Saturday, August 29, 2026
Homeभंडाराअखेर वैनगंगा नदीत उडी घेऊन आत्महत्या करणाऱ्या तरुणाचा सापडला मृतदेह…

अखेर वैनगंगा नदीत उडी घेऊन आत्महत्या करणाऱ्या तरुणाचा सापडला मृतदेह…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

भंडारा :- साकोली तालुक्यातील बांपेवाडा गावाहून भंडाऱ्यात येऊन येथील कारधा पुलावरून वैनगंगेत आत्महत्या करणाऱ्या निखिल अशोक चिरवतकर या २३ वर्षीय तरुणाचा मृतदेह अखेर २१ तासांनंतर काल,सोमवारी दुपारी वैनगंगेच्या सापडमध्ये सापडला.ज्या कारधा पुलावरून त्याने नदीत उडी घेतली होती; त्या ठिकाणापासून जवळपास एक किलोमीटर पुढे एका डोहात त्याचा मृतदेह तळाशी बुडालेल्या स्थितीत होता.

आत्महत्येची ही घटना रविवारी दुपारी अडीच वाजताच्या सुमारास घडली.घटनेची माहिती मिळताच परिवारातील तसेच पोलिस प्रशासनातील लोक घटनास्थळी दाखल झाले.रविवारी सायंकाळी उशिरापर्यंत निखिलचा मृतदेह गोताखोरांच्या मदतीने शोधण्यात आला होता परंतु संध्याकाळ झाल्याने शोधकार्य थांबविण्यात आले.सोमवारी सकाळी ९ च्या सुमारास पुन्हा शोध कार्य सुरू झाले असता सकाळी ११ वाजताच्या सुमारास वैनगंगा नदीच्या कारधा पात्रात निखिलचा मृतदेह आढळला.

गोताखोराच्या मदतीने मृतदेह बाहेर काढून शवविच्छेदनासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठवण्यात आले.त्यानंतर मृतदेह परिवारातील लोकांना सुपूर्त करण्यात आला.सोमवारी सायंकाळच्या सुमारास बाम्पेवाड येथील स्मशानभूमीत मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्याच्यामागे आई-वडील,मोठा भाऊ,एक बहीण असून, मोठा आप्तपरिवार आहे.घरातील तरुण मुलगा असा एकाकी सोडून गेल्याने चिरवतकर कुटुंबीयावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

गरोदर मातेला नेले झोळीतून; घटनेनंतर प्रशासनाला आली जाग.. -आता कोईदूळ नाल्यावरील पुलाचा प्रश्न मार्गी लागणार..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्याच्या एटापल्ली तालुक्यातील कोईदूळ गावातील रहिवासी छाया सुरेश नैताम वय २६ वर्षे यांना आज,शुक्रवार २८ ऑगस्ट रोजी पहाटेच्या सुमारास प्रसूती कळा सुरू...

सोशल मीडियावर जातीवाचक वक्तव्य करणे कराळे मास्तरला चांगलेच भोवले; अटक करून कारागृहात रवानगी..

उद्रेक न्युज वृत्त  वर्धा :-वर्ध्यातील 'फिनिक्स अकॅडमी'चे संचालक, सामाजिक कार्यकर्ते तथा सोशल मीडिया इन्फ्लुएंसर असलेले कराळे मास्तर यांना सोशल मीडियावर एका विशिष्ट समाजाविषयी जातीवाचक वक्तव्य...

आता मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींची जबाबदारी नेमकी कोणाकडे? -तसेही “सरपंच-प्रशासक” बिन पगारी अन् फुल्ल अधिकारीच..

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्य शासनाने गावगाडा हाकणाऱ्या पदाधिकाऱ्यांना मोठा दिलासा देत शनिवार २१ फेब्रुवारी २०२६ रोजी महाराष्ट्र राज्यातील ज्या ग्रामपंचायतींची मुदत संपली वा...

राज्यमंत्री ॲड.आशिष जयस्वाल यांच्या अंगरक्षकावर महिलेचा लैंगिक शोषणाचा आरोप; पोलिसांत गुन्हा दाखल..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-राज्याचे वित्त व नियोजन,कृषी,मदत व पुनर्वसन,विधि व न्याय,कामगार राज्यमंत्री तथा गडचिरोली जिल्ह्याचे सहपालकमंत्री ॲड.आशिष जयस्वाल यांच्या ३८ वर्षीय अंगरक्षकाने(पोलीस कर्मचारी)एका विवाहित...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!