- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
भंडारा :-जिल्ह्याच्या साकोली शहरातील श्याम हॉस्पिटल या खासगी रुग्णालयात उपचारासाठी गेलेल्या अल्पवयीन मुलीशी गैरवर्तन केल्या प्रकरणी पीडित मुलीच्या आईने पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केल्याने प्रकरणास वाचा फुटली.प्रकरणी ४५ वर्षीय आरोपी डॉक्टर देवेश अग्रवाल रा.साकोली (शहर) याच्याविरुद्ध भारतीय न्यायसंहिता २०२३ अंतर्गत कलम ६४(२)(१),६५(१) तसेच पोस्को(POSCO) कायदा व अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला.गुन्हा दाखल होताच डॉक्टर फरार झाला होता.घटनेमुळे साकोली शहरात संताप व्यक्त करून विविध संघटनांनी घटनेचा तीव्र निषेध नोंदवून आरोपी डॉक्टरला तात्काळ अटक करून कठोरात कठोर कारवाईची मागणी केली होती.त्यानुसार साकोली पोलिसांनी आरोपीचा सर्वत्र शोध घेतला.परंतु त्याचा थांगपत्ता लागलेला नसल्याने भंडारा जिल्हा पोलिस अधीक्षक यांनी दखल घेत आरोपी डॉक्टरच्या शोधासाठी लुक आउट सर्क्युलर जारी केला होता.
त्यातच देशभरातील सर्व पोलिस ठाण्यांना फरार डॉक्टरचा शोध घेण्यासाठी पत्र पाठविण्यात आले होते.आरोपीस मदत केल्याच्या आरोपाखाली त्याचे भाऊ भरत अग्रवाल आणि जितेश अग्रवाल यांच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला असून ते देखील सुरुवातीला पसार होते.आरोपी पसार झाल्यानंतर जिल्हा पोलिस प्रशासनाने सात विशेष पथकांची स्थापना करून गोंदिया,अमरावती, पुणे, नागपूर,मुंबई ते हैदराबादपर्यंत शोधमोहीम राबवली. डॉक्टरचे सर्व बँकेचे अकाऊंट फ्रिज करण्यात आले होते.परंतु फरार डॉक्टरचा शोध लागत नव्हता.सर्व मंत्र हरपल्याचे लक्षात येताच आरोपी फरार डॉक्टरने स्वतःहून दोन दिवसांपूर्वी म्हणजेच सोमवारी भंडारा न्यायालयात गुडघे टेकले.डॉक्टर देवेश अग्रवाल याने बुधवार ९ जुलै २०२५ रोजी एक तरुणी तिच्या आईसोबत देवेश अग्रवाल याच्या श्याम हॉस्पिटलमध्ये सोनोग्राफी तपासणीसाठी गेली असता तिच्या आईला व नर्सला बाहेर ठेवून सुमारे अर्धा तास त्याने तिच्याशी अश्लील वर्तवणूक केली होती. सोनोग्राफीनंतर रुग्णालयाच्या बाहेर आल्यानंतर पीडित मुलीने आपल्या आईला झालेल्या प्रकाराची माहिती दिली. त्यानंतर घरी परतल्यावर मुलीने घडलेला प्रकार वडिलांनाही सांगितला.डॉक्टर इतक्यावरच थांबला नाही तर मुलीला संपर्क क्रमांक मागितला व याबाबत कोणालाही सांगू नये,असेही बजावले.तसेच यापूर्वीही इंस्टाग्रामवरून डॉक्टरकडून पीडितेला फ्रेंड रिक्वेस्ट आल्याचा दावा करण्यात आला आहे.तक्रार होताच डॉक्टरने पलायन केले.दरम्यानच्या काळात त्याने न्यायालयात जामिनासाठी अर्ज दाखल केला होता.मात्र,न्यायालयाने त्याचा जामीन अर्ज फेटाळला होता.
- Advertisement -

