Friday, May 1, 2026
Homeगोंदियाअबब...! मयत व्यक्ती एक; मृत्यू प्रमाणपत्र दोन- ग्रामपंचायतीचा अजब कारभार

अबब…! मयत व्यक्ती एक; मृत्यू प्रमाणपत्र दोन- ग्रामपंचायतीचा अजब कारभार

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

गोंदिया :- जिल्ह्यातील सडक अर्जुनी तालुक्यातील तिडका ग्रामपंचायत येथे एक अनोखा व आगळावेळा प्रकार उघडकीस आला आहे.एकाच मृत व्यक्तीचे दोन वेगवेगळ्या तारखांना मृत्यू झाल्याचे प्रमाणापत्र ग्रामपंचायतीने दिल्याने नातेवाईकांसमोर मोठा पेच निर्माण झाला आहे.दरम्यान,दिलेल्या प्रमाणपत्रामुळे एकाच व्यक्तीचा दोन वेगवेगळ्या तारखांना मृत्यू कसा होऊ शकतो? असा प्रश्न मृतकाच्या नातेवाइकांसमोर निर्माण झाला आहे.

ग्रामपंचायत तिडका येथील रहिवासी असलेले बलदेव कोटवार यांनी त्यांच्या आईच्या मृत्यूचे प्रमाणपत्र ग्रामपंचायत तिडका येथे मागितले असता मानकूबाई बळीराम कोटवार यांच्या नावाचे दोन वेगवेगळ्या तारखांचे दोन मृत्यू प्रमाणपत्र देण्यात आले.

त्यामुळे या कामात हयगय केल्याप्रकरणी ग्रामपंचायतीच्या ग्रामसेवकावर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.मानकूबाई बळीराम कोटवार यांचा मृत्यू जून २०२२ ला झाला असून,त्यांच्या मृत्यूचे प्रमाणपत्र बलदेव कोटवार यांनी मागितले असता,ग्रामपंचायत कार्यालय,तिडका येथील मूळ नोंद अभिलेखानुसार मानकूबाई बळीराम कोटवार यांच्या मृत्यूचे दोन प्रमाणपत्र देण्यात आले.७-६-२०२२ व ७-१-२०२३ हे दोन प्रमाणपत्र त्यांचा मुलगा बलदेव कोटवार यांना प्राप्त झाले.त्यामुळे त्यानी खंडविकास अधिकाऱ्याकडे लेखी तक्रार करून ग्रामसेविका टेकाम यांच्यावर कारवाई करावी व मूळ मृत्यूचे प्रमाणपत्र कोणते? याची सहनिशा करावी,अशी मागणी केली आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

माय-लेकीने राहत्या घरीच घेतला गळफास..!

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-बाळ जन्माला येताच मृत पावल्याने धक्क्यातून सावरण्यासाठी आईकडे राहायला गेलेल्या मुलीने आणि तिच्या आईने राहत्या घरीच गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना...

मोठा अनर्थ टळला; चक्क धावत्या बसचे चाक निघाल्याने प्रवाशांमध्ये खळबळ..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-कधीकाळी धावती बस अचानकपणे बंद पडते, तर कधी गाडीच्या वरचा छप्परच उडून जातो.पावसात तर काही बसेसमध्ये चक्क छतावरून पाणी गळायला लागतो.अश्या...

हॉटेलचा नाश्ता महागणार; व्यवसायिक सिलेंडरच्या दरात सर्वात मोठी वाढ.. – सर्वसामान्यांच्याच खिशाला कात्री..

उद्रेक न्युज वृत्त :-महिन्याच्या सुरुवातीलाच कमर्शियल म्हणजेच व्यवसायिक गॅस सिलेंडरच्या दरात मोठी वाढ करण्यात आली आहे.आज,शुक्रवार १ मे रोजी १९ किलोच्या व्यवसायिक सिलेंडरच्या किंमतीत...

उद्याला बारावीचा ऑनलाइन निकाल..

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाचा निकाल कधी लागणार,याची उत्सुकता असतांनाच राज्य बोर्डाने काल गुरुवारच्या रात्री परिपत्रक काढत महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!