Tuesday, June 23, 2026
Homeभंडारा५० हजारांच्या बंडल मध्ये सापडली ५०० ची नकली नोट…

५० हजारांच्या बंडल मध्ये सापडली ५०० ची नकली नोट…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

भंडारा :- तालुक्यातील मानेगाव (बाजार) येथील विदर्भ कोकण ग्रामीण बँकेच्या शाखेतून बुधवारी बोरगाव बुज.येथील शेतकरी भाऊराव नत्थु वाघमारे यांनी ५० हजारांची नगद राशी काढली आणि पीकविम्याचे कर्ज भरण्यासाठी इलाहाबाद बँकेत गेले. यावेळी एक ५०० रुपयांची नोट नकली असल्याचे व्यवस्थापकाने सांगितले.त्यामुळे शेतकऱ्याला धक्काच बसला.

बोरगाव बुज.येथील शेतकरी भाऊराव वाघमारे यांचेकडे इलाहाबाद बँकेचे पीकविमा कर्ज होते. त्यासाठी त्यांनी मानेगावच्या विदर्भ कोकण ग्रामीण बँकेतून पन्नास हजार रुपये काढले.नोटाचे बंडल बांधले असल्यामुळे नकली नोटाची खात्री न करता भंडारा येथील इलाहाबाद बँकेत कर्ज भरण्यासाठी गेले असता नोट मोजण्याच्या मशीनमधून 8VH421965 या क्रमांकाची एक पाचशेची नोट बाहेर फेकण्यात आली.त्यामुळे मॅनेजर यांनी ही नकली नोट असल्याचे खात्री करून नोटेवर काळ्या पेनाच्या शाईने क्रॉस करून नोट स्वतःकडे जमा करून घेतली.त्यामुळे शेतकऱ्याला धक्का बसला असून विनाकारण पाचशे रुपयांचे आर्थिक नुकसान सहन करावे लागले.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

गॅस सिलेंडर घ्यायचा की मुलांच्या शाळेची फी भरायची?

उद्रेक न्युज वृत्त :-सिलिंडरच्या वाढत्या किमतींमुळे ग्रामीण भागातील अनेक कुटुंबांनी गॅस वापरणे बंद करून पुन्हा एकदा पारंपरिक चुलीकडे वळण्यास सुरुवात केली आहे.सिलेंडर घ्यायचा की...

महाराष्ट्र विधान परिषद निवडणूक-१७ जागांचा निकाल जाहीर..

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्यातील १७ विधान परिषदेच्या जागांपैकी ६ जागांवर महायुतीने आधीच बिनविरोध विजय मिळवला.अश्यातच आज,सोमवार २२ जून रोजी ११ स्थानिक स्वराज्य संस्था...

राज्यात ३०० कोटी वृक्ष लागवडीसाठी राज्य शासनाची महत्त्वाकांक्षी मोहिम.. – गडचिरोलीत वृक्ष लागवडयोग्य जमिनीची प्रत्यक्ष पडताळणी करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-राज्यात ३०० कोटी वृक्ष लागवडीसाठी राज्य शासनाने महत्त्वाकांक्षी मोहिम हाती घेतली आहे.या मोहिमेअंतर्गत गडचिरोली जिल्ह्यात व्यापक वृक्षारोपणासाठी उपलब्ध शासकीय जमिनींची प्रत्यक्ष...

देसाईगंज पोलिसांची धडक कारवाई; दारु तस्कराच्या आवळल्या मुसक्या.. – सहा लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-देसाईगंज तालुक्यातील दारु विक्रिवर प्रतिबंध लावण्यासाठी देसाईगंज पोलिसांनी धडक मोहिम हाती घेतली असुन एका दारु तस्कराच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश आले आहे....

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!