Sunday, September 6, 2026
Homeचंद्रपूरअल्पवयीन मुलास अश्लील व्हिडिओ दाखवणाऱ्यास बेड्या..!

अल्पवयीन मुलास अश्लील व्हिडिओ दाखवणाऱ्यास बेड्या..!

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
चंद्रपूर :-बऱ्याच कालावधीपासून एका अल्पवयीन मुलास अश्लील(पॉर्न)व्हिडिओ दाखवणाऱ्या ३० वर्षीय इसमास पालकांच्या तक्रारीवरून पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.प्रकरणी बाललैंगिक अत्याचार कायदा व पॉक्सो कायद्याच्या कलम १२ अंतर्गत गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली व आरोपीस न्यायालयात हजर केले असता,न्यायालयाने त्यास बुधवारपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.सदरची घटना दुर्गापूर पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडली असून अखिलेश विलास जाधव वय ३० वर्षे असे आरोपीचे नाव आहे.
आरोपी अखिलेश मागील एक वर्षापासून पिडीत अल्पवयीन मुलाला सतत अश्लील व्हिडिओ दाखवून त्याचे मानसिक संतुलन बिघडविण्याचे काम करायचा. आरोपी परिचयाचा असल्याने सदरची बाब कुटुंबियांच्या लक्षात आली नाही.मात्र,पीडित मुलाच्या घरचे दागिने चोरीला गेल्याने पालकांनी याबाबत मुलास विचारणा केली असता त्याने ते दागिने अखिलेशकडे दिल्याचे सांगितले व त्याबदल्यात तो अश्लील व्हिडिओ दाखवत असल्याचे पुढे आले.पालकांनी लगेच दुर्गापूर पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार नोंदवली.प्रकरणी दुर्गापूरचे पोलीस निरीक्षक संदीप काडे यांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेता गुन्हा दाखल करत आरोपीला अटक केली. प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक नरेंद्र उरकुडे करीत आहेत.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

‘विकसित भारत युवा नेतृत्व संवाद-२०२७’.. गडचिरोली जिल्ह्यातील युवकांना पंतप्रधानांसमोर नेतृत्वगुण,नवकल्पना मांडण्याची संधी..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-भारताला २०४७ पर्यंत विकसित राष्ट्र बनविण्याच्या संकल्पनेत युवाशक्तीचा सक्रिय सहभाग वाढविण्यासाठी ‘विकसित भारत युवा नेतृत्व संवाद -२०२७’ या राष्ट्रीय उपक्रमाला ‘विकसित...

पोलीस अधिकाऱ्यांच्या जाचाला कंटाळून एएसआयची आत्महत्या..

उद्रेक न्युज वृत्त  नवी मुंबई :-काही दिवसांपासून राज्यातील महाराष्ट्र पोलीस प्रशासनात खळबळ उडवून देणाऱ्या घटना उघडकीस येऊ लागल्या आहेत.मागील महिन्याच्या १६ ऑगस्टला नागपूर पोलिस आयुक्त कार्यालयातील...

आता कांद्यानेही आणले सर्वसामान्यांच्या डोळ्यात पाणी..

उद्रेक न्युज वृत्त :-बऱ्याच दिवसांपासून पांढऱ्या कांद्यानी सर्वसामान्यांच्या डोळ्यात पाणी आणलेले असतांनाच आता लाल कांद्यानेही भाव खाऊन  सर्वसामान्यांच्या डोळ्यात पाणी आणले आहे.हल्ली विविध शहरांच्या...

तलावात मासे पकडत असतांनाच पाय घसरल्याने तलावात पडला; चिमुकल्याचा तलावात बुडून मृत्यू.. -दुसऱ्या घटनेत भारतीय सैन्य दलातील जवानाचा पाण्यात बुडून मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  गोंदिया :-जिल्ह्याच्या अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील निलज गावातून एक दुर्दैवी घटना समोर आली आहे. शाळेला सुट्टी असल्याने मित्रांसोबत गाव नजीकच्या तलावात मासे पकडण्यासाठी गेलेल्या...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!