शासनाने स्वतः त्यांच्या दारात जाऊन गरजेनुसार योजनांचा लाभ द्यावा,अशी भूमिका कृषी राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे सहपालकमंत्री ॲड.आशिष...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!