Saturday, May 30, 2026
Homeचंद्रपूरसामूहिक वनहक्क समित्यांची रोजगार हमी योजनेच्या पोर्टलवर नोंदणी 

सामूहिक वनहक्क समित्यांची रोजगार हमी योजनेच्या पोर्टलवर नोंदणी 

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त

चंद्रपूर :- महाराष्ट्र शासनाने ३० नोव्हेंबर २०२१ रोजी शासन निर्णय निर्गमित करून सामूहिक वनहक्क प्राप्त ग्रामसभांना रोजगार हमी योजनेंतर्गत कामे करण्यासाठी अंमलबजावणी यंत्रणा मान्यतेची घोषणा केली.मात्र या शासन निर्णयानुसार कारवाई करण्यासाठी चंद्रपूर जिल्ह्यात फक्त नागभीड तालुक्यातील ग्रामसभा कोरंबी,कसरला,सावर्ला,हुमा, खडकी,मांगरुड,खरबी,सारंगड,धामणगाव चक व वासाला मक्ता या ग्रामसभांनी रोजगार हमी योजनेच्या पोर्टलवर ग्रामसभेची नोंदणी करावी; यासाठी जिल्हा व विभागीय आयुक्तांकडे प्रस्ताव पाठवले होते.मात्र बरेच प्रयत्नानंतर विभागीय सहआयुक्त नागपूर यांच्यास्तरावरून २८ फेब्रुवारी रोजी १० ग्रामसभांची पोर्टलवर नोंदणी झाली आहे.जिल्ह्यात ४५० सामूहिक वनहक्क ग्रामसभांपैकी फक्त नागभीडमधील १० ग्रामसभांची रोजगार हमी पोर्टलवर नोंदणी झाली.आता रोजगार हमी योजनेंतर्गत अंमलबजावणी यंत्रणा म्हणून तालुक्यातील १० ग्रामसभा स्वतंत्रपणे कार्य करणार आहे.आता सदर ग्रामसभांनी नियोजन कामांची चिन्हांकित यादी पंचायत समितीमार्फत जि.प. चंद्रपूरकडे नियोजन आराखडा स्वरूपात पाठविला.त्यास मंजरी प्राप्त झाल्यानंतर सदर ग्रामसभा स्वतंत्रपणे रोजगार हमी अंतर्गत कामे करणार आहे.त्यामुळे स्थानिक लोकांना रोजगार प्राप्त होईल,वनहक्क क्षेत्रात वृक्षारोपण,मृदा,जल संधारणसाठी बांधबंदिस्ती, रोपवन नर्सरी,तलावांचे खोलीकरण,गौण वनउपजाचे साठवणीसाठी गोडाऊन व प्रक्रिया इत्यादी बरीच कामे ग्रामसभा स्वतंत्रपणे करणार आहे.यासाठी ग्रामसभांना शासन निर्णयानुसार गाव स्तरावर ग्राम मेट / रोजगार सेवक,बेअर फुट टेक्निशियन यांची निवड केली आहे.ग्रामसभेच्या नावाची नोंद शासनाच्या रोजगार हमी योजना पोर्टलवर झाल्याबद्दल गावातील लोकांमध्ये आनंद व उत्साहाचे वातावरण गावात पहायला मिळते आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

‘जागतिक तंबाखू विरोधी दिन’ व ‘उच्चरक्तदाब दिना’ निमित्त पोलीस अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांची आरोग्य तपासणी..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :- 'जागतिक तंबाखू विरोधी दिन' आणि 'जागतिक उच्चरक्तदाब दिना'चे औचित्य साधून गडचिरोली येथे एक विशेष आरोग्य जनजागृती आणि तपासणी शिबिर उत्साहात पार...

कसाई मातेचा माणुसकीला काळिमा फासणारा कारनामा; स्वतःचीच दोन मुले विकली दोन लाखात.. – अल्पवयीन मुलीसोबत भयंकर कृत्य..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-काही कालावधीपासून चंद्रपूर जिल्ह्यात खतरनाक कारनामे उघडकीस येऊ लागलेत.विविध कारनामे उघड होत असतांनाच नुकताच एका कसाई मातेचा माणुसकीला काळिमा फासणारा कारनामा...

आदिवासी महामंडळाच्या नियोजनशून्यतेमुळे शेतकरी संकटात; रब्बीची धान खरेदी केंद्रे अद्याप बंदच.. – गोदामे जुन्याच धानाने गच्च भरलेली..

उद्रेक न्युज वृत्त  गौरव नागपूरकर/देसाईगंज :-रब्बी हंगामातील धान खरेदीसाठी आदिवासी विकास महामंडळाची खरेदी केंद्रे अद्याप सुरू न झाल्याने देसाईगंज(वडसा)परिसरासह गडचिरोली जिल्ह्यातील हजारो शेतकरी तीव्र चिंतेत सापडले...

रखरखत्या उन्हात शेतातच टाकली खाट अन् उपोषणास केली सुरुवात..

उद्रेक न्युज वृत्त :-मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणाच्या प्रलंबित मागण्यांसाठी आंदोलनाचे हत्यार उपसून आज,शनिवार ३० मे पासून सकाळी दहा वाजे जालना...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!