Thursday, September 3, 2026
Homeदेसाईगंजदेसाईगंज नगरपरिषद पदाधिकाऱ्यांची महात्मा गांधी नगर परिषद उच्च प्राथमिक शाळेला सदिच्छा भेट..

देसाईगंज नगरपरिषद पदाधिकाऱ्यांची महात्मा गांधी नगर परिषद उच्च प्राथमिक शाळेला सदिच्छा भेट..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
देसाईगंज(गडचिरोली):-देसाईगंज शहरातील महात्मा गांधी नगर परिषद उच्च प्राथमिक शाळा,नैनपूर वार्ड येथे नगरपरिषद पदाधिकाऱ्यांची प्रेरणादायी सदिच्छा भेट उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली.यावेळी देसाईगंज नगर परिषदेचे बाळकृष्ण माडुलवार(शिक्षण सभापती), सचिन खरकाटे(पाणीपुरवठा सभापती),चैतन्यदास विधाते(आरोग्य व स्वच्छता सभापती)व विलास लोखंडे(नगरसेवक) यांनी शाळेला भेट देऊन शैक्षणिक कार्याची पाहणी केली.विशेष बाब म्हणजे,शिक्षण सभापती व इतर सभापतींनी स्वतःच्या प्रेरणेतून व स्वखर्चाने आयएसओ नामांकन प्राप्त शाळेतील शिक्षकांना प्रोत्साहन मिळावे,त्यांच्या कार्याचा गौरव व्हावा या उद्देशाने शाळेचे मुख्याध्यापक खेमराज तिघरे तसेच शिक्षकवृंद ईश्वर गहाणे,मंगेश तूपट,शिक्षिका
तृषाली सुखदेवे,अपर्णा जडे,प्रियंका तलमले,प्राची खरकाटे यांचा शाल,श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला.त्यांच्या या प्रेरणादायी उपक्रमामुळे शिक्षकांमध्ये नवीन उत्साह व उर्जा निर्माण झाली.
यावेळी शाळेला प्राप्त झालेल्या ‘आयएसओ’ नामांकनाबद्दल सर्व शिक्षकांचे अभिनंदन करण्यात आले.तसेच शाळा व्यवस्थापन समितीच्या सर्व सदस्यांचेही पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.
कार्यक्रमादरम्यान शाळेचे मुख्याध्यापक खेमराज तिघरे यांनी शैक्षणिक सत्र २०२५–२६ मध्ये शाळेत राबविण्यात आलेल्या विविध उपक्रमांचा,शैक्षणिक प्रगतीचा व विकासकामांचा सविस्तर अहवाल पॉवर पॉइंट प्रेझेंटेशनद्वारे पदाधिकाऱ्यांसमोर सादर केला. तसेच भविष्यातील शाळेचे नियोजन व शाळेसमोरील अडचणींबाबतही माहिती देण्यात आली.
यावेळी शिक्षण सभापती बाळकृष्ण माडुलवार यांनी शिक्षक व शाळा व्यवस्थापन समिती सदस्यांना संबोधित करत शाळेच्या उल्लेखनीय प्रगतीचे कौतुक केले आणि विद्यार्थ्यांच्या गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी नगरपरिषदेकडून सर्वतोपरी सहकार्य देण्याचे आश्वासन दिले.कार्यक्रमात शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष उमाकांत कवासे यांनी सर्व मान्यवरांचे आभार मानत शाळेच्या आवश्यक गरजांबाबत निवेदन सादर केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन मंगेश तूपट यांनी केले.यावेळी शाळेतील महात्मा गांधी स्काऊट पथकातील विद्यार्थ्यांनी स्काऊट पद्धतीने मान्यवरांचे स्वागत केले.तसेच विद्यार्थ्यांनी पुष्पगुच्छ देऊन नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे मनापासून स्वागत केले.
या प्रसंगी मुख्याध्यापक खेमराज तिघरे यांनी देसाईगंज परिसरातील पालक व विद्यार्थ्यांना आवाहन करत सांगितले की,आयएसओ (ISO)नामांकन प्राप्त, उत्कृष्ट व विद्यार्थी-केंद्रित शिक्षण देणाऱ्या या शाळेत आपल्या मुलांचा प्रवेश घ्यावा आणि गुणवत्तापूर्ण शिक्षणाची संधी मिळवून द्यावी.संपूर्ण कार्यक्रम प्रेरणादायी वातावरणात पार पडला आणि शाळेच्या सर्वांगीण प्रगतीसाठी नवी उर्जा देणारा ठरला.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

अपघातात शिक्षकाचा दुर्दैवी मृत्यू..!

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-नागपूरच्या बुटीबोरी परिसरातील लोकमत प्रेस ते सिडको कॉलनी मार्गावर अंधारात उभ्या असलेल्या ट्रकला दुचाकीची मागून जोरदार धडक बसल्याने झालेल्या अपघातात शिक्षकाचा उपचारादरम्यान...

देसाईगंज आदर्श महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.श्रीराम गहाणे यांना आदर्श राज्य शिक्षक पुरस्कार जाहीर.. -उच्च शिक्षण क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाची दखल..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-महाराष्ट्र शासनाच्या वतीने राज्यातील महाविद्यालयीन,विद्यापीठ, अभियांत्रिकी व कला शिक्षण क्षेत्रात समर्पित भावनेने कार्य करणाऱ्या प्राचार्य व शिक्षकांचा यथोचित गौरव करण्याच्या उद्देशाने दरवर्षी “डॉ.जे.पी.नाईक आदर्श...

आजपासून पुढील पाच दिवस पावसाळी वातावरण..

उद्रेक न्युज वृत्त :-गेल्या काही दिवसांपासून विदर्भातील अनेक जिल्ह्यात रिमझिम पाऊस व उघडीप सुरू आहे. काल बुधवारी भंडारा व गोंदिया जिल्ह्यात ५ मिमी पावसाच्या...

आज पहाटे गडचिरोली जिल्ह्यात ३.६ तीव्रतेचा भूकंप..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-गडचिरोली जिल्ह्यात आज पहाटे भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले.आज,गुरुवार ३ सप्टेंबर २०२६ रोजी पहाटे ४ वाजून ३६ मिनिटांच्या सुमारास ३.६ तीव्रतेच्या भूकंपाची...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!