Sunday, June 21, 2026
Homeचंद्रपूरविदर्भ कोकण ग्रामीण बँकेच्या गैरव्यवहार प्रकरणी कर्मचाऱ्यांना अटक..

विदर्भ कोकण ग्रामीण बँकेच्या गैरव्यवहार प्रकरणी कर्मचाऱ्यांना अटक..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
चंद्रपूर :-खातेदार बँकांवर विश्वास ठेवून बँकेतील खात्यांमध्ये पैसा ठेवत असतात.भविष्यातील बचत म्हणून पै-पै जोडून कसे बसे उदरनिर्वाह करून संसाराचा गाडा हाकत असतात.अशातच बँकेतील अधिकारी,कर्मचारीच घबाळ करीत असतील तर विश्वास कुणावर ठेवावा; असा प्रश्न उपस्थित केला जातो आहे.अश्याच प्रकारची घटना चंद्रपूर जिल्ह्याच्या भद्रावती विदर्भ कोकण ग्रामीण बँकेच्या शाखेत नोव्हेंबर २०२४ मध्ये घडली होती.चक्क अधिकाऱ्यानेच विदर्भ कोकण ग्रामीण बँकेच्या भद्रावती शाखेतून ३६ खातेदारांची १ कोटी ७ लाख रुपयांची रक्कम परस्पर स्वतःच्या खात्यात वळती केली होती.त्यानुसार आता शाखा व्यवस्थापक अमोल कठाडे यांच्या तक्रारीवरून भद्रावती पोलिसांनी दोन महिन्यांनी दोन कर्मचाऱ्यांना अटक केली आहे.रजत इटणकर रा. चंद्रपूर व सूरज शाहू रा.नागपूर असे अटकेतील बँक कर्मचाऱ्यांची नावे आहेत.
विदर्भ कोकण ग्रामीण बँकेचे मुख्य शाखा व्यवस्थापक अमोल कठाडे हे १ सप्टेंबर २०२४ पासून १५ दिवसांकरिता रजेवर होते.त्या कालावधीत बँकेचे मुख्य अधिकारी म्हणून रजत इटनकर यांच्याकडे जबाबदारी देण्यात आली.या काळात बँकेच्या ३६ खातेदारांचे १ कोटी ७ लाख रुपयांची रक्कम इटणकर यांनी स्वतःच्या खात्यात व बँकेचे दुसरे कर्मचारी सूरज यांच्या खात्यात वळती केले.ही बाब मुख्य शाखा व्यवस्थापक कठाडे यांच्या लक्षात येताच त्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना याबाबत सूचना दिली.गैरव्यवहाराबाबत ८ नोव्हेंबरला भद्रावती पोलिसात तक्रार दाखल केली.
घटनेचा तपास ठाणेदार अमोल काचोरे यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक पोलिस निरीक्षक संजय मिश्रा यांनी पूर्ण केला.त्यांनी यातील दोन आरोपींना अटक केली असून इटणकर याला न्यायालयीन कोठडी मिळाली तर सुरज शाहू याला दोन दिवसाची पोलिस कोठडी सुनावली आहे.या प्रकरणातील अन्य आरोपींचा सहभाग असल्याची शंका बळावली असल्याने त्या दिशेने पोलीस तपास करीत आहेत.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

माहिती अधिकार कायद्यातील बदलांवर नाराजी; अण्णा उतरणार मैदानात.. – माहिती न देणाऱ्या चोरट्यांचे काय?

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्य सरकारने गेल्या आठवड्यात एक राजपत्र काढून माहिती अधिकार कायद्यात काही महत्त्वाचे बदल केले आहेत.शासनाने १२ जून २०२६ रोजी माहिती...

खतरनाक कारनामा..! नीट परीक्षेच्या विद्यार्थ्याला चक्क परदेशातील दिले परीक्षा केंद्र..

उद्रेक न्युज वृत्त नागपूर :-काही कालावधीपासून पेपरफुटी तसेच शिक्षणाच्या आयचा घो होत असल्याने होतकरू विद्यार्थ्यांचे उज्वल भवितव्य धोक्यात येऊ लागले आहे.पालक वर्ग आपली मुले शिकून...

तीन तिघडा अन् काम बिघडा..! वन परिक्षेत्र अधिकारी,वनरक्षक व खाजगी इसम एसीबीच्या जाळ्यात..

उद्रेक न्युज वृत्त गडचिरोली :-अनेकांना वाटतेय की,एखाद्या तिसऱ्याच व्यक्तींच्या माध्यमातून पैश्याची रक्कम घेतली,तर आपले नाव वा आपली करणी उजेडात येणार नाही.पण,लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तसला...

गडचिरोली जिल्ह्यात जलसंधारणाच्या कामांमुळे लक्षणीय पाणीसाठा निर्माण..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यात मागील दोन वर्षांत विविध योजनांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर जलसंधारणाची कामे करण्यात आली आहेत.या कामांमुळे जिल्ह्यात लक्षणीय पाणीसाठा निर्माण झाला असून...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!