Thursday, September 3, 2026
Homeदेसाईगंज"महाराष्ट्र रत्न सन्मान सोहळा-२०२५" चोप ग्रामपंचायतीचे सरपंच नितीन लाडे आदर्श सरपंच...

“महाराष्ट्र रत्न सन्मान सोहळा-२०२५” चोप ग्रामपंचायतीचे सरपंच नितीन लाडे आदर्श सरपंच पुरस्काराने सन्मानित..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
देसाईगंज(गडचिरोली):-गडचिरोली जिल्ह्याच्या देसाईगंज तालुक्यातील चोप ग्रामपंचायतीचे सरपंच नितीन मधुकर लाडे यांना आज,शनिवार ११ ऑक्टोंबर रोजी पुण्याच्या पत्रकार भवन नवी पेठ येथे नालंदा ऑर्गनायझेशन महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने आयोजित “महाराष्ट्र रत्न सन्मान सोहळा-२०२५” अंतर्गत ग्रामपंचायत क्षेत्रातील गावासाठी केलेल्या उल्लेखनीय कार्याचा गौरव म्हणून आदर्श सरपंच  पुरस्कार प्रदान करून सपत्नीक सन्मानित करण्यात आले.
नालंदा ऑर्गनायझेशन महाराष्ट्र राज्य या संस्थेतर्फे दरवर्षी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी बजावणाऱ्यांचा “महाराष्ट्र रत्न सन्मान सोहळा” आयोजित करून सन्मानित करण्यात येते.यंदाच्या सोहळ्यास चोप ग्रामपंचायतीचे सरपंच नितीन लाडे यांची वर्णी लागली होती.सरपंच लाडे यांनी गावात विविध विकास कामे करून गावातील पाणी प्रश्न, सि.सी.रोड,नाली बांधकाम,स्मशान भूमी रोड,पाणी अडवा पाणी जिरवा अंतर्गत बंधारे,वृक्ष लागवड,पांदण रस्ते,मजगी कामे,आरोग्य शिबीरे,स्वच्छता अभियान, खुले जिम,शाळा दुरुस्ती,वर्ग खोली बांधकाम,नवीन अंगणवाडी बांधकाम,सभामंडप बांधकाम,संरक्षक भिंत बांधकाम,सोलर लाईट,सार्वजनिक शौचालये व इतर विविध विकास कामे करून ग्रामपंचायतीस स्मार्ट ग्राम(सुंदरग्राम)स्पर्धेत तालुकास्तरीय तसेच जिल्हास्तरीय प्रथम क्रमांक,संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान स्पर्धेत ‘राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्वच्छ ग्राम’ जिल्हास्तरीय प्रथम क्रमांक पुरस्कार मिळवून देण्यात मोलाचे कार्य केले.सरपंच लाडे यांनी केलेल्या उल्लेखनीय कार्याचा गौरव म्हणून आज त्यांना आदर्श सरपंच पुरस्काराने गौरविण्यात आले आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांसाठी राज्यस्तरीय स्पर्धा; उत्कृष्ट मंडळांना मिळणार पुरस्कार..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-राज्यातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या विधायक कार्याला प्रोत्साहन देण्यासाठी पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागामार्फत ‘महाराष्ट्र राज्य सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा-२०२६’ आयोजित करण्यात...

देसाईगंज पोलीस स्टेशन हद्दीतील जप्त केलेला तब्बल १० लाख ९१ हजार ३९० रुपयांचा दारुसाठा नष्ट..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-देसाईगंज पोलीस स्टेशन हद्दीतील १८५ गुन्ह्यांच्या नोंदीतुन जप्त करण्यात आलेला तब्बल १० लाख ९१ हजार ३९० रुपयांचा दारुसाठा आज,गुरुवार ३ सप्टेंबर रोजी...

अपघातात शिक्षकाचा दुर्दैवी मृत्यू..!

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-नागपूरच्या बुटीबोरी परिसरातील लोकमत प्रेस ते सिडको कॉलनी मार्गावर अंधारात उभ्या असलेल्या ट्रकला दुचाकीची मागून जोरदार धडक बसल्याने झालेल्या अपघातात शिक्षकाचा उपचारादरम्यान...

देसाईगंज आदर्श महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.श्रीराम गहाणे यांना आदर्श राज्य शिक्षक पुरस्कार जाहीर.. -उच्च शिक्षण क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाची दखल..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-महाराष्ट्र शासनाच्या वतीने राज्यातील महाविद्यालयीन,विद्यापीठ, अभियांत्रिकी व कला शिक्षण क्षेत्रात समर्पित भावनेने कार्य करणाऱ्या प्राचार्य व शिक्षकांचा यथोचित गौरव करण्याच्या उद्देशाने दरवर्षी “डॉ.जे.पी.नाईक आदर्श...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!