Monday, September 21, 2026
Homeचंद्रपूरशेतातील विहिरीत आढळला बिबट्या मृतावस्थेत..

शेतातील विहिरीत आढळला बिबट्या मृतावस्थेत..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
चंद्रपूर :-चिमूर वनपरिक्षेत्रातील मुरपार उपक्षेत्रातील मिनझरी शिवारातील शेतातील विहिरीमध्ये पडून, एका बिबट (मादी) चा मृत्यू झाल्याची घटना काल सोमवारी उघडकीस आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.चिमूर तालुक्यातील मिनझरी गावापासून एक किलोमिटर अंतरावर प्रकाश श्रीराम पोहनकर यांचे शेत आहे.काल सोमवारी सकाळी मिनझरी नियतक्षेत्राचे वनरक्षक आपल्या सहकाऱ्यांसह गस्त घालत होते.दरम्यान,त्यांना पोहनकर यांच्या शेतातील विहिरीमध्ये बिबट पडून मृत्यू झाल्याचे सकाळच्या सुमारास दिसून आले.सदर घटनेची माहिती वनपरिक्षेत्र अधिकारी (प्रादेशिक) चिमूर यांना मिळताच ते चमुसह घटनास्थळी दाखल झाले.त्यांनी सदर घटनेची पाहणी केली असता,बिबट मादी ही विहिरीमध्ये मृतावस्थेत आढळून आली.ब्रम्हपुरी वनविभाग उपवनसंरक्षक,ब्रम्हपुरी वनविभाग सहाय्यक वनसंरक्षक (तेंदू) यांना देण्यात आली. मानद वन्यजीव रक्षक तसेच पर्यावरणवादी मंडाळाचे प्रतिनिधी घटनास्थळी हजर झाल्यावर त्यांच्या समक्ष पंचनामा करण्यात आला.वन्यजीव (संरक्षण) अधिनियम १९७२ चे कलमान्वये वनगुन्हा दाखल करण्यात आला आहे.मृत बिबट (मादी) चा शव वनविश्राम गृह खडसंगी येथे नेण्यात आला.सहाय्यक आयुक्त पशुसंवर्धन नागभीड,पशुधन विकास अधिकारी नागभीड व पशुधन विकास अधिकारी चिमूर यांच्याहस्ते सर्वासमक्ष शवविच्छेदन करुन रासायनिक विश्लेषणाकरिता विसेरा घेण्यात आला. तसेच त्याच ठिकाणी सर्वांसमक्ष त्याचे
दहन करण्यात आले.बिबट (मादी) चे अंदाजे वय ६ वर्षाचे असून; त्यांचे सर्व अवयव शाबूत होते. वन्यप्राणी बिबट (मादी) शिकारीच्या शोधात वन्यप्राण्यांच्या मागावर भटकत असतांना विहिरीत पडून पाण्यात बुडाल्यामुळे मृत पावला असावा,असा प्राथमिक अंदाज वन विभागाने वर्तवला आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

२२ मिनी सेतू केंद्रचालकांची भरती प्रक्रिया; अंतिम पात्र-अपात्र यादी प्रसिद्ध..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील १३ ‘दादालोरा खिडकी’ आणि ९ ‘आदी सेवा केंद्र’ अशा एकूण २२ केंद्रांच्या माध्यमातून नागरिकांना विविध शासकीय व लोकाभिमुख सेवा पुरविण्यासाठी...

राज्यात दुष्काळ जाहीर करण्याच्या हालचालींना वेग..

उद्रेक न्युज वृत्त :-यंदा पावसाने दडी मारल्याने महाराष्ट्र राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये दुष्काळ सदृश्य परिस्थिती उद्भवलेली आहे.अस्मानी संकटामुळे शेतकरी बांधव हवालदिल झाला आहे.राज्यात पावसाने घेतलेली...

सिंदेवाही प्रेस क्लबची नवीन कार्यकारिणी घोषित; अध्यक्षपदी प्रशांत गेडाम यांची निवड..

उद्रेक न्युज वृत्त  सिंदेवाही(चंद्रपूर):-चंद्रपूर जिल्ह्याच्या प्रेस क्लब सिंदेवाहीची नवीन कार्यकारिणी नुकतीच जाहीर करण्यात आली.यामध्ये अध्यक्षपदी प्रशांत गेडाम, उपाध्यक्षपदी संतोष नन्नावार तर सचिवपदी सुधाकर गजभिये यांची...

मोबाइलच्या आहारी गेलेल्या विद्यार्थिनीने संपवली जीवनयात्रा; घरातच घेतला गळफास..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-मोबाईलची सवय अल्पवयीन मुलांसाठी जीवघेणी ठरू लागली आहे.पालक समजावण्याचा प्रयत्न करतात,पण काही जणांची स्थिती ऐकायला तयारच नसते आणि अनेकजण टोकाचे पाऊल...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!