- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
मुंबई :-बँकांकडून मिळणारे वाहनकर्ज तसेच गृहकर्ज सर्वसामान्यांना न परवडणारे आहे.त्यातच आता रिझर्व्ह बँकेने पाच वर्षांनंतर पहिल्यांदाच व्याजदर कपातीचा निर्णय घेतला आहे.रिझर्व्ह बँकेने याआधी रेपो दरातील व्याजदर कपात मे २०२० मध्ये केली होती.यानंतर आता फेब्रुवारी २०२५ मध्ये रिझर्व्ह बँकेने रेपो दरात व्याजदर कपात केली आहे.या निर्णयामुळे बँकांकडून मिळणारे गृहकर्ज,वाहनकर्ज आदी प्रकारची कर्ज स्वस्त होण्याची शक्यता आहे.
रिझर्व्ह बँकेच्या सहा सदस्यांच्या मॉनेटरी पॉलिसी कमिटीने आज,शुक्रवार ७ फेब्रुवारीला रेपो दरात पाव टक्का व्याजदर कपात केली आहे.यामुळे रेपो दर ६.५० टक्क्यांवरुन ६.२५ टक्क्यांवर आला आहे.केंद्र सरकारने नव्या करप्रणालीनुसार वार्षिक १२ लाख रुपयांचे उत्पन्न करमुक्त केल्याचे जाहीर केले.या घोषणेला काही दिवस होत नाहीत तोच रिझर्व्ह बँकेने रेपो दरात पाव टक्का व्याजदर कपात केली आहे.या लागोपाठच्या निर्णयांमुळे देशातील आर्थिक उलाढालींना चालना मिळण्याची शक्यता वाढली आहे.देशाचा आर्थिक विकासदर ६.७ टक्के राहील आणि घाऊक बाजारपेठेतील महागाईचा दर हा ४.२ टकक्यांच्या आसपास राहील असा अंदाज रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी जाहीर केला आहे.त्यामुळे आता गृहकर्ज,वाहनकर्ज स्वस्त होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
- Advertisement -

