- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
चंद्रपूर :-नागरिकांना वेळेत व तात्काळ शासकीय प्रमाणपत्रे मिळावीत,यासाठी ऑनलाईन सेतू केंद्रे सुरू करण्यात आली आहेत.मात्र,काही सेतू केंद्र चालक मनमानी कारभार करून शासकीय शुल्काव्यतिरिक अतिरिक्त रक्कम घेतांना दिसून येतात.अश्यांना धडा शिकवणे गरजेचे मानून एका सुजाण नागरिकाने लाच लुचपत प्रतिबंधक विभागाचा((एसीबी)आधार घेतला आणि केंद्र चालकाला चांगलाच धडा शिकवला.विशेष म्हणजे,शासकीय शुल्क होते ६९ रुपये,तर ८१ रुपये होते वरची कमाई.केवळ दीडशे रुपयांची लाच घेतल्याप्रकरणी चंद्रपूर लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने सेतू केंद्र चालकास रंगेहाथ पकडले.सचिन रामचंद्र खैरे वय ४० वर्षे,रा.गडचांदूर,ता.कोरपना, जि.चंद्रपूर असे लाच घेतांना रंगेहाथ पकडण्यात आलेल्या सेतू केंद्र चालकाचे नाव आहे.
प्रकरणातील तक्रारदारास उत्पन्नाच्या दाखल्याची आवश्यकता असल्याने गडचांदूर येथील ‘त्रिशा ऑनलाइन सर्व्हिसेस’ नामक सेतू केंद्रातून कागदपत्रे ऑनलाईन केली.ज्यावेळेस तक्रारदाराला दाखला घेणे होता,त्यावेळी केंद्र चालकाने दोनशे रुपयांची मागणी केली.प्रकरणी तक्रारदाराने चंद्रपूर लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली.त्यानुसार, काल सोमवार ७ सप्टेंबर रोजी तक्रारीची पंचांसमक्ष पडताळणी करून सापळा रचण्यात आला.सापळा कारवाई दरम्यान तक्रारदाराकडून ६९ रुपये शासकीय शुल्क व ८१ रुपये लाचेची रक्कम,असे एकूण १५० रुपये स्वीकारतांना सेतू केंद्र चालक सचिन खैरे यांना रंगेहात पकडण्यात आले.सदरची कारवाई ही सायंकाळच्या सुमारास करून या प्रकरणी भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वये गडचांदूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
- Advertisement -

