Friday, August 28, 2026
Homeआरमोरीशेतातील चिखलात फसला ट्रॅक्टर; काढण्यासाठी केला प्रयत्न अन् चालक झाला ठार..-आरमोरी तालुक्याच्या...

शेतातील चिखलात फसला ट्रॅक्टर; काढण्यासाठी केला प्रयत्न अन् चालक झाला ठार..-आरमोरी तालुक्याच्या ठाणेगाव येथील घटना..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त

आरमोरी(गडचिरोली) :- शेतीकाम करण्यास जात असलेले ट्रॅक्टर शेतातील चिखलात फसल्याने ते काढण्याच्या प्रयत्नात ट्रॅक्टर उलटला गेल्याने चालकाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना काल २ फेब्रुवारी रोजी दुपारी १ वाजताच्या सुमारास आरमोरी तालुक्यातील ठाणेगाव शेतशिवारात घडली.सुरेश दुधराम लट्ठे वय ५० वर्षे रा.ठाणेगाव, असे मृत ट्रॅक्टर चालकाचे नाव आहे.

 प्राप्त माहितीनुसार मृतक रमेश लट्ठे हा दुपारच्या सुमारास ठाणेगाव येथील शेतशिवारातील शेतीकाम करण्यासाठी जात होता.दरम्यान ऋषिजी नैताम यांच्या शेतातच अचानक शेतातील खोल चिखलात ट्रॅक्टर फसल्या गेले.फसलेला ट्रॅक्टर चिखलातून बाहेर काढण्यासाठी ट्रॅक्टरच्या चाकात लाकडी बल्ली टाकून काढण्याचा प्रयत्न केला.मात्र याचवेळी ट्रॅक्टवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने ट्रॅक्टर अचानक उलटले.यात ट्रॅक्टरखाली चिखलात चालक दबल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला.घटनेची माहिती ग्रामस्थांना मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली.त्यानंतर याबाबतची माहिती आरमोरी पोलिसांना दिली.पोलिसांनी घटनास्थळ गाठून ट्रॅक्टरखाली दबलेला मृत्यदेह गावकऱ्यांच्या मदतीने बाहेर काढला.पुढील तपास आरमोरी पोलिस करीत आहेत.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

गरोदर मातेला नेले झोळीतून; घटनेनंतर प्रशासनाला आली जाग.. -आता कोईदूळ नाल्यावरील पुलाचा प्रश्न मार्गी लागणार..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्याच्या एटापल्ली तालुक्यातील कोईदूळ गावातील रहिवासी छाया सुरेश नैताम वय २६ वर्षे यांना आज,शुक्रवार २८ ऑगस्ट रोजी पहाटेच्या सुमारास प्रसूती कळा सुरू...

सोशल मीडियावर जातीवाचक वक्तव्य करणे कराळे मास्तरला चांगलेच भोवले; अटक करून कारागृहात रवानगी..

उद्रेक न्युज वृत्त  वर्धा :-वर्ध्यातील 'फिनिक्स अकॅडमी'चे संचालक, सामाजिक कार्यकर्ते तथा सोशल मीडिया इन्फ्लुएंसर असलेले कराळे मास्तर यांना सोशल मीडियावर एका विशिष्ट समाजाविषयी जातीवाचक वक्तव्य...

आता मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींची जबाबदारी नेमकी कोणाकडे? -तसेही “सरपंच-प्रशासक” बिन पगारी अन् फुल्ल अधिकारीच..

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्य शासनाने गावगाडा हाकणाऱ्या पदाधिकाऱ्यांना मोठा दिलासा देत शनिवार २१ फेब्रुवारी २०२६ रोजी महाराष्ट्र राज्यातील ज्या ग्रामपंचायतींची मुदत संपली वा...

राज्यमंत्री ॲड.आशिष जयस्वाल यांच्या अंगरक्षकावर महिलेचा लैंगिक शोषणाचा आरोप; पोलिसांत गुन्हा दाखल..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-राज्याचे वित्त व नियोजन,कृषी,मदत व पुनर्वसन,विधि व न्याय,कामगार राज्यमंत्री तथा गडचिरोली जिल्ह्याचे सहपालकमंत्री ॲड.आशिष जयस्वाल यांच्या ३८ वर्षीय अंगरक्षकाने(पोलीस कर्मचारी)एका विवाहित...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!