- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
चंद्रपूर :-देव प्रत्यक्षात दिसत नसला तरीही तो कुणाच्या ना कुणाच्या तरी रुपात अवतरत असतो.हे कथन खोटे नाही तर सत्य आहे,ज्याच्या बाबतीत घडते,त्यालाच ते कळते. ‘काळ आला होता; पण वेळ आली नव्हती’, अशीच काहीशी घटना चंद्रपूर जिल्ह्याच्या सिंदेवाही तालुक्यात काल मंगळवारी दुपारच्या सुमारास घडली. सिंदेवाही तालुक्याच्या लोनवाही परिसरातील रेंगेपार तलाव शिवारात ४० वर्षीय हिवराज धर्माजी मस्के यांनी घरची म्हैस चराईकरीता नेली होती.म्हैस चराई करीत होती,तर हिवराज मस्के बाजूला उभे होते.अश्यातच अचानकपणे जंगल परिसरातून आलेल्या वाघाने त्यांच्या अंगावर झडप घालून ठार करण्याचा प्रयत्न केला. अचानक झालेल्या वाघाच्या हल्ल्याने हिवराज यांना धडकी भरली.त्यातच हिंमत न हारता त्यांनी वाघाशी दोन हात करण्याचा प्रयत्न केला.तितक्यातच चराई करणारी म्हैस हिवराज मस्के यांच्या मदतीला धावून आल्याने वाघाने काढता पाय घेतला आणि म्हैस मालकाचा जीव वाचला.घटनेची माहिती गावात वाऱ्यासारखी पसरली आणि सर्वत्र खळबळ उडाली. वाघाच्या हल्ल्यात हिवराज मस्के हे किरकोळ जखमी झाल्याने त्यांना तात्काळ सिंदेवाही ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले.तिथे प्राथमिक उपचारानंतर त्यांना घरी सोडण्यात आले.
- Advertisement -

