Wednesday, June 10, 2026
Homeनागपूरबिबट आढळला मृतावस्थेत..!

बिबट आढळला मृतावस्थेत..!

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
नागपूर :-जिल्ह्याच्या काटोल तालुक्यातील कोंढाळी-नागपूर महामार्गावरील वनविभागाच्या चमेली उपवनांतर्गत हरदोली शिवारात मंगळवारी बिबट मृतावस्थेत आढळून आला.माहिती मिळताच वनपथकाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळ गाठून पाहणी केली.पाहणीत बिबट मादी असून,अंदाजे दीड वर्षाची आहे,अशी माहिती प्रभारी वनपरिक्षेत्र अधिकारी फरीद आझमी यांनी दिली.कर्मचाऱ्यांनी मृत बिबट ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी नागपूर शहरातील ट्रान्झिट केअर सेंटरमध्ये पाठविला.वैद्यकीय अधिकारी एलडीओ डॉ.मयूर काटे,डॉ.प्रियल चौरागडे,डॉ.राजेश फुरसुंगे यांनी शवविच्छेदन केले.मृत बिबट्याच्या तोंड आणि पायाला गंभीर जखमा आढळून आल्याने तिचा मृत्यू वाहनाच्या धडकेत झाला असावा,अशी शक्यता वनविभागाच्या पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी वर्तविली आहे.बिबट्यावर वनविभागाच्या नियमानुसार अंत्यसंस्कार केले गेले. महामार्गालगत वन्यप्राण्यांच्या हालचालीमुळे अपघाताचा धोका वाढत असल्याचे उघड झाले आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

दुर्गम गडचिरोलीतील तब्बल ७८ विद्यार्थ्यांना देशातील नामांकित विद्यापीठांमध्ये प्रवेश..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-दुर्गम,नक्षलग्रस्त व आदिवासीबहुल गडचिरोली जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना राष्ट्रीय स्तरावरील उच्च शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी समाज कल्याण विभागामार्फत राबविण्यात आलेला ‘मिशन-२००’ हा उपक्रम...

अखेर नदीत बुडालेल्या तीन तरुणांचे सापडले मृतदेह; उर्वरित दोन युवकांचा शोध सुरू..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-जिल्ह्याच्या घुग्गुस शहरातील पाच तरुण म्हातारदेवी परिसरातील वर्धा नदीवर पोहण्यासाठी गेले असता काल सोमवारच्या रात्री उशिरापर्यंत घरी परतले नसल्याने नदीत बुडाल्याची भीती...

प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना झटका.. आता नऊ सिलेंडरवर नाही; तर चारच सिलेंडरवर मिळणार अनुदान..

उद्रेक न्युज वृत्त :-नुकतेच घरगुती स्वयंपाकाच्या गॅस सिलेंडरच्या दरात रविवार ७ जून २०२६ पासून २९ रुपयांची वाढ करण्यात आली आहे.त्यानुसार, बऱ्याचश्या जिल्ह्यांमध्ये गॅस सिलेंडरच्या किंमतींनी...

कर्जमाफीसाठी शेतकऱ्यांनी आधार पडताळणी करणे आवश्यक..

उद्रेक न्युज वृत्त :-राज्यातील अनेक शेतकरी गेल्या काही वर्षापासून नैसर्गिक आपत्ती,अवकाळी पाऊस, उत्पादन खर्चातील वाढ आणि शेतमालाला न मिळणारा योग्य भाव,यामुळे आर्थिक संकटाचा सामना...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!