Tuesday, August 18, 2026
Homeदेसाईगंजसतर्कतेचा इशारा.. आज गोसीखुर्द धरणामधून वैनगंगा नदीपात्रात सोडणार पाणी..

सतर्कतेचा इशारा.. आज गोसीखुर्द धरणामधून वैनगंगा नदीपात्रात सोडणार पाणी..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
देसाईगंज(गडचिरोली):-पावसाळ्याचा अख्खा जून महिना लोटून गेला,तरीही पावसाने पाठ फिरवली होती. मात्र,जुलै महिना लागणार,तोच पावसाने राज्याच्या विविध भागात कोसळधारा सुरू केल्या.यामुळे काही ठिकाणी विशेषतः धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पाण्याच्या पातळीत कमालीची वाढ झाली आहे.सदरची वाढ लक्षात घेता भंडारा जिल्ह्याच्या पवनी तालुक्यातील गोसीखुर्द धरणामधून वैनगंगा नदीपात्रात पूर नियंत्रणासाठी आज,शुक्रवार ३ जुलै रोजी दुपारी ३ वाजेच्या सुमारास धरणाचे तीन  वक्रद्वारे खुली करण्यात येणार आहेत. त्यातून अंदाजे सुमारे ३२० क्युमेक्स पाणी नदीपात्रात सोडण्यात येणार आहे.त्यामुळे,वैनगंगा नदीपात्रामध्ये आवागमन (ये-जा)करणाऱ्यांनी विशेष काळजी घ्यावी व सतर्क राहण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

अल्पवयीन मुलाने शाळकरी मुलाची केली हत्या..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-भंडारा शहरातून आज,मंगळवार १८ ऑगस्ट रोजी सायंकाळच्या सुमारास एक धक्कादायक घटना उघडकीस आली असून एका शाळकरी मुलाच्या हत्येने संपूर्ण शहर हादरून...

सर्पदंश घटनेतील मृत विद्यार्थिनींच्या वारसांना आणखी प्रत्येकी ५ लाखांचे अर्थसहाय्य मंजूर..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्याच्या धानोरा तालुक्यातील जपतलई येथील अनुदानित आदिवासी आश्रमशाळेच्या वसतिगृहात सर्पदंशामुळे मृत्यू झालेल्या तीन विद्यार्थिनींच्या कायदेशीर वारसांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून प्रत्येकी ५...

नामांकित शाळांना बॉम्बने उडवून देण्याच्या धमकीचा ई-मेल; पोलिस यंत्रणा सतर्क.

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-नागपुरातील नामांकित शाळांना बॉम्बने उडवून देण्याच्या धमकीचा ई-मेल आज,मंगळवार १८ ऑगस्ट रोजी सकाळच्या सुमारास शाळांच्या अधिकृत ई-मेल आयडीवर दिसून येताच शिक्षण...

जिल्हाधिकारी व एसपी रात्रीच पोहचले मार्कंडा देवस्थान परिसरात; विकास व संवर्धन कामांची केली पाहणी..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्याच्या चामोर्शी तालुक्यातील मार्कंडा देवस्थान परिसरात महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ (एमएसआरडीसी)आणि भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभाग(एएसआय) यांच्यामार्फत सुरू असलेल्या कामांची जिल्हाधिकारी...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!