Wednesday, June 10, 2026
Homeदेसाईगंजजागतिक महिला दिनी देसाईगंजात होणार भव्य विधी सेवा प्राधिकरण शिबिर.. -...

जागतिक महिला दिनी देसाईगंजात होणार भव्य विधी सेवा प्राधिकरण शिबिर.. – उच्च न्यायालयाचे न्यायाधीश राहणार उपस्थित..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-येत्या ८ मार्च रोजी देसाईगंज येथे होणाऱ्या विधी सेवा प्राधिकरण शिबिरात शासनाच्या विविध योजना व सेवा,बचत गटांचे उपक्रम,महिला व बालकल्याण विषयक माहिती तसेच ‘उमेद’ अंतर्गत स्टॉल अधिक संख्येने उभारण्याचे व ८ मार्च हा जागतिक महिला दिन असल्याने कार्यक्रमस्थळी महिला दिन साजरा करत महिलाभिमुख उपक्रमांना विशेष प्राधान्य देण्याचे व हे शिबिर नागरिकांसाठी अधिकाधिक उपयुक्त ठरेल,अशा सर्वसमावेशक नियोजनावर भर देण्याच्या सूचना जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी दिल्या आहेत.
विधी सेवा प्राधिकरण शिबिराच्या प्रभावी आयोजनासाठी काल मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालय गडचिरोली येथे जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक पार पडली.यावेळी ते बोलत होते.जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास गाडे,जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे व्यवस्थापक वसिम खान,निवासी उपजिल्हाधिकारी आशिष वानखेडे, देसाईगंज उपविभागीय अधिकारी प्रसेनजित प्रधान यांच्यासह संबंधित विभागांचे अधिकारी यावेळी प्रामुख्याने उपस्थित होते.
बैठकीत शिबिराचे आयोजन देसाईगंज येथील क्रीडा संकुलात करण्याचा निर्णय घेण्यात आला.क्रीडा संकुलात उपलब्ध असलेल्या प्रशस्त जागेमुळे जास्तीत जास्त स्टॉल उभारता येतील,असे जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.स्टॉलसाठी जागेची निवड करून प्रत्येक स्टॉलचे मोजमाप ठरवून नियोजन करण्यास सांगण्यात आले, जेणेकरून अधिकाधिक स्टॉल उभारता येतील.स्टॉल परिसरात वीज,पाणी,इंटरनेट यांसह आवश्यक सोयी उपलब्ध करून देण्यावर भर देण्यात आला.शासकीय व सहकारी बँकांकडून नागरिकांना दिल्या जाणाऱ्या सुविधा,आधार कार्ड नोंदणी व केवायसी अद्ययावत करण्यासाठी स्वतंत्र स्टॉल उभारून इंटरनेट सुविधा उपलब्ध करण्याचेही निर्देश देण्यात आले.
देसाईगंज येथे शिबिरादरम्यान उच्च न्यायालयाचे न्यायाधीश उपस्थित राहणार असल्याने शासकीय विश्रामगृहाची व्यवस्था नीटनेटकी करने,कार्यक्रमपूर्व तयारीचा आढावा घेण्यासाठी विधी सेवा प्राधिकरणाचे अधिकारी यांनी प्रत्यक्ष स्थळ निरीक्षण करणे,तसेच सर्व संबंधित विभागांना आवश्यक पत्रव्यवहार वेळेत करणे, कार्यक्रमस्थळी ॲम्बुलन्स,अग्निशमन वाहन,पिण्याचे पाणी,मोबाईल शौचालये उपलब्ध ठेवणे, सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत रस्ते दुरुस्ती व स्वच्छता करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या.
बैठकीला संबंधीत अधिकारी उपस्थित होते.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

दुर्गम गडचिरोलीतील तब्बल ७८ विद्यार्थ्यांना देशातील नामांकित विद्यापीठांमध्ये प्रवेश..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-दुर्गम,नक्षलग्रस्त व आदिवासीबहुल गडचिरोली जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना राष्ट्रीय स्तरावरील उच्च शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी समाज कल्याण विभागामार्फत राबविण्यात आलेला ‘मिशन-२००’ हा उपक्रम...

अखेर नदीत बुडालेल्या तीन तरुणांचे सापडले मृतदेह; उर्वरित दोन युवकांचा शोध सुरू..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-जिल्ह्याच्या घुग्गुस शहरातील पाच तरुण म्हातारदेवी परिसरातील वर्धा नदीवर पोहण्यासाठी गेले असता काल सोमवारच्या रात्री उशिरापर्यंत घरी परतले नसल्याने नदीत बुडाल्याची भीती...

प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना झटका.. आता नऊ सिलेंडरवर नाही; तर चारच सिलेंडरवर मिळणार अनुदान..

उद्रेक न्युज वृत्त :-नुकतेच घरगुती स्वयंपाकाच्या गॅस सिलेंडरच्या दरात रविवार ७ जून २०२६ पासून २९ रुपयांची वाढ करण्यात आली आहे.त्यानुसार, बऱ्याचश्या जिल्ह्यांमध्ये गॅस सिलेंडरच्या किंमतींनी...

कर्जमाफीसाठी शेतकऱ्यांनी आधार पडताळणी करणे आवश्यक..

उद्रेक न्युज वृत्त :-राज्यातील अनेक शेतकरी गेल्या काही वर्षापासून नैसर्गिक आपत्ती,अवकाळी पाऊस, उत्पादन खर्चातील वाढ आणि शेतमालाला न मिळणारा योग्य भाव,यामुळे आर्थिक संकटाचा सामना...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!