Friday, September 11, 2026
Homeगडचिरोलीअखेर वैद्यकीय सेवेचे कौतुक झालेले डॉक्टर निलंबित..

अखेर वैद्यकीय सेवेचे कौतुक झालेले डॉक्टर निलंबित..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-पैश्याच्या लालचेने डॉ.संभाजी
भोकरे याने सर्वकाही मिळवलेली प्राण प्रतिष्ठा गमावून बसली आहे.मागील वर्षाच्या जुलै महिन्यात वैद्यकीय सेवेचे कौतुक झालेले डॉ.भोकरे याला निलंबित करण्यात आले आहे.भोकरे याने लाच स्वीकारली अन् अलगदच एसीबीच्या सापळ्यात अडकला.भामरागड तालुक्याच्या लाहेरी प्राथमिक आरोग्य केंद्रातील एका आरोग्य सहाय्यकाचे फेब्रुवारी २०२४ ते सप्टेंबर २०२४ व नोव्हेंबर महिन्यातील १४ दिवसांचे थकीत पगाराचे पुरवणी बिल मंजूर करण्याकरीता कार्यालयीन प्रमुख म्हणून डॉ.संभाजी भोकरे याचे ना हरकत प्रमाणपत्र आवश्यक होते.प्रमाणपत्रासाठी डॉ.भोकरे याने २ मार्च २०२५ रोजी १ लाख ५० हजार रुपयांची मागणी केली.तडजोडीअंती १ लाख ३० हजार रुपये देण्याचे ठरले.मात्र,तक्रारदारास लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभाग गडचिरोली येथे तक्रार नोंदवली. त्यानुसार मंगळवारी २५ मार्चला एसीबीच्या पथकाने पडताळणी केली. तडजोडीअंती १ लाख ३० हजार रुपये बुधवार २६ मार्च रोजी डॉ.संभाजी भोकरे याने लाच स्वीकारताच लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने झडप घालून आरोपी वैद्यकीय अधिकारी डॉ.भोकरे याच्या विरूध्द पोलीस स्टेशन गडचिरोली येथे गुन्हा दाखल करून अटक केली होती.त्यानुसार डॉ.भोकरे यांस नुकतेच जिल्हा परिषदेने तडकाफडकी निलंबित केले आहे.भोकरे यास गडचिरोली जिल्हा न्यायालयात हजर केले असता न्यालयाने त्याला एक दिवसाची पोलिस कोठडी सुनावली.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

आता ग्रामपंचायतींचा प्रशासकीय कारभार विस्तार अधिकाऱ्यांकडे; विस्तार अधिकारी बनले प्रशासक..

उद्रेक न्युज वृत्त :-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली आणि ग्रामविकास व पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामीण भागातील स्थानिक स्वराज्य संस्थांचा कारभार सुरळीत...

नैनपूरच्या महात्मा गांधी शाळेत तान्हा पोळ्याचा अनोखा सोहळा; विद्यार्थ्यांच्या कलाविष्काराने जिंकली उपस्थितांची मने..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-शिक्षणासोबत संस्कार, संस्कृतीसोबत सामाजिक जाणीव आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला प्राधान्य देणाऱ्या महात्मा गांधी नगर परिषद उच्च प्राथमिक शाळा,नैनपूर वॉर्ड,देसाईगंज येथे आज,शुक्रवार ११...

बापरे..! तरुणाने स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखेतून फिल्मी स्टाईलने पळवली रोकड.. – बँक कर्मचाऱ्यांच्या डोळ्यात फेकली मिरची पूड; व्हिडिओ व्हायरल..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-एका २८ वर्षीय तरुणाने स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखेत प्रवेश करून आव-डाव पाहिला अन् बँकेतील उपस्थित कर्मचाऱ्यांच्या डोळ्यात लाल मिरचीची पूड...

विवाहाचे प्रमाणपत्र देण्यासाठी मागितले दोन हजार; लीपिकास ऑफिसमध्येच पकडले एसीबीने..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-विवाहाचे प्रमाणपत्र देण्यासाठी आरोग्य खात्यातील लीपिकाने शासकीय फी व्यतिरिक्त अतिरिक्त लाचेच्या रकमेची मागणी केल्याप्रकरणी मुंबई लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या(ACB) पथकाने सापळा...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!