Friday, September 11, 2026
Homeभंडाराशासकीय रेती डेपोंची चौकशी कंप्लीट; आता अधिकाऱ्यांचे भवितव्य विभागीय आयुक्तांच्या अहवालावर..

शासकीय रेती डेपोंची चौकशी कंप्लीट; आता अधिकाऱ्यांचे भवितव्य विभागीय आयुक्तांच्या अहवालावर..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
भंडारा :-जिल्ह्याच्या तुमसर व मोहाडी तालुक्यात शासकीय रेती डेपोवर नियमांना बाजूला सारून आपलाच मनमानी कारभार चालवला जात आहे व परिसरात अवैध रेती तस्करी जोमाने सुरू असूनही अनेकांचे साटेलोटे या ठिकाणी उदयास आले असल्याचे नुकतेच पार पडलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात आमदार नाना पटोले तसेच जयंत पाटील यांनी मुद्दा उचलून धरल्याने महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विभागीय आयुक्त कार्यालयामार्फत सखोल चौकशी करण्याचे आदेश दिले होते.त्यानुसार आता तुमसर व मोहाडी तालुक्यातील शासकीय रेती डेपोंची नुकतीच चौकशी करण्यात आली आहे.अर्थसंकल्पीय अधिवेशनात
महसूल विभागातील वरिष्ठ अधिकारी व एका सेवानिवृत्त महसूल अधिकाऱ्याचे नाव आल्याने एकच खळबळ उडाली होती.महसूल मंत्र्यांनी आपल्या उत्तरात तुमसर व मोहाडी तालुक्यातील शासकीय रेती डेपोची चौकशी विभागीय आयुक्त कार्यालया मार्फत करण्याची घोषणा केली.रेती चोरीमुळे राज्य शासनाच्या महसूल मोठ्या प्रमाणात बुडत आहे.या पार्श्वभूमीवर आता महसूल विभाग कोणती कारवाई करणार,दोषींवर कठोर पावले उचलली जातात का? याकडे जनतेचे लक्ष लागले आहे.राज्याचे महसूल सचिव प्रत्येक जिल्ह्याच्या महसूल प्रशासनास महसूल गोळा करण्याचे उद्दिष्ट देतात.तुमसर तालुक्याला १३ कोटींचे महसूल जमा करण्याचे उद्दिष्ट दिले होते.ते उद्दिष्ट पूर्ण करण्यात आले नाही,अशी चर्चा सुरू आहे. तुमसर व मोहाडी तालुक्यातील नदीपात्रात उच्च गुणवत्तेची रेती उपलब्ध असून,तिला शहरात मोठी मागणी आहे.येथील रेती चोरीमुळे राज्य शासनाच्या महसूल मोठ्या प्रमाणात बुडत असल्याने महसूल विभागाने येथे कडक कारवाई करण्याचे ठरविल्याची माहिती आहे.नागपूर विभागीय आयुक्त कार्यालयातील अधिकाऱ्यांनी मोका चौकशी करून संपूर्ण माहिती जाणून घेतली असून सदरचे अधिकारी विभागीय आयुक्त नागपूर यांना अहवाल सादर करणार आहेत. त्यानंतर विभागीय आयुक्त सदर अहवाल हा राज्याच्या आयुक्तांना सादर करणार असल्याने आता विभागीय आयुक्तांच्या अहवालावरच साटेलोटे असणाऱ्या अधिकाऱ्यांचे भवितव्य ठरणार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

आता ग्रामपंचायतींचा प्रशासकीय कारभार विस्तार अधिकाऱ्यांकडे; विस्तार अधिकारी बनले प्रशासक..

उद्रेक न्युज वृत्त :-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली आणि ग्रामविकास व पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामीण भागातील स्थानिक स्वराज्य संस्थांचा कारभार सुरळीत...

नैनपूरच्या महात्मा गांधी शाळेत तान्हा पोळ्याचा अनोखा सोहळा; विद्यार्थ्यांच्या कलाविष्काराने जिंकली उपस्थितांची मने..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-शिक्षणासोबत संस्कार, संस्कृतीसोबत सामाजिक जाणीव आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला प्राधान्य देणाऱ्या महात्मा गांधी नगर परिषद उच्च प्राथमिक शाळा,नैनपूर वॉर्ड,देसाईगंज येथे आज,शुक्रवार ११...

बापरे..! तरुणाने स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखेतून फिल्मी स्टाईलने पळवली रोकड.. – बँक कर्मचाऱ्यांच्या डोळ्यात फेकली मिरची पूड; व्हिडिओ व्हायरल..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-एका २८ वर्षीय तरुणाने स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखेत प्रवेश करून आव-डाव पाहिला अन् बँकेतील उपस्थित कर्मचाऱ्यांच्या डोळ्यात लाल मिरचीची पूड...

विवाहाचे प्रमाणपत्र देण्यासाठी मागितले दोन हजार; लीपिकास ऑफिसमध्येच पकडले एसीबीने..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-विवाहाचे प्रमाणपत्र देण्यासाठी आरोग्य खात्यातील लीपिकाने शासकीय फी व्यतिरिक्त अतिरिक्त लाचेच्या रकमेची मागणी केल्याप्रकरणी मुंबई लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या(ACB) पथकाने सापळा...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!