- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
कुरखेडा(गडचिरोली):-तब्बल तीन महिन्याच्या प्रतिक्षेनंतर कुरखेडा शहरापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या सतीनदीच्या निर्माणाधीन पुलावरून दुचाकी वाहनांची तात्पुरत्या स्वरूपात वाहतूक सुरू झाली आहे. मात्र,येथील तात्पूरत्या स्वरूपात बांधण्यात आलेला पोचमार्ग हा मातीच्या तिव्र उताराचा व कमी रूंदीचा असल्याने वाहनधारकांसाठी धोकादायक ठरू शकतो, त्यामुळे पोचमार्गावरील उतार लांबीसह रूंद करून त्यावर गीट्टी पिचींग करीत मजबुतीकरण करण्यात यावे, अशी मागणी आज,बुधवार २४ सप्टेंबर रोजी सती नदीवरील पुलाची प्रत्यक्ष पाहणी दरम्यान कुरखेडा नगर पंचायतीचे माजी नगराध्यक्ष रविन्द्र गोटेफोडे यांचेसह कुरखेडा उपजिल्हा रुग्ण कल्याण समीतीचे सदस्य विवेक निरंकारी यांनी केली आहे.
राष्ट्रीय महामार्ग कुरखेडा ते कोरची दरम्यानच्या कुरखेडा सतीनदीवरील निर्माणाधीन पुलाच्या बांधकामामुळे जवळपास तीन महिण्यापासून येथील वाहतूक ठप्प असल्याने तालुक्याच्या ग्रामीण भागातील नागरिकांना तालुका मुख्यालय गाठण्याकरीता कमालीचा मनस्ताप सहन करावा लागला.यासाठी तब्बल १५ ते २० कीलोमीटर अंतरावरील फेरा असलेल्या मालदूगी-वाघेडा-आंधळी मार्गे असलेल्या खडतर व खड्डेमय रस्त्याने त्रासदायक प्रवास करावा लागत होता.त्यामुळे निर्माणाधीन पुलाच्या स्लॅबचे बांधकाम होताच मातीचा तिव्र उतार असतांनाही दुचाकी चालकांची या मार्गावर रिघ लागलेली आहे.उताराच्या बाजूला खोल खंदक असल्याने एखादे दुचाकी वाहन घसरून एखाद्याच्या
जीवितास हानी पोहचू शकते.सदर पोचमार्ग तात्पूरत्या स्वरूपात बांधण्यात आलेला असला तरी तिव्र उताराची लांबी वाढवत उतार कमी करण्यात यावा,उताराची रूंदी वाढविण्यात यावी,मजबूतीकरणाकरीता जेएसबी गिट्टीची पीचीग करण्यात यावी व येथील धोकादायक प्रवास टाळण्यात यावा व तातडीने पोचमार्गाचे बांधकाम पूर्ण करीत येथील जडवाहतूक पूर्ववत सूरू होईल याची काळजी घ्यावी,अशी मागणी भाजपा जिल्हामहामंत्री तथा माजी नगराध्यक्ष रविन्द्र गोटेफोडे व किराणा व्यापारी संघटनेचे पदाधिकारी तथा रुग्ण कल्याण समीतीचे सदस्य विवेक निरंकारी यांनी केली आहे.
- Advertisement -

