Monday, July 13, 2026
Homeगडचिरोलीमोठी बातमी; रेल्वे मार्गाच्या भराव्याकरिता अवैध मुरूम उत्खनन प्रकरणी २३५ कोटी रुपयांचे...

मोठी बातमी; रेल्वे मार्गाच्या भराव्याकरिता अवैध मुरूम उत्खनन प्रकरणी २३५ कोटी रुपयांचे दंड….-गडचिरोली जिल्हा भरारी पथकाच्या सनियंत्रणात धडक कारवाई..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

गडचिरोली :- रेल्वे मार्गाच्या भराव्याकरिता अवैध मुरूम उत्खनन प्रकरणी जिल्हा भरारी पथकाच्या सनियंत्रणात मागील तीन दिवसापासून मोठ्या क्षेत्राची तांत्रिक मोजणीची कार्यवाही सुरू होती.आज सोमवारी,१७ जून रोजी ती पूर्ण झाली असून  संबंधित जेपी इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीस तब्बल २ लाख ७३ हजार ३५१ ब्रास अवैध उत्खननाकरिता २३५ कोटी ८ लाख १८ हजार ६०० रुपये दंडाची रक्कम कां आकारणी करू नये; याबाबत नोटिस बजावण्यात आली आहे.

चार दिवसांपूर्वी प्रभारी जिल्हाधिकारी विजय भाकरे यांनी गठीत केलेल्या विशेष जिल्हा भरारी पथकाचे प्रमुख तहसीलदार संजय पवार यांच्या निगराणीखाली ही कारवाई केली गेली.तहसिलदार हेमंत मोहरे यांनी दंड आकारणीच्या नोटीसा बजावल्या.सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपविभागीय अभियंता संजय भांडारकर,कनिष्ठ अभियंता इंदुरकर,शाखा अभियंता अभिजीत शिनगारे,भूमी अभिलेखचे अभिलेखापाल व्हि.एल.सांगळे व त्यांच्या चमूने अवैध उत्खननाची तांत्रिक मोजणी करून तहसीलदार गडचिरोली यांच्याकडे अहवाल सादर केला; त्यानुसार पाचपट दंड आकारणी करण्यात आली आहे.

१) अहवालानुसार खरपुंडी येथे सर्व्हे क्रमांक ५३/२/अ आणि ५४ मध्ये १३ हजार २५७ ब्रास मुरूम उत्खननाकरिता ११ कोटी ४० लाख १० हजार २०० रुपये, 

२) लांजेडा स.क्र. १४/२६ आणि २४० मध्ये ९ हजार ६९९ ब्रास करिता ८ कोटी ३४ लाख११ हजार ४०० रुपये, माडेतुकूम स.क्र.१८ मध्ये १८ हजार ३५८ ब्रास करिता १५ कोटी ७८लाख ७८ हजार ८०० रुपये,

 ३) गोगाव स.क्र.१८ मध्ये २० हजार ७७५ ब्रास करिता १७ कोटी ८६ लाख ६५ हजार रुपये,

४) अडपल्ली स.क्र.१८ मध्ये ५० हजार १७६ ब्रास करिता ४३ कोटी १५ लाख१३ हजार ६०० रुपये,

५) काटली स.क्र.१४५ आणि २७९मध्ये ५४ हजार ५७५ ब्रास करिता ४६ कोटी ९३ लाख ४५ हजार रुपये, 

६) मोहझरी स.क्र. २५, ३२,२१,९व १५ मध्ये ६२ हजार ६१७ ब्रास करिता ५३ कोटी ८५ लाख ६ हजार २०० रुपये 

७) साखरा येथे स.क्र. १०२ व १५२ मध्ये ४३ हजार ८९४ ब्रास करिता ३७ कोटी ७४ लाख ८८ हजार ४०० रुपये असे एकूण २ लाख ७३ हजार ३५१  ब्रास अवैध गौण खनिज उत्खनन प्रकरणी २३५ कोटी ८ लाख १८ हजार ६०० रुपये दंडाची गणना करण्यात आली आहे. याविषयी  तीन दिवसाच्या आत खुलासा सादर करण्याबाबत नोटीस बजावण्यात आली आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

केंद्रीय विद्यालयात इयत्ता पहिली ते पाचवीच्या प्रवेशासाठी अर्ज प्रक्रिया सुरू..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-गडचिरोली येथे नव्याने सुरू झालेल्या केंद्रीय विद्यालयात शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी इयत्ता १ ली ते ५ वी मधील रिक्त जागांसाठी प्रवेश...

आता मार्केटमध्ये येणार दहा किलो वजनाचा गॅस सिलेंडर..

उद्रेक न्युज वृत्त:-बऱ्याच ठिकाणी जागेचा अभाव, वजनी सिलेंडर तसेच वजनानुसार वाढणारी रक्कम सर्वसामान्यांना न झेपावणारी असते.विशेषतः लहान व्यावसायिक,हॉटेल चालक आणि रस्त्यावरील विक्रेते. यासाठी सरकारी...

वाघ दिसताच पळत सुटले; जीव वाचवण्यासाठी धावत असतांनाच बंधाऱ्यात पडले,बाप-लेकाचा दुर्दैवी मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-जिल्ह्याच्या रामटेक तालुक्यातून एक हृदयद्रावक घटना उघडकीस आली आहे.शेतावर गेलेले तिघेजण वाघ दिसताच जिकडे बनेल तिकडे धावत-पळत सुटले.पण जीव वाचवण्यासाठी बंधाऱ्यावरून...

पालकमंत्री साहेब..मक्याचे करायचे काय? पोळी खायला गहू द्या न..!

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यात जुलै महिन्यापासून शासकीय स्वस्त धान्य दुकानांतून लाभार्थ्यांना मक्याचे वितरण केले जात आहे.दर महिन्याला तांदळासोबत १० ते १५ किलो मिळणारा गहू...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!