उद्रेक न्युज वृत्त
देसाईगंज :- आम आदमी पक्षाच्या वतीने मागील काही दिवसांपूर्वी देसाईगंज शहरातील व स्थानिक नगर परिषद क्षेत्रातील विविध प्रभागात मोठ्या प्रमाणावर समस्यांचा डोंगर उभा येऊन ठाकला असल्याचे महानिवेदन सादर केले होते.गाढ झोपेत असलेल्या प्रशासनास जागे करून आपचे गडचिरोली जिल्हा उपाध्यक्ष प्रकाश जीवानी व आपचे पदाधिकारी,कार्यकर्ते यांनी महानिवेदनाच्या माध्यमातून समस्यांचे निराकरण करण्यासाठी पत्रकाद्वारे मागणी केली होती.आपने मागणी केलेल्या महानिवेदनाची दखल घेऊन अखेर देसाईगंज नगरपरिषद प्रशासनाने विकास कामे करण्याचा सपाटा चालवला आहे.
आपने दिलेल्या निवेदनात,नगरपरिषद क्षेत्रातील विविध प्रभागात उद्यान,नाली सफाई,नाली बांधकाम, नवीन नळ जोडणी,क्रीडांगण,विद्युत पोल,हायमाष्ट पथदिवे व इतर समस्या बाबत नगरपरिषद प्रशासनास जागे केले होते.कित्तेक वर्षांपासून केवळ पोकळ आश्वासने देण्याचे काम सुरू होते.हीच बाब प्रकाश जीवनी यांच्या लक्षात येताच झोपी गेलेल्या प्रशासनास जागे करणे गरजेचे असल्याने महा निवेदनाच्या माध्यमातून उघड केल्याने नगरपरिषद प्रशासन जागे होऊन देसाईगंज शहरातील नंन्दनवन कॉलनी व हेटी तुकुम वार्डापासुन नगर परिषदने नवीन पोलसाठी पाहणी करुण पोल लावण्याची सुरुवात केली आहे.तसेच इतरही बाबींवर लवकरात-लवकर तोडगा काढण्यासाठी प्रयत्न केले जाणार असल्याने आपच्य प्रयत्नांना यश मिळाले आहे.