Wednesday, September 2, 2026
Homeचंद्रपूरसरपणासाठी जंगलात जाणे इसमाला भोवले…-एका झटक्यात वाघाने केले ठार..

सरपणासाठी जंगलात जाणे इसमाला भोवले…-एका झटक्यात वाघाने केले ठार..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त

 चंद्रपूर :-   ब्रह्मपुरी वन विभाग ब्रह्मपुरी,अंतर्गत येणाऱ्या सिंदेवाही वनपरिक्षेत्रातील कच्चेपार बीट-दोन कक्ष क्रमांक २५४ मध्ये सरपणासाठी काड्या तोडण्यासाठी गेलेल्या इसमावर वाघाने हल्ला करून ठार केले. ही घटना काल, सोमवारी सकाळी ८.३० वाजताच्या सुमारास घडली.श्रीकृष्ण सदाशिव कोठेवार वय ५१ वर्ष रा.पळसगाव (जाट) असे मृतकाचे नाव आहे. श्रीकृष्ण सदाशिव कोठेवार साथीदारांसोबत जंगलातील कच्चेपार बीटामध्ये पहाटेच्या सुमारास सरपण गोळा करायला गेला होता.सरपण जमा करताना तो जंगलातील नाल्यालगत पाणवठ्यावर पोहोचला.समोर दबा  धरून बसलेल्या वाघाने झडप घालून श्रीकृष्णला जागीच ठार केले.घटनास्थळाजवळ असलेल्या साथीदारांनी आरडाओरड करून वाघाला पिटाळून लावण्याचा प्रयत्न केला.मात्र, वाघाने मृतदेह १०० मीटरपर्यंत फरकटत नेले.या घटनेची माहिती वनविभागाला देताच सिंदेवाहीचे वनपरिक्षेत्र अधिकारी विशाल सालकर यांच्या मार्गदर्शनात क्षेत्र सहाय्यक सिंदेवाही,के.डी.मसराम चमू घेऊन घटनास्थळी दाखल झाले.यावेळी वनरक्षक चौधरी,वनरक्षक चहांदे,पंडित मेकेवार,फुलझले, तोडसाम,व स्वाब संस्थेचे जिवेश सयाम, शुभम निकेशर, कैलास बोरकर, गोपाल कुंभले, यश कायरकर, मिनेश कुंभले,यावेळी घटनास्थळी पोहचले.सिंदेवाही पोलिसांना घटनेची माहिती दिली.त्यांनी मोक्का पंचनामा करून ग्रामीण आरोग्य केंद्रात शवविच्छेदनासाठी पाठविले असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

फिरत असतांनाच हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-प्रकृती निरोगी राहण्यासाठी नियमित सकाळी फिरायला जाणे व जिम करणे,अशी दिनचर्या सुरू केलेली असतांनाच घराबाहेर पडलेल्या एका अधिकाऱ्याचा हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने मृत्यू...

ग्रामसेवकांची वर्षातून केवळ एकच संवैधानिक ग्रामसभा घेण्याची मागणी..

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्याच्या जळगाव जिल्ह्यातील पारोळा तालुक्याच्या शिवरे दिगर येथे १५ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळच्या सुमारास ग्रामसभे दरम्यान झालेल्या गोंधळ व दबावामुळे...

जागतिक नारळ दिन विशेष..! नारळ लागवड; शाश्वत उत्पन्नाचा ‘कल्पवृक्ष’..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-आज बुधवार २ सप्टेंबर दरवर्षी २ सप्टेंबर हा दिवस ‘जागतिक नारळ दिन’ म्हणून साजरा केला जातो. नारळाच्या झाडाचा जवळपास प्रत्येक भाग उपयोगात...

धक्कादायक..! जेवणाच्या डाळभाजीत पाल; ३० विद्यार्थ्यांना विषबाधेची लक्षणे..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-विद्यार्थ्यांच्या जेवणाच्या डाळभाजीत पाल (विचगुर)पडल्याने तब्बल ३० विद्यार्थ्यांना विषबाधेची लक्षणे जाणवू लागल्याची घटना आज,मंगळवार १ सप्टेंबर रोजी सकाळच्या सुमारास चंद्रपूर जिल्ह्याच्या...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!