Sunday, July 26, 2026
Homeउद्रेक न्युज वृत्तयेत्या २३ जून पासून वाजणार शाळेची घंटा; यंदा पहिल्या वर्गापासून 'सीबीएसई पॅटर्न'...

येत्या २३ जून पासून वाजणार शाळेची घंटा; यंदा पहिल्या वर्गापासून ‘सीबीएसई पॅटर्न’ चा होणार श्रीगणेशा..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त :-येत्या २३ जून पासून शाळा सुरू होणार असून राज्याच्या विविध जिल्ह्यातील ‘१०० शाळांना भेटी देणे’ या शासनाच्या उपक्रमाच्या अनुषंगाने लोकप्रतिनिधींसह वर्ग-१ व २ च्या अधिकाऱ्यांना शाळेच्या पहिल्या दिवशी मतदारसंघातील किंवा जवळच्या एका शाळेला भेट देण्याचे सूचित करण्यात आले आहे.शाळांमधील कामकाजाचा शैक्षणिक गुणवत्तेचा तसेच इतर सोयी सुविधांचा आढावा घेण्याचे आदेश शासनाने दिले आहेत.त्यानुसार शिक्षण विभागाने लोकप्रतिनिधींच्या भेटीची यादी तयार केली आहे तसे निमंत्रण लोकप्रतिनिधींना दिले जाणार आहे. ‘१०० शाळांना भेटी देणे’ असे उपक्रमाला नाव देण्यात आले आहे.पहिल्या दिवशी लोकप्रतिनिधींनी मतदारसंघातील किंवा नजीकच्या शाळांना भेट देऊन विद्यार्थ्यांचे स्वागत,सोयीसुविधा व गुणवत्तेचा आढावा घ्यावा,असे सूचित करण्यात आले आहे.त्यातच यंदा जिल्हा परिषदेच्या शाळांतील पहिल्या वर्गापासून ‘सीबीएसई पॅटर्न'(केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ)चा श्रीगणेशा होणार आहे.यामुळे ग्रामीण भागातील मुलांना दर्जेदार शिक्षणाची संधी उपलब्ध होणार आहे.शिक्षकांनाही ‘सीबीएसई पॅटर्न’ साठी प्रशिक्षित करण्यात आले आहे.शासनाच्या नवीन शैक्षणिक धोरणानुसार जिल्हा परिषदेच्या शाळांमधेही सीबीएसई पॅटर्न राबविण्यात येणार आहे.नव्या निर्णयामुळे शैक्षणिक भेदभाव संपण्यास मोठी मदत होणार आहे.राज्य शासनाच्या नव्या शैक्षणिक धोरणानुसार यंदाच्या शैक्षणिक सत्रापासून इयत्ता पहिलीसाठी केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या अभ्यासक्रमाचा (सीबीएसई पॅटर्न) समावेश करण्यात येणार आहे.महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षण मंडळाच्या अभ्यासक्रमापेक्षा केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या अभ्यासक्रमाकडे राज्यातील विद्यार्थ्यांचा कल अधिक वाढल्याने जिल्हा परिषद शाळांची पटसंख्या कमी होऊ लागली आहे.त्यामुळे शिक्षण विभागाकडून हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे.विशेष म्हणजे,हा नवीन अभ्यासक्रम मराठी माध्यमातून शिकविला जाणार आहे.टप्प्याटप्प्याने हा अभ्यासक्रम जिल्हा परिषद शाळांमध्ये राबविण्यात येणार आहे.यावर्षी सुरुवातीला या अभ्यासक्रमाचा समावेश इयत्ता पहिलीसाठी सुरू करण्यात येणार आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

शेतातील सागवानाची ५०० झाडे जळून खाक; विद्युत वितरण कंपनीला ग्राहक आयोगाचा दणका..

उद्रेक न्युज वृत्त :-यवतमाळ जिल्ह्यातील नागरिक आपल्या न्याय हक्काचा लढा नेहमी लढतांना दिसून येतात.ग्राहक तक्रार निवारण आयोगात धाव घेत शेतकरी साहित्यातील त्रुटी असोत वा...

अखेर विद्यार्थी आंदोलनाचा मोठा विजय; केंद्रीय शिक्षणमंत्र्यांचा राजीनामा.

उद्रेक न्युज वृत्त :-गेल्या काही दिवसांपासून राजधानीतील जंतर-मंतर येथे नीट पेपरफुटी प्रकरणी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांचा आज...

नशामुक्त युवा विकसित भारत’ अभियानांतर्गत जिल्हास्तरीय विविध स्पर्धांचे आयोजन.. – विजेत्या स्पर्धकांना जिल्हास्तरीय पारितोषिकांसह राज्यस्तरीय स्पर्धेत सहभागी होण्याची संधी..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-भारत सरकारच्या युवा कार्यक्रम व क्रीडा मंत्रालयाच्या मेरा युवा भारत(MY Bharat) उपक्रमांतर्गत राबविण्यात येणाऱ्या "नशामुक्त युवा विकसित भारत" या राष्ट्रव्यापी अभियानाच्या...

‘डायल ११२’ वर खोटी माहिती देत असाल तर सावधान; कारावासासह दंडाची शिक्षा.. – खोटी माहिती दिल्याने तरुणावर गुन्हा दाखल..

उद्रेक न्युज वृत्त  गोंदिया :- 'डायल ११२' हा भारत सरकारचा आपत्कालीन हेल्पलाईन क्रमांक आहे.याद्वारे आपत्कालीन परिस्थितीत पोलिस व इतर काही महत्त्वाच्या सेवा एकाच नंबरवर जलद...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!