- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
देसाईगंज(गडचिरोली):-सध्या स्थितीत देसाईगंज
तालुक्याच्या कोंढाळा जंगल परिसरात वाघांचा संचार आहे.काही दिवसांपूर्वी तीन नर वाघांसह एक मादी वाघ ट्रॅप कॅमेराबद्ध झालेला होता.त्यानंतर वन विभागाच्या वतीने नागरिकांना सतर्क करण्यात आलेले होते.यापैकीच एक वाघ शुक्रवार,३ जानेवारी रोजी दुपारी फरी गावाच्या कक्ष क्रमांक-८५३ मध्ये तलावालगतच्या रस्त्यावर दिसून आला.यामुळे नागरिकांमध्ये भीती निर्माण झाली आहे.
वडसा वनपरिक्षेत्रांतर्गत येणाऱ्या शिवराजपूर ते फरीदरम्यान कक्ष क्रमांक-८५३ मध्ये कुरुड फाटा ते किन्हाळा मुख्य मार्गाला फरी गावाला लागून असलेल्या ह्या कक्षात हा वाघ रस्त्याच्या कडेला बसून असल्याचे नागरिकांनी शुक्रवारी पाहिले.कोंढाळा जंगल परिसरात तीन वाघ व एक मादी वाघ वनविभागाने लावलेल्या टॅप कॅमेरात कैद झाले होते. उसेगाव जंगल परिसरात अनेकदा हा वाघ आढळून आला होता.मात्र,शुक्रवारी सदर वाघ शिवराजपूर ते फरी रस्त्यावर दिसून आल्याने भीती निर्माण झाली आहे.फरी परिसरातील कक्ष क्रमांक-८५३ मध्ये ट्रॅप कॅमेरा लावण्यात आला आहे.वाघाच्या हालचालींवर वनविभागाचे लक्ष आहे.फरी,शिवराजपूर,कोकडी आदी गावांमध्ये दवंडी दिलेली आहे.नागरिकांनी शेतशिवारात,जंगलात एकटे जाऊ नये; असे आवाहन वनविभागाने केले आहे.
- Advertisement -

