Friday, August 14, 2026
Homeभंडाराअचानकपणे रानडुकरांचा कळप मार्गावर आला; धाडकन दोन दुचाक्या धडकल्या.. - तिघेजण गंभीर...

अचानकपणे रानडुकरांचा कळप मार्गावर आला; धाडकन दोन दुचाक्या धडकल्या.. – तिघेजण गंभीर जखमी,तर एकजण किरकोळ जखमी..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
भंडारा :-दुचाकीने निघालेल्या गावापासून काही अंतरावरील मार्गावर अचानकपणे रानडुकरांचा कळप आडवा आल्याने झालेल्या अपघातात तिघेजण गंभीर जखमी झाले,तर एकजण किरकोळ जखमी झाल्याची घटना आज,शनिवार २ मे रोजी सकाळच्या सुमारास
साकोली तालुक्याच्या बाम्पेवाडा मार्गावर घडली. अमरदीप वलथरे वय ३१ वर्षे,मनोज जांभुळकर वय ५५ वर्षे,दीपक वलथरे वय २८ वर्षे व भजनदास बांबोर्डे वय ६५ वर्षे,सर्वजण साकोली तालुक्याच्या बाम्पेवाडा येथील रहिवासी असून जखमींना तात्काळ साकोली उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.यातील तिघांच्या डोक्याला गंभीर मार लागल्याने त्यांना पुढील उपचारासाठी भंडारा सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले,तर एका जखमीला किरकोळ दुखापत असल्याने प्राथमिक उपचारांनंतर सुट्टी देण्यात आली.जखमी दुचाकीस्वार दोन वेगवेगळ्या दुचाकीने बाम्पेवाडा येथून साकोलीकडे निघाले असता गावापासून काही अंतरावर गेल्यानंतर अचानक रानडुकरांचा कळप रस्त्यावर आला. दरम्यान,वेगात असलेल्या दोन्ही दुचाक्या थेट त्या कळपावर जाऊन धडकल्या.यात चारही जण रस्त्यावर फेकले गेले व गंभीर जखमी झाले.घटनास्थळी एमएच-४०-एम-८५५३ क्रमांकाची दुचाकी आढळून आली असून दुसऱ्या दुचाकीचा तपास सुरू आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

उद्याला सर्व ग्रामपंचायतींमध्ये पीएम आवास योजनेच्या अंतिम प्रतीक्षा यादी निश्चितीसाठी ग्रामसभा…

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-प्रधानमंत्री आवास योजना-ग्रामीण अंतर्गत Awaas+ २०२४ सर्वेक्षणातील लाभार्थ्यांची कायमस्वरूपी प्रतीक्षा यादी अंतिम करण्यासाठी जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींमध्ये उद्या,१५ ऑगस्ट २०२६ रोजी ग्रामसभा...

मादी बिबट्याच्या मृत्यूने वनविभागात खळबळ..!

उद्रेक न्युज वृत्त  प्रशांत गेडाम सिंदेवाही(चंद्रपूर):-सिंदेवाही वनपरिक्षेत्रांतर्गत येणाऱ्या नवरगाव नियत क्षेत्रातील कक्ष क्रमांक-२३४ राखीव वनामध्ये गुरुवार,१३ ऑगस्ट रोजी एक मादी बिबट मृतावस्थेत आढळून आल्याने वन विभागात...

गडचिरोलीत उभारणार ‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे मराठी भाषा विकास व संशोधन केंद्र’- मराठी भाषा मंत्री डॉ.उदय सामंत – झाडीबोली संमेलनासाठी दरवर्षी २५ लाखांचा निधी..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-मराठी भाषेचे संवर्धन,स्थानिक बोलीभाषांचे जतन-संवर्धन,संशोधन आणि साहित्यिकांना प्रोत्साहन देण्यासाठी गडचिरोली जिल्ह्यात हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाने ‘मराठी भाषा विकास व संशोधन...

घोरपडींच्या शिकार प्रकरणी चौघांना रंगेहाथ पकडले..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-जिल्ह्याच्या पवनी वनपरिक्षेत्रांतर्गत येणाऱ्या सावंगी बिटात दोन घोरपडींची शिकार करून त्यांचे मांस कापतांना चौघांना वन विभागाच्या पथकाने रंगेहाथ अटक करून घटनास्थळावरून...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!