Sunday, May 31, 2026
Homeभंडाराअखेर होणाऱ्या नवरदेव तरुणाचा आढळला मृतदेह.. - साक्षगंधाच्या कार्यक्रम दिवशीच झाला...

अखेर होणाऱ्या नवरदेव तरुणाचा आढळला मृतदेह.. – साक्षगंधाच्या कार्यक्रम दिवशीच झाला गायब..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
भंडारा :-ऐन साक्षगंधाचा कार्यक्रम होणार,त्याच दिवशी होणारा नवरदेव पहाटेच्या सुमारास गायब झाल्याने कुटुंबीयांची चिंता वाढली होती.बुधवारी ३० एप्रिलला सायंकाळच्या सुमारास त्याचे लग्न होते. अशातच होणारा नवरदेव गायब कां झाला? अश्या पेचप्रसंगात सर्वजण पडले होते.सदरची घटना भंडारा जिल्ह्याच्या तुमसर तालुक्यातील आलेसुर येथे नुकतीच उघडकीस आली होती.
माहितीनुसार,राहुल काशीराम राऊत वय २६ वर्षे
याचे बुधवारी ३० एप्रिलला सायंकाळच्या सुमारास विवाह सोहळा पार पडणार होता.तत्पूर्वी सोमवारी २८ एप्रिलला दुपारच्या सुमारास त्याचा साक्षगंधाचा कार्यक्रम होणार होता व मंगळवारी २९ एप्रिलला मंडप पूजन होते.अशातच राहुल हा २८ एप्रिलच्या पहाटे कुणालाही काहीही न सांगता घरून निघून गेला होता.कुटुंबियांच्या लक्षात येताच त्यांनी इतरत्र शोध घेतला.मात्र,त्याचा थांगपत्ताच लागलेला नव्हता. त्यामुळे कुटुंबीयांनी पोलीस ठाणे गाठून मिसिंगची तक्रार दाखल केली होती. कुटुंबीयांच्या तक्रारीवरून गोबरवाही पोलीस प्रशासन राहुलच्या शोधात होते. अशातच त्याचे प्रेत गावालगतच्या शेतातील विहिरीत आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ माजली आहे.सर्वत्र शोध सुरू असतांनाच गुरुवार १ मे रोजी सकाळी आठ वाजता गावालगत शेतामधील विहिरीत त्याचा मृतदेह आढळून आला.पोलिसांना माहिती कळविल्यावर पंचनामा करून पोलिसांनी विहिरीतून मृतदेह बाहेर काढला.त्याच्या शरीरावर कोणत्याही खुणा अथवा व्रण आढळून आले नाहीत.मृतदेहाचे शवविच्छेदन तुमसर येथे करण्यात आले.मृत्यूचे कारण अद्यापही कळलेले नसून त्याने आत्महत्या केली असावी,असा कयास बांधला जात आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

धानोरा व एटापल्ली तालुक्यात २० हजार धुररहित चुलींचे वितरण.. -दरवर्षी ४१ हजार टनांहून अधिक जळाऊ लाकडाची होणार बचत..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शन व पुढाकारातून गडचिरोली जिल्ह्यातील धानोरा व एटापल्ली या दुर्गम,आदिवासी तालुक्यांमध्ये राबविण्यात आलेल्या धुररहित चुल उपक्रमाला उल्लेखनीय...

चार दिवसांत उष्माघाताचे तब्बल १८ जण बळी..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-सध्या नवतपाचे दिवस सुरू आहेत.२५ मे २०२६ पासून सुरू झालेली सूर्याची दाहकता २ जून २०२६ पर्यंत राहणार आहे.अश्यातच भयंकर तापणाऱ्या नवतप्याने...

हाताची दोन बोटे दाखवून सेल्फी काढत असाल तर सावधान..!

उद्रेक न्युज वृत्त :-डिजिटल युगात सायबर गुन्हेगारीच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होतांना दिसून येत आहे.काही कालावधीपासून डिजिटल अरेस्टच्या माध्यमातून नागरिकांची लाखो रुपयांपासून ते कोट्यवधी रुपयांची फसवणूक...

‘जागतिक तंबाखू विरोधी दिन’ व ‘उच्चरक्तदाब दिना’ निमित्त पोलीस अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांची आरोग्य तपासणी..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :- 'जागतिक तंबाखू विरोधी दिन' आणि 'जागतिक उच्चरक्तदाब दिना'चे औचित्य साधून गडचिरोली येथे एक विशेष आरोग्य जनजागृती आणि तपासणी शिबिर उत्साहात पार...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!