Sunday, August 2, 2026
Homeदेसाईगंजआज राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंतीनिमित्त प्रेरणादायी शालेय कार्यक्रम संपन्न

आज राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंतीनिमित्त प्रेरणादायी शालेय कार्यक्रम संपन्न

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
देसाईगंज(गडचिरोली):-देसाईगंज शहराच्या महात्मा गांधी नगरपरिषद उच्च प्राथमिक शाळा नैनपूर येथे आज,सोमवार १२ जानेवारीला राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त शैक्षणिक, संस्कारक्षम व प्रेरणादायी कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला.प्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षीय भाषणात शाळेचे मुख्याध्यापक खेमराज तिघरे यांनी राजमाता जिजाऊ यांच्या आदर्श मातृत्वातून घडलेले छत्रपती शिवाजी महाराजांचे नेतृत्व तसेच स्वामी विवेकानंद यांच्या राष्ट्र उभारणीसाठीच्या विचारांचे महत्त्व विद्यार्थ्यांना समजावून सांगितले.कार्यक्रमाचे संचालन शिक्षक ईश्वर गाणे यांनी प्रभावी व सुबक शब्दांत केले.यावेळी शिक्षिका अपर्णा जडे व प्रियंका तलमले यांनी विद्यार्थ्यांना स्वामी विवेकानंद व राजमाता जिजाऊ यांच्या जीवनचरित्रावर सखोल मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांना आत्मविश्वास,शिस्त,कर्तव्यभावना व राष्ट्रप्रेम यांचे महत्त्व पटवून दिले.
कार्यक्रमाचे नियोजन शिक्षिका प्राची खरकटे यांनी अत्यंत शिस्तबद्ध व यशस्वीरीत्या केले.त्याचबरोबर,
पाचवीच्या विद्यार्थ्यांनी स्वामी विवेकानंद व राजमाता जिजाऊ यांच्या जीवनावर आधारित प्रभावी भाषणे सादर करून कार्यक्रमात रंगत आणली.कार्यक्रमाच्या शेवटी आभार प्रदर्शन विजय मुळे यांनी करून अध्यक्ष, मार्गदर्शक शिक्षक,विद्यार्थी तथा सर्व सहकारी शिक्षकांचे मनःपूर्वक आभार मानले तसेच अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला चालना मिळते,असे मत व्यक्त केले.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

अखेर लाचखोर विभागीय वन अधिकाऱ्यास चार दिवसांची पोलीस कोठडी..

उद्रेक न्युज वृत्त  बीड :-राज्याच्या उपमुख्यमंत्री तथा बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री सुनेत्रा पवार यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी ३१ जुलै रोजी जशी जिल्हा नियोजन समितीची बैठक पार पडली,तशीच...

आज २५० युवक-युवतींनी घेतली व्यसनमुक्तीची शपथ; गडचिरोलीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आभासी संवाद..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-भारत सरकारच्या युवा कार्यक्रम व क्रीडा मंत्रालयांतर्गत माय भारत(MY Bharat)यांच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या 'व्यसनमुक्त युवा- विकसित भारत संकल्प अभियान' अंतर्गत आज...

आता राज्यात अंमलात येणार धर्मांतर-विरोधी ‘महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य कायदा-२०२६’.. -कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यास सात वर्षापर्यंतच्या कारावासाची तरतूद..

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्याच्या विविध जिल्ह्यात अनेक नागरिकांनी स्वतःचा धर्म बदलून दुसऱ्या धर्माचे स्वीकार केल्याचे,तसेच धर्म बदलल्यानंतरही मूळ धर्मातील लाभ घेण्याचा सपाटा चालवल्याचे...

अखेर ‘त्या’ आत्महत्येचे कारण आले समोर.. – दोन सख्ख्या भावांनी धावत्या रेल्वेसमोर उडी घेतल्याचे प्रकरण..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-जिल्ह्याच्या सावनेर तालुक्यातील माळेगाव  टाऊन परिसरात गुरुवार ३० जुलै २०२६ रोजी दोन सख्ख्या भावांचा रेल्वेच्या धडकेत मृत्यू झाल्याची घटना सकाळच्या सुमारास...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!