Sunday, July 12, 2026
Homeभंडाराटिप्परने दुचाकीला धडक देताच ५ वर्षाची नात व आजोबा जागीच ठार- आजची...

टिप्परने दुचाकीला धडक देताच ५ वर्षाची नात व आजोबा जागीच ठार- आजची घटना

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

भंडारा :- भरधाव वेगाने येणाऱ्या टिप्परने दुचाकीला धडक देताच ५ वर्षाची नात व ७० वर्षाचे आजोबा यांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना आज २५ मार्च रोजी दुपारच्या सुमारास घडली आहे.

कवळू बडवाईक वय ७० वर्षे व वाणी महेंद्र बडवाईक वय ५ वर्षे दोघेही रा.नवीन पुनर्वसन पिंडकेपार (बेला) असे अपघातात ठार झालेल्या आजोबा आणि नातीचे नाव आहे.कवळू बडवाईक हे आयुध निर्माणीतून सेवानिवृत्त झाले होते.त्यांची नात वाणी ही भंडारा येथील गायत्री विद्या मंदिरात शिक्षण घेत होती.तिला दररोज सकाळी शाळेत घेऊन जाणे व सुटीनंतर तिला परत आणणे असा त्यांचा नित्यक्रम होता.दरम्यान, आज दुपारी शाळेची सुट्टी झाल्यानंतर ते वाणीला घेऊन दुचाकी क्र.एमएच ३६ टी ३७५३ ने गावाकडे जात असतांना भरधाव वेगाने येणाऱ्या टिप्पर क्रमांक एमएच ४९/०७०१ ने त्यांच्या दुचाकीला धडक दिली.  अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाला.याप्रकरणी भंडारा पोलिसांनी टिप्परचाल काविरुद्ध गुन्हा दाखल करून पुढील तपास भंडारा पोलीस करीत आहेत.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

दोन दुचाक्या एकमेकींना धडकल्या; एकाचा घटनास्थळीच मृत्यू, तर एकजण गंभीर जखमी..

उद्रेक न्युज वृत्त  कुरखेडा(गडचिरोली):-दोन दुचाक्या समोरासमोर एकमेकींना धडकून घडलेल्या अपघातात एका दुचाकीस्वाराचा घटनास्थळावरच मृत्यू झाला,तर एकजण गंभीर जखमी झाल्याची घटना आज,शनिवार ११ जुलै रोजी सायंकाळी सात...

दोन महिला उपजिल्हाधिकाऱ्यांना दणका; निलंबनासह विभागीय चौकशीचे आदेश..

उद्रेक न्युज वृत्त :-शासकीय कार्यालयात वारंवार गैरहजर राहणे,परवानगीशिवाय मुख्यालय सोडणे, आढावा बैठकांना अनुपस्थित राहणे,रजेचे अर्ज विहित नमुन्यात व वेळेत सादर न करणे,वरिष्ठांच्या आदेशांची अवहेलना...

देसाईगंजच्या विहीरगाव(पोटगाव)येथील ‘त्या’ मातेने रुग्णवाहिकेतच दिला गोंडस मुलीला जन्म..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-देसाईगंज तालुक्याच्या विहीरगाव(पोटगाव)येथील रहिवासी स्वाती चांगदेव नेवारे ह्या माहेरी बाळंतपणासाठी गेल्या असता  आरोग्य केंद्रातून रुग्णवाहिकेद्वारे गोंदियाला रेफर करत असतांनाच काही अंतरावरील मार्गावर...

कुरुडच्या प्राथमिक आरोग्य केंद्रास आरोग्य सेवेचे आयुक्त तथा राष्ट्रीय आरोग्य अभियानाच्या संचालकांची भेट..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील आरोग्य विभागाचे शासन स्तरावर प्रलंबित असलेले प्रस्ताव तातडीने मार्गी लावण्यात येतील,अशी ग्वाही आरोग्य सेवेचे आयुक्त तथा राष्ट्रीय आरोग्य अभियानाचे संचालक...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!