Sunday, July 26, 2026
Homeआरमोरीआजी-आजोबांच्या घरी गेलेल्या अल्पवयीन मुलीला देसाईगंजच्या तरुणाने पळवले.. - आरमोरी पोलीस ठाण्यात...

आजी-आजोबांच्या घरी गेलेल्या अल्पवयीन मुलीला देसाईगंजच्या तरुणाने पळवले.. – आरमोरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
आरमोरी(गडचिरोली):-अल्पवयीन मुलींना पळवणे, अत्याचार करणे व इतर कृत्ये केल्यास  पोक्सो कायदा लागू होतो.पोक्सो कायद्यांतर्गत सर्वप्रथम ‘नो बेल ओनली फॉर जेल’ होत असते.तरीही काहीजण जे होणार ते बघितले जाणार,अशी भूमिका घेतांना दिसून येतात आणि सर्वकाही गमावून बसतात.अश्याच प्रकारे देसाईगंज शहरातील एका २५ वर्षीय तरुणाने चक्क एका १६ वर्षीय अल्पवयीन मुलीला पळवून नेल्याची घटना नुकतीच उघडकीस आली आहे.विशेष म्हणजे ती अल्पवयीन मुलगी आणि तरुण देसाईगंज शहरातीलच असल्याची माहिती आहे.प्रकरणी २५ वर्षीय अविनाश अरुण मेश्राम रा.हनुमान वॉर्ड,देसाईगंज(वडसा)याचेवर आरमोरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार,देसाईगंज शहरातील अल्पवयीन १६ वर्षीय तरुणी आरमोरी तालुक्यातील कुकडी येथे आजी-आजोबांच्या घरी मावशीच्या मुलीसह(मावस बहीण)गेली होती.अश्यातच अविनाश मेश्राम हा मंगळवार ३ जून २०२५ च्या मध्यरात्री तरुणीला भेटायला गेला.त्याला भेटून घरी परततांना मामा आल्याचे पाहताच अविनाशने तिला दुचाकीवर बसवून पळवून नेले.प्रकरणी तक्रारीवरून
आरमोरी ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास आरमोरी पोलीस ठाण्याचे पोलिस
उपनिरीक्षक प्रताप लामतुरे करीत आहेत.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

शेतातील सागवानाची ५०० झाडे जळून खाक; विद्युत वितरण कंपनीला ग्राहक आयोगाचा दणका..

उद्रेक न्युज वृत्त :-यवतमाळ जिल्ह्यातील नागरिक आपल्या न्याय हक्काचा लढा नेहमी लढतांना दिसून येतात.ग्राहक तक्रार निवारण आयोगात धाव घेत शेतकरी साहित्यातील त्रुटी असोत वा...

अखेर विद्यार्थी आंदोलनाचा मोठा विजय; केंद्रीय शिक्षणमंत्र्यांचा राजीनामा.

उद्रेक न्युज वृत्त :-गेल्या काही दिवसांपासून राजधानीतील जंतर-मंतर येथे नीट पेपरफुटी प्रकरणी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांचा आज...

नशामुक्त युवा विकसित भारत’ अभियानांतर्गत जिल्हास्तरीय विविध स्पर्धांचे आयोजन.. – विजेत्या स्पर्धकांना जिल्हास्तरीय पारितोषिकांसह राज्यस्तरीय स्पर्धेत सहभागी होण्याची संधी..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-भारत सरकारच्या युवा कार्यक्रम व क्रीडा मंत्रालयाच्या मेरा युवा भारत(MY Bharat) उपक्रमांतर्गत राबविण्यात येणाऱ्या "नशामुक्त युवा विकसित भारत" या राष्ट्रव्यापी अभियानाच्या...

‘डायल ११२’ वर खोटी माहिती देत असाल तर सावधान; कारावासासह दंडाची शिक्षा.. – खोटी माहिती दिल्याने तरुणावर गुन्हा दाखल..

उद्रेक न्युज वृत्त  गोंदिया :- 'डायल ११२' हा भारत सरकारचा आपत्कालीन हेल्पलाईन क्रमांक आहे.याद्वारे आपत्कालीन परिस्थितीत पोलिस व इतर काही महत्त्वाच्या सेवा एकाच नंबरवर जलद...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!