Sunday, July 12, 2026
Homeचंद्रपूर१९ वर्षीय विद्यार्थिनी प्रियकरासाठी गेली आसाम राज्यात.. - इंन्स्टाग्राम,फेसबुक,स्नॅपचॅट आयडीवरून आलेल्या अनोळखी...

१९ वर्षीय विद्यार्थिनी प्रियकरासाठी गेली आसाम राज्यात.. – इंन्स्टाग्राम,फेसबुक,स्नॅपचॅट आयडीवरून आलेल्या अनोळखी फेंन्डशिपचा स्वीकार करू नये..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
चंद्रपूर :-मोबाइलवरून ऑनलाइन चॅटींग करतांना अनोळखी युवकाचे फ्रेंड रिक्वेस्ट स्वीकारल्याने चंद्रपूर जिल्ह्याच्या मूल शहरातील एका विद्यार्थिनीला चांगलेच महागात पडले असल्याची घटना काल, बुधवारी २ एप्रिलला उघडकीस आली.विविध आमिष देऊन ब्लॅकमेल करणे,आत्महत्या करण्याची व छायाचित्र व्हायरल करण्याची धमकी दिल्याने सदरची विद्यार्थिनी घरच्यांना न सांगताच त्याला भेटायला थेट आसाम येथे गेली होती.पोलिसांच्या सतर्कतेने तिला परत आणून कुटुंबाकडे स्वाधीन करण्यात आले.
मूल शहरातील एका महाविद्यालयात बी.ए.प्रथम वर्षाला शिकणारी १८ वर्षांची युवती १९ मार्च २०२५ रोजी महाविद्यालयात जाते,असे घरी सांगून बाहेर निघाली.मात्र,रात्र होऊनही ती परत आली नाही. त्यामुळे कुटुंबीयांनी मुलगी हरविल्याची तक्रार मूल ठाण्यात केली.परिविक्षाधीन पोलिस उपअधीक्षक तथा प्रभारी ठाणेदार प्रमोद चौगुले यांनी प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन लगेच शोध पथक तयार केले. या पथकात सहाय्यक पोलिस निरीक्षक सुबोध वंजारी, पोलिस उपनिरीक्षक वर्षा नैताम,भोजराज मुंडरे, संदीप चौधरी आदींचा समावेश होता.या पथकाने मयुरीच्या मोबाइल क्रमांकाचे लोकेशन सायबर सेलकडून मिळविले,तेव्हा तिचे लोकेशन आसाम राज्यातील कचर जिल्ह्यात आढळून आले.
दरम्यान,ठाणेदार चौगुले यांनी ही माहिती पोलिस अधीक्षक मुमक्का सुदर्शन यांना दिली.त्यांच्या परवानगीनंतर पोलिसांनी आसाम राज्यातील कचर पोलिस अधीक्षकांशी संपर्क साधला.दुसऱ्या दिवशी मूलचे शोध पथक आसाम राज्यात रवाना झाले.
मूल पोलिसांनी आसाम पोलिसांना मयुरीचे मोबाइल लोकेशन व छायाचित्रे पाठवून ताब्यात घेण्याबाबत कळविले.दोन दिवसांनी हे पथक आसामच्या कच्चर जिल्ह्यात पोहोचल्यानंतर पोलिस अधीक्षक माहत्ता व अप्पर पोलिस अधीक्षक रंजित पॉल यांची भेट घेतली. त्यांच्या मार्गदर्शनात उदरबौंड पोलिस ठाण्याचे प्रभारी सी-इंम-सिम्स-तिमुंग यांच्या मदतीने मयुरीला ताब्यात घेतले.सदरची युवती मूल येथे परत आल्यानंतर प्रभारी ठाणेदार प्रमोद चौगुले यांच्या मार्गदर्शनात कुटुंबाकडे स्वाधीन केले.आरोपी युवकाने आत्महत्येची धमकी दिल्याने घाबरून आसामला गेल्याची कबुली तिने पोलिसांकडे दिली.युवक व युवती तसेच विद्यार्थ्यांनी इंन्स्टाग्राम,फेसबुक,स्नॅपचॅट आयडीवरून आलेल्या अनोळखी फेंन्डशिपचा स्वीकार करू नये,शंका आल्यास तत्काळ आपल्या कुटुंबीयांशी व पोलिसांना याबाबत माहिती द्यावी.पालकांनी आपली मुले सोशल मीडियावर काय करतात,याकडे लक्ष ठेवण्याची गरज आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

दोन दुचाक्या एकमेकींना धडकल्या; एकाचा घटनास्थळीच मृत्यू, तर एकजण गंभीर जखमी..

उद्रेक न्युज वृत्त  कुरखेडा(गडचिरोली):-दोन दुचाक्या समोरासमोर एकमेकींना धडकून घडलेल्या अपघातात एका दुचाकीस्वाराचा घटनास्थळावरच मृत्यू झाला,तर एकजण गंभीर जखमी झाल्याची घटना आज,शनिवार ११ जुलै रोजी सायंकाळी सात...

दोन महिला उपजिल्हाधिकाऱ्यांना दणका; निलंबनासह विभागीय चौकशीचे आदेश..

उद्रेक न्युज वृत्त :-शासकीय कार्यालयात वारंवार गैरहजर राहणे,परवानगीशिवाय मुख्यालय सोडणे, आढावा बैठकांना अनुपस्थित राहणे,रजेचे अर्ज विहित नमुन्यात व वेळेत सादर न करणे,वरिष्ठांच्या आदेशांची अवहेलना...

देसाईगंजच्या विहीरगाव(पोटगाव)येथील ‘त्या’ मातेने रुग्णवाहिकेतच दिला गोंडस मुलीला जन्म..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-देसाईगंज तालुक्याच्या विहीरगाव(पोटगाव)येथील रहिवासी स्वाती चांगदेव नेवारे ह्या माहेरी बाळंतपणासाठी गेल्या असता  आरोग्य केंद्रातून रुग्णवाहिकेद्वारे गोंदियाला रेफर करत असतांनाच काही अंतरावरील मार्गावर...

कुरुडच्या प्राथमिक आरोग्य केंद्रास आरोग्य सेवेचे आयुक्त तथा राष्ट्रीय आरोग्य अभियानाच्या संचालकांची भेट..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील आरोग्य विभागाचे शासन स्तरावर प्रलंबित असलेले प्रस्ताव तातडीने मार्गी लावण्यात येतील,अशी ग्वाही आरोग्य सेवेचे आयुक्त तथा राष्ट्रीय आरोग्य अभियानाचे संचालक...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!