Monday, July 13, 2026
Homeदेसाईगंजदेसाईगंज नगराध्यक्ष पदासाठी वनिता नाकतोडेंचे नाव फ्रंट पेजवर..

देसाईगंज नगराध्यक्ष पदासाठी वनिता नाकतोडेंचे नाव फ्रंट पेजवर..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
देसाईगंज (गडचिरोली):-नगरपरिषद व नगरपंचायतीच्या निवडणुक प्रक्रियेचा कार्यक्रम जाहीर होताच अनेकजण मैदानात उतरल्याचे दिसून येत आहे. दोन्ही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या उमेदवारी अर्ज भरण्याच्या प्रक्रियेस काल,सोमवार १० नोव्हेंबरपासून सुरुवात झाली आहे.अश्यातच पक्षांतर्गत तिकीट मिळावी,यासाठी अनेकजण आटापिटा करतांना दिसून येतात.सर्वांनाच पक्षांकडून तिकीट जाहीर केली जाऊ शकत नसल्याने काहीजण ऐन निवडणुकीच्या तोंडावर दुसरीकडे उडी घेऊन आपले अस्तित्व कायम करण्याचा प्रयत्न करीत आहेत.सध्याच्या निवडणुकांमध्ये नगराध्यक्ष पद हे थेट जनतेमधून निवडण्यात येणार आहे. त्यातच देसाईगंज नगर परिषदेचे नगराध्यक्ष पद हे ओबीसी महिलेसाठी राखीव असल्याने अनेकजण कणखर उमेदवारांचा शोध घेऊ लागलेत.पण,उमेदवारी द्यायची तर कुणाला?असा पेच अनेक पक्षांना पडू लागला आहे.यातच सामाजिक कार्यात सक्रिय आणि लोकसंपर्कात रुजलेले व्यक्तिमत्त्व असणाऱ्या देसाईगंज शहरातील वनिता नाकतोडे यांचे नाव थेट नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारीकरीता पुढे येऊ लागले आहे.वनिता नाकतोडे या गेल्या अनेक वर्षांपासून समाजकार्यात अग्रेसर असून विशेषतः महिला सक्षमीकरण,शिक्षण आणि स्वच्छता अभियानांमध्ये त्यांनी उल्लेखनीय योगदान दिले आहे.त्यांच्या प्रामाणिक आणि जनसंपर्कशील स्वभावामुळे नागरिकांमध्ये त्यांची चांगली प्रतिमा असून स्थानिक नागरिकांकडून या नव्या इच्छुक उमेदवारास देसाईगंज शहरात मोठा पाठिंबा मिळत असल्याचे चित्र आहे.देसाईगंज नगर परिषदेतील आगामी निवडणूक विकास,सुविधा आणि पारदर्शक प्रशासन या मुद्यांवर लढली जाणार असल्याचे दिसते.वनिता नाकतोडे यांच्यासारख्या नव्या आणि कार्यक्षम उमेदवारीमुळे या निवडणुकीत नवे समीकरण घडू शकते,असा अंदाज वर्तविण्यात येत आहे.माहितीनुसार,अनेक सामाजिक संघटना आणि युवक मंडळांनी त्यांच्या इच्छुक उमेदवारीचे स्वागत करत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

केंद्रीय विद्यालयात इयत्ता पहिली ते पाचवीच्या प्रवेशासाठी अर्ज प्रक्रिया सुरू..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-गडचिरोली येथे नव्याने सुरू झालेल्या केंद्रीय विद्यालयात शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी इयत्ता १ ली ते ५ वी मधील रिक्त जागांसाठी प्रवेश...

आता मार्केटमध्ये येणार दहा किलो वजनाचा गॅस सिलेंडर..

उद्रेक न्युज वृत्त:-बऱ्याच ठिकाणी जागेचा अभाव, वजनी सिलेंडर तसेच वजनानुसार वाढणारी रक्कम सर्वसामान्यांना न झेपावणारी असते.विशेषतः लहान व्यावसायिक,हॉटेल चालक आणि रस्त्यावरील विक्रेते. यासाठी सरकारी...

वाघ दिसताच पळत सुटले; जीव वाचवण्यासाठी धावत असतांनाच बंधाऱ्यात पडले,बाप-लेकाचा दुर्दैवी मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-जिल्ह्याच्या रामटेक तालुक्यातून एक हृदयद्रावक घटना उघडकीस आली आहे.शेतावर गेलेले तिघेजण वाघ दिसताच जिकडे बनेल तिकडे धावत-पळत सुटले.पण जीव वाचवण्यासाठी बंधाऱ्यावरून...

पालकमंत्री साहेब..मक्याचे करायचे काय? पोळी खायला गहू द्या न..!

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यात जुलै महिन्यापासून शासकीय स्वस्त धान्य दुकानांतून लाभार्थ्यांना मक्याचे वितरण केले जात आहे.दर महिन्याला तांदळासोबत १० ते १५ किलो मिळणारा गहू...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!