- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
देसाईगंज(गडचिरोली):-कोरोना कालावधीत देशातील पथविक्रेते आर्थिक अडचणीत सापडले होते. याची दखल घेऊन पथविक्रेत्यांना भांडवल मिळावे, यासाठी केंद्र शासनाने पथविक्रेत्यांनी पंतप्रधान पथविक्रेता आत्मनिर्भर निधी( पीएम स्वनिधी)योजना सुरू केली होती.याचा लाभ देशातील कोट्यावधी पथविक्रेत्यांना झाला.या योजनेचा कालावधी यापुर्वी ३१ डिसेंबर २०२४ पर्यंत होता.त्यामुळे अनेक पथविक्रेत्यांना आर्थिक अडचणीत सापडले होते.याची दखल घेऊन केंद्र सरकारने सदर योजनेचा कालावधी वाढवून ही योजना ३१ मार्च २३० पर्यंत सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे देसाईगंज शहरातील फेरीवाले,लघु उद्योजक व त्यांचे कुटुंबांना या योजनेचा लाभ घेणे अधिक सोयीचे ठरणार आहे.या योजनेअंतर्गत पहिल्या टप्प्यातील कर्ज मर्यादा पूर्वी १० हजार रुपये इतकी होतीती आता १५ हजार रुपये करण्यात आली आहे.दुसऱ्या टप्प्यातील कर्ज मर्यादा २० हजारांवरून २५ हजार रुपये करण्यात आली असून,तिसऱ्या टप्प्यातील कर्ज मर्यादा ५० हजार रुपये एवढी निश्चित करण्यात आली आहे.याशिवाय, योजनेचा लाभ घेणाऱ्या आणि वेळेवर कर्ज परतफेड करणाऱ्या फेरीवाल्यांना यूपीआय-लिंक्ड रूपे क्रेडिट कार्ड देण्यात येणार आहे.त्याद्वारे पथविक्रेत्यांना अचानक उद्भवणाऱ्या व्यवसायिक व वैयक्तिक गरजांसाठी तात्काळ आर्थिक मदत मिळू शकेल.तसेच डिजिटल व्यवहारांवर रुपये १ हजार ६०० रुपयांपर्यंत कॅशबॅक मिळण्याची सुविधाही आहे.या माध्यमातून फेरीवाले व लघुउद्योजकांना डिजिटल पद्धतीने व्यवसाय करण्यास प्रोत्साहन मिळणार आहे.या योजनेचा लाभ घेण्याकरीता तथा अधिक माहितीकरीता देसाईगंज नगर परिषदेच्या शहर अभियान व्यवस्थापन कक्षाशी संपर्क साधावा,असे आवाहन देसाईगंज नगर परिषदेच्या वतीने मुख्याधिकारी सतीश चौधरी यांनी केले आहे.
- Advertisement -

