Thursday, September 3, 2026
Homeगोंदियाअखेर २० वर्षीय तरुणीच्या हत्येचा उलगडा; प्रियकरच निघाला मारेकरी..!

अखेर २० वर्षीय तरुणीच्या हत्येचा उलगडा; प्रियकरच निघाला मारेकरी..!

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गोंदिया :-२० वर्षीय तरुणीचे गावातीलच एका युवकासोबत सूत जुळले होते.मात्र,तरुण हा दुसऱ्या समाजातील असल्याने त्यांच्या विवाहाला दोन्ही कुटुंबीयांकडून विरोध होता.त्यामुळे दोघेही पळून गेले होते.काही दिवसांपूर्वी तरुण व तरुणी गावात परत आले होते.दोन्ही कुटुंबात चर्चा झाल्यानंतर तरुणी वडिलांच्या घरी परतली.कुटुंबीयानी तिच्यासाठी स्थळ बघितले होते. गुरुवारी ९ ऑक्टोंबरला तिला पाहण्यासाठी पाहुणे येणार होते.मात्र,अज्ञाताने तिचा गळा चिरून हत्या केल्याची धक्कादायक घटना गुरुवारी सकाळच्या सुमारास उघडकीस आली होती.आचल प्रकाश कोबळे वय २० वर्षे,रा.बोंडराणी, ता.तीरोडा,जि.गोंदिया असे हत्या झालेल्या तरुणीचे नाव आहे.तर नितेश कोडवते वय २३ वर्षे,रा.अर्जुनी, ता.तिरोडा,जि.गोंदिया असे आरोपीचे नाव असून तो सध्या फरार आहे.दवनीवाडा पोलिसांचे पथक त्याचा शोध घेत आहेत.
आचल कोबडे हिचे आरोपी नितेश सोबत प्रेमसंबंध होते. पळून आल्यानंतर घरच्यांनी समजावून तिला घरी नेले होते.त्यामुळे आरोपी नितेशच्या मनात राग होता. अश्यातच आचलच्या विवाहासाठी तिच्या कुटुंबीयांनी स्थळ पाहणे सुरू केले होते.यामुळे आरोपी भांबावून गेला होता.गुरुवारी सकाळी सव्वा सहाच्या सुमारास आरोपीने आचलला बोंडराणी जंगल परिसरात भेटण्यासाठी बोलाविले होते.दोघांमध्ये बोलणे सुरू असतांनाच आरोपी नितेशने रागाच्या भरात धारदार शस्त्राने आचलच्या गळ्यावर व हातावर वार करून हत्या केली.हत्या प्रकरणी दवनीवाडा पोलिसांनी भारतीय न्याय संहिता कलम १०३(१) नुसार गुन्हा दाखल केला असून आरोपीचा शोध घेणे सुरू आहे.प्रकरणाचा तपास पीएसआय वैशाली ढाले करीत आहेत.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

आज ११ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या व नियुक्त्या..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-राज्य सरकारने आज,गुरुवार ३ सप्टेंबर २०२६ रोजी तब्बल ११ सनदी अधिकाऱ्यांच्या (आयएएस) बदल्या व नियुक्त्या केल्या आहेत.यात भारतीय प्रशासकीय सेवेतील जिल्हा...

सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांसाठी राज्यस्तरीय स्पर्धा; उत्कृष्ट मंडळांना मिळणार पुरस्कार..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-राज्यातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या विधायक कार्याला प्रोत्साहन देण्यासाठी पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागामार्फत ‘महाराष्ट्र राज्य सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा-२०२६’ आयोजित करण्यात...

देसाईगंज पोलीस स्टेशन हद्दीतील जप्त केलेला तब्बल १० लाख ९१ हजार ३९० रुपयांचा दारुसाठा नष्ट..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-देसाईगंज पोलीस स्टेशन हद्दीतील १८५ गुन्ह्यांच्या नोंदीतुन जप्त करण्यात आलेला तब्बल १० लाख ९१ हजार ३९० रुपयांचा दारुसाठा आज,गुरुवार ३ सप्टेंबर रोजी...

अपघातात शिक्षकाचा दुर्दैवी मृत्यू..!

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-नागपूरच्या बुटीबोरी परिसरातील लोकमत प्रेस ते सिडको कॉलनी मार्गावर अंधारात उभ्या असलेल्या ट्रकला दुचाकीची मागून जोरदार धडक बसल्याने झालेल्या अपघातात शिक्षकाचा उपचारादरम्यान...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!