Sunday, June 21, 2026
Homeमुंबईराज्याच्या तिजोरीत खडखडाट; आनंदाचा शिधासह शिवभोजन थाळी बंद करण्याच्या हालचाली..

राज्याच्या तिजोरीत खडखडाट; आनंदाचा शिधासह शिवभोजन थाळी बंद करण्याच्या हालचाली..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
मुंबई :-लाडकी बहीण योजना सुरू झाल्यापासून राज्याच्या तिजोरीवर मोठा आर्थिक भार पडलेला दिसून येतो.महत्वाचे म्हणजे,एकदा सुरू झालेली योजना बंद पाडण्यासाठी सरकारला मोठ्या रोषाला सामोरे जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशातच राज्याच्या तिजोरीत खडखडाट झाल्याने शिवभोजन थाळी आणि आनंदाचा शिधा यांसारख्या योजना बंद करण्याचा विचार सरकार पातळीवर सुरू असल्याचे वृत्त आहे.विशेषतः लाडकी बहीण योजनेमुळे सरकारी तिजोरीवर पडणारा भार हलका करण्यासाठी पुढील आर्थिक वर्षापासून या दोन्ही योजना बंद करण्याच्या हालचाली सुरू आहेत.
लाडकी बहीण योजनेमुळे राज्याच्या तिजोरीवर ९० हजार कोटींचा अतिरिक्त आर्थिक भार आहे. याशिवाय,विविध लोकप्रिय योजनांचाही ताण असल्याने राज्य शासनासमोर तब्बल दोन लाख कोटी रुपयांची तूट उभी असून,आर्थिक गाडा सावरण्यासाठी किमान एक लाख कोटींपर्यंतची तूट भरून काढण्याचे आव्हान अर्थ खात्यासमोर आहे.त्यातच,विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर सुरू करण्यात आलेल्या लाडकी बहीण योजनेची रक्कम पंधराशे रूपयांवरून २१०० करण्याचे आव्हान बाकीच आहे.ही वचनपूर्ती न केल्यास विरोधकांकडून त्याचे राजकीय भांडवल केले जाण्याचा धोका असल्याने लाडक्या बहिणींसाठी गरिबांच्या शिवभोजन थाळी,आनंदाचा शिधा अशा योजना बंद करता येतील का? याची चाचपणी अर्थ खात्याकडून केली जात आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

माहिती अधिकार कायद्यातील बदलांवर नाराजी; अण्णा उतरणार मैदानात.. – माहिती न देणाऱ्या चोरट्यांचे काय?

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्य सरकारने गेल्या आठवड्यात एक राजपत्र काढून माहिती अधिकार कायद्यात काही महत्त्वाचे बदल केले आहेत.शासनाने १२ जून २०२६ रोजी माहिती...

खतरनाक कारनामा..! नीट परीक्षेच्या विद्यार्थ्याला चक्क परदेशातील दिले परीक्षा केंद्र..

उद्रेक न्युज वृत्त नागपूर :-काही कालावधीपासून पेपरफुटी तसेच शिक्षणाच्या आयचा घो होत असल्याने होतकरू विद्यार्थ्यांचे उज्वल भवितव्य धोक्यात येऊ लागले आहे.पालक वर्ग आपली मुले शिकून...

तीन तिघडा अन् काम बिघडा..! वन परिक्षेत्र अधिकारी,वनरक्षक व खाजगी इसम एसीबीच्या जाळ्यात..

उद्रेक न्युज वृत्त गडचिरोली :-अनेकांना वाटतेय की,एखाद्या तिसऱ्याच व्यक्तींच्या माध्यमातून पैश्याची रक्कम घेतली,तर आपले नाव वा आपली करणी उजेडात येणार नाही.पण,लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तसला...

गडचिरोली जिल्ह्यात जलसंधारणाच्या कामांमुळे लक्षणीय पाणीसाठा निर्माण..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यात मागील दोन वर्षांत विविध योजनांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर जलसंधारणाची कामे करण्यात आली आहेत.या कामांमुळे जिल्ह्यात लक्षणीय पाणीसाठा निर्माण झाला असून...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!