Saturday, May 2, 2026
Homeचंद्रपूरसावधान..! शैक्षणिक कागदपत्रे हरवल्यास दुर्लक्ष करू नका..! - शैक्षणिक कागदपत्रे हरवलेल्या व्यक्तीच्या...

सावधान..! शैक्षणिक कागदपत्रे हरवल्यास दुर्लक्ष करू नका..! – शैक्षणिक कागदपत्रे हरवलेल्या व्यक्तीच्या नावावर शिवाजी ट्रेडिंग नावाची कंपनी.. – आयकर विभागाची कोट्यवधी रुपयांची नोटीस..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
चंद्रपूर :-एखादेवेळी प्रवास करतांना वा इतर कारणांमुळे शैक्षणिक कागदपत्रे म्हणजेच दस्तऐवज हरवल्याच्या अनेक घटना आपण बघितल्या आहेत.बहुदा काहीजण शैक्षणिक कागदपत्रे हरवल्यास दुर्लक्ष करून ‘जाऊ द्या.!’ परत पुन्हा विद्यापीठात जाऊन वा इतर कार्यालयांतून कागदपत्रे काढून घेऊ,असे करीत असतात.मात्र,असे करणे म्हणजे फसवणूक करणाऱ्यांना आमंत्रण देणे ठरू शकते व तश्याच प्रकारचा प्रकार चंद्रपूर जिल्ह्याच्या गोंडपिंपरी तालुक्यातील एका तरुणाच्या बाबतीत नुकताच उघडकीस आला आहे.तरुणाचे काही वर्षांपूर्वी शैक्षणिक कागदपत्रांसह पॅन कार्ड,आधारकार्ड व ओळखपत्रही हरवले होते.त्यानुसार तरुणाने पोलिसांत तक्रारही दाखल केली.पण,सगळे सुरळीत सुरू असतांनाच धाडकन मार्च २०२५ व हल्ली सुरू असलेल्या जून २०२५ मध्ये अचानकपणे आयकर विभागाची थकीत रक्कम म्हणून चक्क १५ कोटी ४८ लाख रुपये भरणा करण्याची नोटीस बजावण्यात आल्याने तरुणाने डोळेच वटारले व आलेल्या नोटीसाकडे डोळे फाडून बघू लागला.हा सर्व प्रकार घडलेल्या तरुणाचे नाव दिवाकर कुकुडकर वय ३७ वर्षे असे असून तो चंद्रपूर जिल्ह्याच्या गोंडपिंपरी तालुक्यातील धाबा गावातील रहिवासी आहे.विशेष बाब म्हणजे,दिवाकरला वर्ष २०२२-२३ मध्ये  जीएसटीची नोटीस मिळाली होती.पण,त्यावेळी जीएसटी विभागाने पडताळणी करून यात तरुणाचा सहभाग नसल्याचे स्पष्ट केले होते.त्यानुसार जीएसटी विभागाकडून फेक जीएसटी म्हणून त्यावेळी नोंद करण्यात आली होती.मात्र,आयकर विभागाची कोट्यवधी रुपयांची नोटीस मिळताच दिवाकरने आयकर विभागात जाऊन खरी आपबिती सांगितली असता पडताळणी अंती दिवाकरच्या नावावर शिवाजी ट्रेडिंग नावाची कंपनी दाखवण्यात आली असून त्याच्या नावे जीएसटी नोंदणी पण करण्यात आल्याची माहिती आयकर विभागाकडून देण्यात आली.त्यानुसार सर्वात मोठा हादरा बसलेल्या दिवाकरने पोलिस अधीक्षकांची भेट घेऊन तक्रार दिली आहे.पण,दुसऱ्याने केलेली करणी दिवाकरच्या माथी पडलेली असल्याने आपले निर्दोषत्व सिद्ध करण्यासाठी दिवाकरचा श्रम,पैसा आणि वेळ वाया जात आहे.त्यामुळे शैक्षणिक कागदपत्रे हरवल्यास दुर्लक्ष करू नका.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

अचानकपणे रानडुकरांचा कळप मार्गावर आला; धाडकन दोन दुचाक्या धडकल्या.. – तिघेजण गंभीर जखमी,तर एकजण किरकोळ जखमी..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-दुचाकीने निघालेल्या गावापासून काही अंतरावरील मार्गावर अचानकपणे रानडुकरांचा कळप आडवा आल्याने झालेल्या अपघातात तिघेजण गंभीर जखमी झाले,तर एकजण किरकोळ जखमी झाल्याची...

सौर विद्युत कुंपण योजना ही शेतकऱ्यांच्या हिताचीच; उधळपट्टीचे आरोप निराधार- कृषी विभागाचे स्पष्टीकरण

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्हा खनिज प्रतिष्ठान निधीतून राबविण्यात येत असलेल्या सौर विद्युत कुंपण योजनेबाबत प्रसिद्ध झालेल्या बातम्यांतील आरोप वस्तुस्थितीला धरून नसून दिशाभूल करणारे आहेत.ही...

कोंढाळा येथे दोन दिवसांपासून बिबट्याची दहशत; दोन शेळ्यांचा पाडला फडशा..

उद्रेक न्युज वृत्त  कोंढाळा(गडचिरोली):-गेल्या दोन दिवसांपासून बिबट्याने धुमाकूळ घालत एकाच दिवशी दोन शेळ्यांचा फडशा पाडून दहशत माजवली आहे.बिबट्या एवढ्यावरच थांबला नाही,तर परत दुसऱ्या दिवशीही शिकारीच्या...

लाडक्या बहिणींना मोठा झटका; लाखो महिला अपात्र..

उद्रेक न्युज वृत्त :-राज्यातील अनेक कुटुंबांसाठी आधार देणारी व महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणाला चालना देणारी महाराष्ट्र राज्यातील महायुती सरकारने जुलै-२०२४ पासून सुरू केलेली 'मुख्यमंत्री-माझी लाडकी...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!