Monday, September 21, 2026
Homeकोंढाळाकोंढाळा येथे काँग्रेस पक्षातर्फे 'हात से हात जोडो' अभियानास उत्स्फूर्त प्रतिसाद

कोंढाळा येथे काँग्रेस पक्षातर्फे ‘हात से हात जोडो’ अभियानास उत्स्फूर्त प्रतिसाद

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त

कोंढाळा :- देसाईगंज तालुक्यातील कोंढाळा येथे आज २५ मार्च रोजी सकाळी ९.३० च्या सुमारास देसाईगंज काँग्रेस पक्षातील पदाधिकारी यांच्या तर्फे ‘हात से हात जोडो’ अभियानास गावातील नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देऊन ‘काँग्रेस पक्षाच्या एकजुटीचा विजय असो’ असे नारे लावीत अभियानास सुरुवात करण्यात आली.

काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या ‘भारत जोडो’ यात्रेनंतर अखिल भारतीय काँग्रेसने सुरू केलेल्या ‘हात से हात जोडो’ मोहिम नुकतीच संपूर्ण तालुक्यात सुरू करण्यात आली आहे.याच निमत्ताने कोंढाळा येथील मुख्य चौक,घरोघरी तसेच गावातील नागरिकांच्या भेटी घेत सदर अभियानाचे महत्व नागरिकांना पटवून पटवून देण्यात आले.

सदर अभियाना प्रसंगी ‘नफरत छोडो हात से हात जोडो ‘च्या घोषणा देत संपूर्ण गावात रॅली काढण्यात आली.अभियानात मोठ्या संख्येने गावातील  नागरिकांनी सहभाग घेतला.काँग्रेसला साथ देऊन देशाला अंधाराच्या गर्दीतून प्रकाश वाटेवर घेऊन जाऊया आणि पुन्हा एकदा स्वर्णीम भारत घडवू या; असे पत्रक नागरिकांना वितरित करण्यात आले.

‘हात से हात जोडो’ अभियाना प्रसंगी देसाईगंज तालुका काँग्रेस कमिटीचे तालुकाध्यक्ष राजेंद्र बुल्ले,युवक तालुकाध्यक्ष पंकज चहांदे,

ओबीसी तालुकाध्यक्ष अरुण कुंभलवार,कुरुड- कोकडी समन्वयक संदीप वाघाडे,देसाईगंज तालुका उपाध्यक्ष नितीन राऊत,कोंढाळा ग्रामपंचायत उपसरपंच गजानन सेलोटे,संजय करांकर उपसरपंच विसोरा,भीमराव नगराडे माजी नगरसेवक नगरपरिषद देसाईगंज,सुरेश मेश्राम माजी जिल्हा परिषद सदस्य गडचिरोली,मनोहर निमजे तालुका महासचिव,नरेंद्र गजपुरे माझी उपसरपंच पोटगांव,गावातील कार्यकर्ते, पदाधिकारी व गावकरी मोठ्या संख्येने अभियानात सहभागी झाले होते.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

दत्तक प्रक्रियेत चार बालकांना मिळाले कायदेशीर पालकत्व..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-बाल न्याय(मुलांची काळजी व संरक्षण) अधिनियम,२०१५ व सुधारित अधिनियम,२०२१ मधील तरतुदींनुसार गडचिरोली जिल्ह्यातील दत्तक प्रक्रियेची चार प्रकरणे निकाली काढण्यात आली आहेत....

पठ्ठ्याने दिमाक लावला खरी,पण अलगद खाकीच्या जाळ्यात अडकला.. -दारूसाठ्यासह २८ लाख ७० हजारांचा मुद्देमाल जप्त..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-चोर कितीही शातिर असला तरीही तो खाकीच्या नजरेतून सुटूच शकत नाही.काही घटना यांस अपवाद असू शकतात.पण,एखाद्या चित्रपटातील स्टाईल ही प्रत्यक्षात खरी...

२२ मिनी सेतू केंद्रचालकांची भरती प्रक्रिया; अंतिम पात्र-अपात्र यादी प्रसिद्ध..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील १३ ‘दादालोरा खिडकी’ आणि ९ ‘आदी सेवा केंद्र’ अशा एकूण २२ केंद्रांच्या माध्यमातून नागरिकांना विविध शासकीय व लोकाभिमुख सेवा पुरविण्यासाठी...

राज्यात दुष्काळ जाहीर करण्याच्या हालचालींना वेग..

उद्रेक न्युज वृत्त :-यंदा पावसाने दडी मारल्याने महाराष्ट्र राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये दुष्काळ सदृश्य परिस्थिती उद्भवलेली आहे.अस्मानी संकटामुळे शेतकरी बांधव हवालदिल झाला आहे.राज्यात पावसाने घेतलेली...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!