Sunday, May 24, 2026
Homeउद्रेक न्युज वृत्तमोठी घोषणा,उज्ज्वला गॅस योजनेतील लाभार्थ्यांना मिळणार प्रति गॅस सिलेंडरवर २०० रुपये सबसिडी-२२...

मोठी घोषणा,उज्ज्वला गॅस योजनेतील लाभार्थ्यांना मिळणार प्रति गॅस सिलेंडरवर २०० रुपये सबसिडी-२२ मे २०२२ पासून मिळणार अनुदान

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त :- रोजची रोजी-रोटी कमावून खाणाऱ्या सर्वसामान्य गोरगरीब जनतेला घरगुती गॅस सिलिंडरच्या वाढत्या दराने आर्थिक विवंचनेत टाकले आहे.अशातच मिळणारी सबसिडीही बंद झाली असल्याने गॅस खरेदी करावे की उदरनिर्वाह करावे? असा प्रश्न निर्माण झाला आहे.त्यामुळे ग्रामीण भागातील गृहिणींचा कल पुन्हा चुलीवर स्वयंपाक करण्याकडे वाढलेला दिसून येतो आहे.

केंद्र सरकारच्या उज्ज्वला गॅस योजनेमुळे गोरगरीबांच्या घरात गॅस सिलिंडर शेगडी पोहोचली आणि चुलींवरील स्वयंपाकाच्या धुरामुळे होणाऱ्या आरोग्यबाधेपासून त्यांचा बचाव झाला.योजनेच्या वेळेस गॅस सिलेंडर ‘स्वस्तात मस्त’ म्हणून नागरिकांना भुरळ घातली गेली.मात्र हल्ली गॅस सिलिंडर १२०० रुपयांपर्यंत खरेदी करण्याची वेळ आल्याने गोरगरीबांच्या आवाक्याबाहेर गेला आहे.त्यामुळे पुन्हा एकदा उज्ज्वला गॅस धारकांना चुलीवर परतावे लागले आहे.चुलीवरच्या स्वयंपाकामुळे ग्रामीण भागातील महिलांना श्वसनाचे,डोळ्याचे,फुफ्फुसाचे आजार व इतर आजार होण्याची शक्यता नाकारता येणार नाही.

जंगलात सरपण गोळा करण्यासाठी गेले तर वन्यप्राण्यांचा धोका आणि मोडी आणल्या तर अवैध वृक्षतोडीचा गुन्हा.यामुळे ‘इकडे आड, तिकडे विहीर’ अशा पेचप्रसंगात ग्रामीण भागातील जनता अडकली आहे.असे वृत्त काही दिवसांपूर्वी उद्रेक न्युज ने प्रकाशित केले होते.अशातच आता मोठी बातमी समोर आली असून उज्जवला योजनेअंर्गत येणाऱ्या लाभार्थ्यांना सबसिडी देण्याचा केंद्र सरकारने निर्णय घेतला आहे.माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकुर यांच्या नवीन अधिसूचने नंतर उज्ज्वला योजनेच्या ९.५९ कोटी लाभार्थ्यांना प्रति वर्ष १४.२ किलो एलपीजी गॅस सिलिंडरवर २०० रुपये सबसिडी मिळणार आहे.तसेच सरकारने वर्षभरात १२ सिलिंडर भरण्यासही परवानगी दिली आहे.म्हणजेच केंद्रीय मंत्रिमंडळाने एका आर्थिक वर्षात १२ स्वयंपाकाच्या गॅस सिलिंडरवर २०० रुपये प्रति सिलेंडर सबसिडी मंजूर केली आहे. 

सरकारने उज्ज्वला योजनेंतर्गत प्रति एलपीजी सिलिंडर २०० रुपये सबसिडी एका वर्षासाठी वाढवली आहे.सरकारच्या या निर्णयामुळे १.६ कोटी कुटुंबांना फायदा मिळणार आहे.दरम्यान मंत्रिमंडळाच्या मान्यतेनंतर हे अनुदान मंजूर करण्यात आले आहे.सर्व प्रमुख भारतीय तेल कंपन्या इंडियन ऑईल कॉर्पोरेशन लिमिटेड,भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड आणि हिंगुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड कंपन्या या  २२ मे २०२२ पासून अनुदान देत आहेत.अनुदान मिळत असल्याने सर्वसामान्यांना महागाईच्या झळीतून काहीसा दिलासा मिळणार आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

देशात जनगणनेची प्रक्रिया सुरू झाली; पण ओबीसी समाजासाठी स्वतंत्र रकानाच नाही.. देसाईगंज तालुका ओबीसी समाज संघटनेच्या वतीने उपविभागीय कार्यालयावर धडकणार ‘भव्य मोर्चा’..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):- "आमची संख्या,आमचा हक्क,आमचा सन्मान!" आणि "जनगणनेत स्वतंत्र कॉलम,आमचा हक्क!" अशी गगनभेदी गर्जना करत देसाईगंज तालुका ओबीसी समाज संघटनेच्या वतीने आयोजित करण्यात...

रोजगार हमी योजनेच्या कायद्याची जागा घेणाऱ्या ‘व्हीबी-जी राम जी’ योजनेत १२५ दिवस काम देण्याची हमी..

उद्रेक न्युज वृत्त :-बऱ्याच कालावधीपासून सुरू असलेल्या महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना-२००५ कायद्याची जागा आता 'विकसित भारत गॅरंटी फॉर रोजगार अँड आजिविका...

सामान्य माणसाचा जीव २५ लाखांचा ठरवत असाल तर तुम्ही स्वतः वाघासमोर उभे राहा; आम्हीही तुम्हाला २५ लाख देतो..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-नुकतेच चंद्रपूर जिल्ह्याच्या सिंदेवाही तालुक्यातील गुंजेवाही परिसरात वाघाच्या हल्ल्यात चार महिलांचा मृत्यू झाला.या घटनेने सर्वत्र संतापाची लाट उसळली आहे.या पार्श्वभूमीवर सामाजिक...

वाढदिवसाचा कार्यक्रम असल्याचा बनाव; बालविवाहात सरकारी पाहुण्यांची एंट्री..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-एका १६ वर्षीय अल्पवयीन मुलीचा बालविवाह २० वर्षीय तरुणासोबत लावल्या जात असल्याची माहिती नागपूर जिल्हा बालसंरक्षण कक्षाला प्राप्त होताच पथकाने अल्पवयीन मुलीची...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!