Monday, August 3, 2026
Homeबीडचक्क जिल्हाधिकाऱ्यांना तुरुंगात टाकण्याचा आदेश..

चक्क जिल्हाधिकाऱ्यांना तुरुंगात टाकण्याचा आदेश..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
बीड :-भूसंपादनातील रकमेचा मोबदला शेतकऱ्यास देण्यात आला नसल्याने काही दिवसांपूर्वी न्यायालयाने
बीडच्या जिल्हाधिकाऱ्यांचे वाहन जप्त केले होते. अशातच आता पुन्हा थेट जिल्हाधिकारी व लघु पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांना कैद करण्याचे आदेश बीड दिवाणी न्यायालयाच्या
न्यायाधीश (वरिष्ठ स्तर) श्रीमती एस.एस.पिंगळे यांच्या न्यायालयाने दिले आहेत.जिल्हाधिकाऱ्यांच्या विरुद्ध न्यायालयाने वॉरंट काढल्याने एकच खळबळ माजली आहे.बीड जिल्ह्यातील शेतकरी राजेश पोकळे यांची जमीन लघु पाटबंधारे विभाग (स्थानिकस्तर) बीड यांनी प्रकल्पासाठी संपादित केलेली होती.त्याचा मोबदला देण्याचे आदेश २०१८ मध्ये देण्यात आले होते.मात्र त्याची पूर्तता झाली नसल्याने प्रकरण न्यायालयात होते.न्यायालयाने याबाबत आज, सोमवारी आदेश काढून १३ लाख १९ हजाराच्या मोबदल्यासाठी बीडचे जिल्हाधिकारी आणि लघु पाटबंधारे विभागचे कार्यकारी अभियंता यांना कैद करून त्यांच्याकडून मोबदल्याची रक्कम भरणा करून घ्यावी,असे वॉरंट बीडच्या न्या.श्रीमती एस.एस.पिंगळे यांनी काढले.वॉरंटची अंमलबजावणी २१ मार्च पूर्वी करावी,असेही त्यात नमूद केले आहे.दिवाणी कैद म्हणजे,एखाद्या व्यक्तीची प्रलंबित रक्कम फेडेपर्यंत तुरुंगात टाकण्याचा आदेश देणे.हे सहसा तेव्हाच घडते जेव्हा कर्जदार न्यायालयाच्या आदेशाचे पालन करीत नाही व अयशस्वी ठरतो.यात ज्याचे पैसे येणे आहेत ती व्यक्ती दिवाणी अटकेची मागणी करते,त्यासाठीचा खाणे पिणे,इतर भत्ता देखील न्यायालयात भरणा करणे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

आता “पोलीस पाटी” अथवा “पोलीस” नाव लिहिलेल्या खासगी वाहनांवर होणार कारवाई..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-राज्यातील बरेचसे पोलीस अधिकारी व कर्मचारी त्यांच्या खासगी दुचाकी वा चारचाकी वाहनांवर 'पोलीस' असे लाल अक्षरात लिहिणे किंवा तशी पाटी लावून...

तलावात बुडालेल्या तरुणाचा आज सापडला मृतदेह..

उद्रेक न्युज वृत्त  कुरखेडा(गडचिरोली):-कुरखेडा तालुक्याच्या धानोरी गावातील २२ वर्षीय तरुण काल रविवारच्या सायंकाळी गाव तलाव परिसरात आंघोळ करण्यासाठी उतरला असता क्षणात दिसेनासा झाल्याने परिसरात एकच...

गडचिरोली जिल्हा माहिती अधिकारी जाधव यांची बदली..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-गडचिरोलीचे जिल्हा माहिती अधिकारी गजानन जाधव यांची प्रशासकीय कारणास्तव नांदेड येथे बदली करण्यात आली असून आज,सोमवार ३ ऑगस्ट रोजी त्यांना गडचिरोली...

सावधान..! तुमच्याही बँक खात्याचा होऊ शकतो सायबर फसवणुकीसाठी गैरवापर.. – नागरिकांनी आपले बैंक खाते,एटीएम कार्ड,पासबुक कुणालाही वापरण्यासाठी देऊ नये.. – आपले बँक खाते...

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्याच्या विविध जिल्ह्यात मागील काही दिवसांत सायबर गुन्हेगारीचा नवीनच गंभीर प्रकार समोर आला आहे.यामध्ये अनेक बँक खातेधारक अडकल्याचे स्पष्ट झाले...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!