Monday, May 18, 2026
Homeदेसाईगंजआज देसाईगंज येथे गॅस दरवाढीसह टंचाईविरोधात काँग्रेसचे आंदोलन..

आज देसाईगंज येथे गॅस दरवाढीसह टंचाईविरोधात काँग्रेसचे आंदोलन..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
देसाईगंज(गडचिरोली):-घरगुती गॅस सिलेंडरच्या दरात सातत्याने होणारी वाढ तसेच अनेक ठिकाणी निर्माण झालेल्या सिलेंडर टंचाईच्या निषेधार्थ आज,शनिवार १४ मार्च रोजी देसाईगंज येथे काँग्रेस पक्षाच्या वतीने निदर्शने करण्यात येणार आहेत.सदरचे आंदोलन हे आर मोरी विधानसभा क्षेत्राचे आमदार रामदास मसराम यांच्या नेतृत्वात दुपारी ३ वाजता फवारा चौक येथे होणार आहे.
गॅस दरवाढीमुळे सर्वसामान्य नागरिक,गृहिणी तथा गरीब कुटुंबांवर मोठा आर्थिक ताण पडत आहे.अश्यातच गॅस सिलेंडरचा पुरवठा वेळेवर होत नसल्याने नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षाच्या वतीने सरकारच्या धोरणांचा निषेध करण्यासाठी हे आंदोलन आयोजित करण्यात आले आहे.
या आंदोलनात काँग्रेसचे पदाधिकारी,कार्यकर्ते तसेच नागरिक मोठ्या संख्येने सहभागी होणार असून गॅस दरवाढ तात्काळ कमी करावी व गॅस सिलेंडरचा नियमित पुरवठा सुरू करावा,अशी मागणी करण्यात येणार आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

वऱ्हाडांवर काळाचा घाला; ट्रक आणि कंटेनरच्या भीषण अपघातात १३ जण ठार.

उद्रेक न्युज वृत्त :-साखरपुड्यासाठी निघालेल्या वऱ्हाडांवर काळाने झडप घातल्याची घटना आज, सोमवार १८ मे रोजी दुपारच्या सुमारास मुंबई-अहमदाबाद या राष्ट्रीय महामार्गावर घडली.ट्रक आणि कंटेनरच्या भीषण...

औषध विक्रेत्यांच्या बंदच्या पार्श्वभूमीवर प्रशासन सतर्क; तालुकानिहाय संपर्क क्रमांक जाहीर..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-ऑल इंडिया ऑरगनायझेशन ऑफ केमिस्ट ॲण्ड ड्रगिस्ट या संघटनेने देशभरातील ऑनलाईन इंटरनेट फार्मसीच्या विरोधात येत्या,बुधवार २० मे २०२६ रोजी संपूर्ण भारतभर...

येत्या गुरुवारी भ्रष्टाचार निर्मूलन समितीची सभा; आपली मते,तक्रारी व संबंधित बाबी थेट समितीसमोर मांडण्याची संधी..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील नागरिकांच्या भ्रष्टाचारासंदर्भातील तक्रारींची दखल घेण्यासाठी जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा भ्रष्टाचार निर्मूलन समितीची सभा येत्या,गुरुवार २१ मे २०२६ रोजी सकाळी ११...

वाढत्या महागाईचा परिणाम; आता एसटी बसच्या तिकीट दरातही वाढ होण्याचे संकेत..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीमुळे सर्वसामान्यांच्या खर्चात वाढ होत असतांना एसटी अर्थात राज्य परिवहन महामंडळाच्या तिकीट दरातही वाढ होण्याचे संकेत राज्याचे परिवहन मंत्री प्रताप...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!