Wednesday, June 10, 2026
Homeभंडाराशैक्षणिक कागदपत्रे परत करण्यासाठी पैश्याची मागणी; एसीबीचा सापळा.. - लाच प्रकरणी सेतू...

शैक्षणिक कागदपत्रे परत करण्यासाठी पैश्याची मागणी; एसीबीचा सापळा.. – लाच प्रकरणी सेतू केंद्र चालक अटकेत..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
भंडारा :-एका नोंदणीकृत बांधकाम कामगाराने महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याण मंडळातर्फे मुलास शिष्यवृत्ती मिळावी,यासाठी सेतू केंद्र चालकाकडे मूळ शैक्षणिक कागदपत्रे दिली.सदरची कागदपत्रे वारंवार मागणी करूनही परत केली जात नव्हती.उलट कागदपत्रे परत करण्यासाठी सेतू केंद्र चालकाने १२ हजार रुपयांची मागणी करून त्यातील ११ हजार रुपयांची लाच घेतल्याप्रकरणी भंडारा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने आज,मंगळवार १० फेब्रुवारी लाखनी येथील नेहा सेतू केंद्रचालकास रंगेहाथ अटक केली आहे.सतीश तुळशीराम मोटघरे वय ३५ वर्षे रा.सिंधी लाईन,लाखनी, जि.भंडारा असे लाच प्रकरणी अटक केलेल्या सेतू केंद्रचालकाचे नाव आहे.
तक्रारदार हे बांधकाम कामगार असून नोंदणीकृत कामगारांच्या मुलांना बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडून शिष्यवृत्ती मिळते.तक्रारदार यांनी सन २०२१ मध्ये शिष्यवृत्तीकरिता सतीश मोटघरे याच्या लाखनी येथील सेतू केंद्रातून आनलाईन अर्ज भरला होता.अर्ज भरतांना तक्रारदार यांनी सतीश मोटघरे याला मुलाच्या दहावीची मार्कलिस्ट,डोमिसाईल सर्टिफिकेट, शाळा सोडल्याचा दाखला,नॉन क्रीमीलेअर सर्टिफिकेट, आधार कार्ड,कामगार कार्ड सर्व ओरिजनल(मूळ) कागदपत्रे दिली होती.काम झाल्यानंतर तक्रारदार यांनी त्यांची मूळ कागदपत्रे परत करण्यासाठी सतीश मोटघरे याचेकडे वारंवार मागणी केली.परंतु,त्याने मूळ कागदपत्रे परत करण्यास टाळाटाळ केली.परत ३० जानेवारी रोजी तक्रारदार यांनी सतीश मोटघरे याच्या सेतू सेवा केंद्रात भेट घेत त्यांचे मूळ कागदपत्रे परत करण्याची विनंती केली.यावर सतीश मोटघरे याने मूळ कागदपत्रे परत करण्यासाठी सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालय भंडारा येथील अधिकारी व स्वतः करिता १२ हजार रुपये लाचेची मागणी केली.प्रकरणी आज मंगळवारी भंडारा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या वतीने सापळा रचण्यात आला.सापळ्यात नेहा सेतू केंद्र, सिंधी लाईन चौक,लाखनी येथील सापळा कारवाई दरम्यान ११ हजार रुपये लाचेची रक्कम स्वीकारतांना सतीश मोटघरे याला अटक करण्यात आली.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

दुर्गम गडचिरोलीतील तब्बल ७८ विद्यार्थ्यांना देशातील नामांकित विद्यापीठांमध्ये प्रवेश..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-दुर्गम,नक्षलग्रस्त व आदिवासीबहुल गडचिरोली जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना राष्ट्रीय स्तरावरील उच्च शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी समाज कल्याण विभागामार्फत राबविण्यात आलेला ‘मिशन-२००’ हा उपक्रम...

अखेर नदीत बुडालेल्या तीन तरुणांचे सापडले मृतदेह; उर्वरित दोन युवकांचा शोध सुरू..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-जिल्ह्याच्या घुग्गुस शहरातील पाच तरुण म्हातारदेवी परिसरातील वर्धा नदीवर पोहण्यासाठी गेले असता काल सोमवारच्या रात्री उशिरापर्यंत घरी परतले नसल्याने नदीत बुडाल्याची भीती...

प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना झटका.. आता नऊ सिलेंडरवर नाही; तर चारच सिलेंडरवर मिळणार अनुदान..

उद्रेक न्युज वृत्त :-नुकतेच घरगुती स्वयंपाकाच्या गॅस सिलेंडरच्या दरात रविवार ७ जून २०२६ पासून २९ रुपयांची वाढ करण्यात आली आहे.त्यानुसार, बऱ्याचश्या जिल्ह्यांमध्ये गॅस सिलेंडरच्या किंमतींनी...

कर्जमाफीसाठी शेतकऱ्यांनी आधार पडताळणी करणे आवश्यक..

उद्रेक न्युज वृत्त :-राज्यातील अनेक शेतकरी गेल्या काही वर्षापासून नैसर्गिक आपत्ती,अवकाळी पाऊस, उत्पादन खर्चातील वाढ आणि शेतमालाला न मिळणारा योग्य भाव,यामुळे आर्थिक संकटाचा सामना...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!