- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
भंडारा :-जिल्ह्याच्या साकोली तालुक्यातील मोहघाटा गावातील रहिवासी असलेल्या शेतकऱ्याने प्रसिध्दी झोतात येऊन आपल्याला वन विभागाच्या वतीने हिंस्त्र प्राण्यांच्या हल्ल्यात झालेली भरपाई मिळावी, यासाठी त्याने चक्क वाघाच्या हल्ल्याचा बनाव केल्याची घटना नुकतीच उघडकीस आली आहे. मात्र,वाघाच्या नखांचे विष होऊ नये म्हणून पोटात रेबीजचे १४ इंजेक्शन घ्यावेच लागतील,असे डॉक्टरने म्हणताच शेतकऱ्याने बनाव केलेला भांडाच फुटला अन् ‘जय हिंद जय भारत’ झाले.दुधराम राजीराम मेश्राम वय ४१ वर्षे रा.मोहघाटा,ता.साकोली असे बनाव केलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे.
शेतकऱ्याने जोर लावला,पण हळूच धावला,असल्याने बनविलेल्या बनावाची आता सर्वत्र चर्चा होऊ लागली आहे.माहितीनुसार,शेतकरी दुधराम मेश्राम याने रविवारी सकाळी मोहफुले वेचण्यासाठी गेलो असता,आपल्यावर वाघाने हल्ला केल्याचा बनाव रचला.बेशुद्ध पडल्यावर शेजारच्या शेतातील शेतकऱ्यांनी घरी आणल्याचे त्याने सांगितले.दरम्यान,तो जखमी झाल्याचे कळल्याने वनरक्षक रामेश्वर भराडे यांनी दुधरामला रुग्णालयात नेले.काही वेळात वनविभागाची चमूही रुग्णालयात पोहोचली. डॉक्टरांना आणि वनविभागाच्या पथकालाही त्याने हीच कहाणी सांगितली.मात्र,त्याच्या पोटावरील जखमा पाहन सर्वांनाच शंका आली.अखेर सत्यता पडताळणीसाठी डॉक्टरांनी आणि अधिकाऱ्यांनी युक्ती केली.वाघाच्या नखांचे विष होऊ नये,म्हणून पोटात रेबीजचे १४ इंजेक्शन घ्यावेच लागतील,असे डॉक्टरांनी सांगितले,ते ऐकताच दुधरामची बीपीच वाढली.मेलो तरी चालेल,पण इंजेक्शन घेणार नाही,असे सांगून त्याने स्पष्ट नकार दिला.दुधराम खोटे बोलत असल्याचे लक्षात आल्याने शहानिशा करण्यासाठी त्याला शेतावरील कथित घटनास्थळी नेले गेले.मोफुल वेचतांना आपल्याला वाघ दिसला,असे त्याने सांगितले.मात्र,त्या मोहाच्या झाडाला फुलेच नव्हती.वाघ नेमका कुठे होता,तो कसा दिसला,किती अंतरावर होता,अशी प्रश्नांची सरबत्ती केल्यावर,आपण बेशुद्ध असल्याने काहीच आठवत नाही,अशी दिशाभूल त्याने केली.वनविभागाच्या चमूने परिसराची पाहणी केली असता,वाघाचे पगमार्क कुठेच आढळून आले नाहीत. अखेर त्याचा खोटेपणा लक्षात आल्यावर त्याला गावात परत आणण्यात आले.मला वाघ दिसला,पण त्याने मला जखमी केले नाही.मी झुडपात पडलो,असा जबाब दुधरामने दिला आहे.तथापि,दुधरामने दाखविलेल्या घटनास्थळी कुठलीही झुडपे आढळलेली नसल्याने केलेली ‘युक्ती अन् शेतकऱ्याची भक्ती’ फोल ठरली आहे.
- Advertisement -

