- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
चंद्रपूर :-राज्य सरकार सध्या मोठ्या आर्थिक संकटातून जात आहे.सरकारी तिजोरी रिकामी झाली आहे.राज्याची आर्थिक स्थिती सुधारल्यानंतर, राज्याच्या कृषीमंत्र्यांना शेतकऱ्यांचे कर्ज माफ करण्याबद्दल बोलावे लागत आहे.राज्याची आर्थिक स्थिती कधी सुधारेल आणि शेतकऱ्यांना कर्जमाफी कधी मिळेल,असा प्रश्न वडेट्टीवार यांनी काल,शुक्रवारी पत्रपरिषद घेत उपस्थित केला.
लाडकी बहीण योजनेच्या २८ लाख ७२ हजार लाभार्थी महिलांची नावे आता या योजनेतून वगळण्यात आली आहेत.या योजनेचा लाभ घेण्यासाठी सरकारने महिलांवर कठोर नियम आणि अटी लादण्यास सुरुवात केली आहे.येत्या काळात या योजनेतून ५० टक्के लाभार्थी महिलांची नावे वगळली जातील हे आता निश्चित झाले आहे.सत्ताधारी महायुतीतील घटक पक्षांमध्ये सुरू असलेल्या संघर्षात,राज्य चुकीच्या दिशेने जात आहे,राज्यात गुन्हेगारी वाढत असून सरकारची संपूर्ण शक्ती गुन्हेगारांना संरक्षण देण्यात खर्च होत आहे,असाही आरोप माजी विरोधी पक्षनेते आमदार विजय वडेट्टीवार यांनी काल,शुक्रवारी चंद्रपुरात झालेल्या पत्रपरिषदेत केला आहे.राज्यात गुन्हेगारी घटनांमध्ये प्रचंड वाढ झाली आहे.वाढत्या गुन्ह्यांना आळा घालण्यात सरकार अपयशी ठरत आहे.राज्यात महिलांवरील,विशेषतः अल्पवयीन महिलांवरील अत्याचाराच्या घटना वाढत आहेत.सरकार गुन्हेगारांवर कारवाई करण्यास टाळाटाळ करत आहे. बीड जिल्ह्यात घडलेल्या घटनेचे ठोस पुरावे असूनही, या प्रकरणात रोख असलेल्या मंत्र्याला पदावरून हटवत नाही; असेही ते म्हणाले.
- Advertisement -

