Saturday, April 18, 2026
Homeचंद्रपूरअल्पवयीन मुलीवर चक्क अल्पवयीन मुलानेच केला अत्याचार...

अल्पवयीन मुलीवर चक्क अल्पवयीन मुलानेच केला अत्याचार…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
चंद्रपूर :-मोबाईलचा अतिवापर त्यातच अश्लील व्हिडिओच्या आहारी जाऊन काहीजण सर्वकाही गमावून बसू लागलेत.नको त्या वाईट मार्गाने जाणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे.खरे म्हणजे मोबाईल चांगल्यासाठी आहे.मात्र त्याचा गैरवापर करून घेतला जातो आहे.अशीच घटना चंद्रपूरच्या पडोली पोलिस ठाण्याच्या हद्दीत नुकतीच उघडकीस आली आहे.अल्पवयीन मुलीवर चक्क अल्पवयीन मुलानेच अत्याचार केल्याची घटना समोर येताच समाजमन सुन्न झाले आहे.याला मोबाईल कारणीभूत असल्याची चर्चा नागरिकांमध्ये होत आहे.
घरात एकट्या असलेल्या नऊ वर्षीय अल्पवयीन मुलीवर १३ वर्षीय अल्पवयीन मुलाने अत्याचार केल्याची धक्कादायक घटना पडोली पोलिस ठाण्याच्या हद्दीत उघडकीस आली.पडोली पोलिसांनी  अल्पवयीन मुलाला ताब्यात घेऊन बालसुधारगृहात रवानगी केली आहे.पडोली एमआयडीसी परिसरात अनेक कुटुंब विटा तयार करण्यासाठी मुक्कामी राहतात.त्यांच्या कामाच्या स्थळापासून हाकेच्या अंतरावरच त्यांच्या राहण्याची घरे आहेत.शुक्रवारी आई-वडील विटा बनविण्यासाठी गेल्यानंतर एक नऊ वर्षीय अल्पवयीन मुलगी घरी एकटीच होती.ही संधी साधून १३ वर्षीय अल्पवयीन मुलगा त्या घरी जाऊन तिच्यावर अत्याचार केला.पीडित मुलीचा आवाज ऐकून तिचे आई-वडील घटनास्थळी दाखल झाले.पीडित मुलीने झालेली घटना सांगितला. त्यांनी पडोली पोलिस स्टेशन गाठून तक्रार केली. पोलिसांनी ॲट्रोसिटी,पॉक्सोअंतर्गत गुन्हा दाखल करून त्या अल्पवयीन मुलाला ताब्यात घेत त्याची बालसुधारगृहात रवानगी करण्यात आली आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

बालविवाह रोखण्यासाठी प्रशासन ॲक्शन मोडवर.. – ग्रामीण भागात बालविवाह रोखण्याची जबाबदारी ग्रामसेवक व ग्रामविकास अधिकाऱ्यांवर..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-अक्षयतृतीयेच्या मुहूर्तावर दरवर्षी बालविवाहाच्या घटना घडण्याची शक्यता लक्षात घेता  गडचिरोली जिल्हा प्रशासन व महिला व बालविकास विभाग ॲक्शन मोडवर आले आहे.या...

उष्णतेचा कहर; उद्याला नागपूर जिल्ह्यातील सर्व शाळा आणि शैक्षणिक संस्था बंद ठेवण्याचे आदेश..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-वाढत्या उष्णतेच्या लाटेचा कहर लक्षात घेता नागपूर जिल्हा प्रशासनाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. भारतीय हवामान विभागाने उद्या,शनिवार १८ एप्रिल रोजी नागपूर...

खताचा काळाबाजार भोवला; देसाईगंजच्या कृषी केंद्र संचालकावर फौजदारी गुन्हा दाखल..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-शेतकऱ्यांच्या हक्काचे अनुदानित डीएपी खत(DAP)अनधिकृतरीत्या जिल्ह्याबाहेर विकणे,खताचा काळाबाजार करणे तसेच शासकीय ई-पॉस(e-POS) प्रणालीमध्ये फेरफार केल्याप्रकरणी देसाईगंज येथील मे.नाकाडे कृषी केंद्रचे संचालक...

देसाईगंज-आरमोरी काँग्रेस कमिटीची “संघटन सृजन अभियान-पदाधिकारी बैठक” संपन्न..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-देसाईगंज शहराच्या सिंधू भवन येथे आज,शुक्रवार १७ एप्रिल रोजी तालुका काँग्रेस कमिटी देसाईगंज-आरमोरी यांच्या वतीने आयोजित “संघटन सृजन अभियान-पदाधिकारी बैठक” उत्साहात पार...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!