Thursday, May 28, 2026
Homeभंडाराअखेर टीप्पर चालकास अटक; अवैध रेती भरलेल्या टीप्परचा पाठलाग करतांना अपघात घडल्याचे...

अखेर टीप्पर चालकास अटक; अवैध रेती भरलेल्या टीप्परचा पाठलाग करतांना अपघात घडल्याचे प्रकरण..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
भंडारा :-अवैध रेतीची वाहतूक होत असल्याची माहिती भंडाऱ्याचे उपविभागीय अधिकारी माधुरी तिखे यांना मिळताच त्यांनी एका अवैध रेतीने भरलेल्या टिप्परचा पाठलाग करतांना तिसऱ्याच व्यक्तीने बोलेरो वाहन मधोमध आणून कारवाईत अडथळा आणल्याने वळण मार्गावरील शेतात  उपविभागीय अधिकाऱ्यांचे वाहन उलटून अपघात घडल्याची घटना गुरुवार ९ ऑक्टोंबर २०२५ रोजी सकाळच्या सुमारास कारधा पोलिस ठाण्याच्या हद्दीतील चांदोरी ते पचखेडीअंतर्गत मार्गावर चांदोरी गावाजवळील स्मशानभूमी रस्त्यावर घडली होती.यात उपविभागीय अधिकारी माधुरी तिखे आणि त्यांचे पती शाहबाज शेख जखमी झाल्याने गुरुवारी सायंकाळी माधुरी तिखे यांना जिल्हा सामान्य रुग्णालयातून सुटी मिळाली,तर त्यांचे पती शाहबाज शेख यांना दुपारनंतरच सुटी झाली होती.प्रकरणी एमएच ३६ एएल २८५३ क्रमांकाच्या बोलेरो वाहन व एमएच ३६ एए ४१०६ क्रमांकाच्या टिप्पर वाहन चालकाविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या कलम १०९,१३२,३(५),३०३(२),जमीन महसूल कायद्याच्या उपकलम ४८ आणि पर्यावरण संरक्षण कायद्याच्या उपकलम ७ आणि ९ अंतर्गत पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली होती. अपघातानंतर समोरील ट्रक आणि मागील बोलेरो ही दोन्ही वाहने फरार झाली होती.तक्रार प्राप्त होताच एपिआय प्रशांत साखरे सह पोलीस पथकाने रात्रीच्या सुमारास टीप्पर चालकास खात गावातून अटक केली आहे.दीपक भुरे असे  चालकाचे नाव असून संबंधित वाहनही जप्त करण्यात आले आहे.चालकाला काल शुक्रवारी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला १२ ऑक्टोंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.मात्र,बोलेरो वाहन चालक अद्याप पोलिसांच्या हाती लागला नसल्याने सदरचे प्रकरण संशयाच्या भोवऱ्यात सापडले आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

पाच दिवसांपासून बेपत्ता असलेल्या इसमाचा शेतशिवारात आढळला मृतदेह.. – वाघाच्या अफवेने वनविभागासह पोलिस यंत्रणेची मोठी धावपळ..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-घरच्यांना दवाखान्यात जात असल्याचे सांगून गेल्या पाच दिवसांपासून बेपत्ता असलेल्या इसमाचा चक्क शेतशिवारात मृतदेह आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ माजली.पण,मृतदेहावरील खुणा पाहून...

जंगली डुकराची दुचाकीला धडक; एकाचा मृत्यू,तर एकजण गंभीर जखमी..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्हा मुख्यालयापासून अगदी हाकेच्या अंतरावर जंगली डुकराची धावत्या दुचाकीला जोरदार धडक बसल्याने दुचाकीवरील एकाचा मृत्यू झाला,तर एकजण गंभीर जखमी झाल्याची घटना...

५० हजार देऊनही २५ हजारासाठी तगादा; मंडळ अधिकारी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-एका लाचखोर मंडळ अधिकाऱ्याने  शेतजमीनीचे फेरफार करण्यासाठी तब्बल ७५ हजाराची लाच मागणी करून त्यातील ५० हजार घेऊन फेरफार करून दिले,पण उर्वरित...

अजब-गजब कारनामा..! वसतिगृहात कुलरची मागणी केली म्हणून विद्यार्थिनीला हकालपट्टीची नोटीस..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-सध्या विदर्भात तीव्र उष्णतेची लाट सुरू आहे. यामुळे जीवाची लाही-लाही होत आहे.प्रचंड उकाड्यामुळे नागरिक हैराण झाले आहेत.त्यातच,पंखे व इतर हवेच्या साधनांनी...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!