- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
भंडारा :-शहरांपासून ते आता ग्रामीण भागातही गुपचुप मिळू लागलेत.लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत लोकं मोठ्या आवडीने गुपचुप खातात.पण मिळणारे गुपचुप हे पुरेशी स्वच्छता किंवा खाण्याच्या दृष्टीने योग्य आहेत की नाहीत,हे कुणीही लक्ष देत नसल्याने एखादेवेळी अनुचित प्रकार घडत असतात.असाच प्रकार भंडारा जिल्ह्याच्या लाखनी शहरातील गांधी शाळेसमोरील फुटपाथवर असलेल्या गुपचुप ठेल्यावर नुकताच घडला.एका ठेल्यावरून गुपचुपची चव घेणे नागरिकांना चांगलेच महागात पडले आहे.गुपचुप खाल्ल्यानंतर सुमारे १० ते १२ जणांना उलटी,चक्कर व पोटदुखीचा त्रास जाणवू लागल्याने सर्वांची घाबरगुंडी झाली आणि विषबाधा झाल्याचे स्पष्ट झाले आहे.त्यामुळे सर्वजण उपचारासाठी डॉ.चंद्रशेखर निंबार्ते यांच्या खासगी रुग्णालयात दाखल झाले. डॉ.निंबार्ते यांनी तातडीने उपचार सुरू करून सर्व रुग्णांची प्रकृती स्थिर केली.सर्व रुग्णांची प्रकृती धोक्याबाहेर आहे.दरम्यान,ही घटना समजताच संबंधित गुपचुप विक्रेता घटनास्थळावरून पसार झाला.उघड्यावर पदार्थ विकणाऱ्या दुकानात स्वच्छतेचा अभाव असल्याने अशा घटना घडतात. अस्वच्छ खाद्य पदार्थापासून नागरिकांनी दूर राहावे. पावसाळा व उन्हाळ्यात अशा विषबाधेचा धोका अधिक वाढतो.त्यामुळे नागरिकांनी सतर्कता बाळगणे गरजेचे झाले आहे.
- Advertisement -

