- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
गडचिरोली :-शेतशिवारामध्ये जखमी अवस्थेत आढळून आलेल्या वाघास पकडुन उपचारासाठी चंद्रपूर येथे पाठविण्यात आले असून त्यावर पुढील उपचार सुरू असल्याची माहिती गडचिरोली वन विभागाचे उपवनसंरक्षक शैलेश मिना यांनी दिली.
याबाबत अधिक माहिती अशी की,गडचिरोली वनविभागातील चातगांव परीक्षेत्रातील अमिर्झा उपक्षेत्र मधील आंबेशिवनी नियतक्षेत्रात शेतशिवारामध्ये काल,गुरुवारी ६ फेब्रुवारीला वनपरीक्षेत्र अधिकारी चातगांव व आरआरटी टिम यांना एक वाघ जखमी अवस्थेत आढळून आल्याने सदर घटनेची माहिती तात्काळ वरीष्ठ कार्यालयास देण्यात आली.त्यानुसार वरीष्ठ कार्यालयाच्या सुचनेनुसार वाघावार रात्रभर पाळत ठेऊन आज, शुक्रवार ७ फेब्रुवारीला सकाळी ११ वाजता जखमी वाघास जेरबंद करण्यात आले.त्यानंतर एनटीसीएच्या मार्गदर्शक सुचनेनुसार व वरीष्ठांच्या आदेशानुसार वाघास पुढील उपचाराकरीता चंद्रपुर येथे पाठविण्यात आले.वाघाच्या जखमांची कारणमिमांसा पशुवैद्यकीय अधिकारी टीटीसी चंद्रपुर येथे तपासणी झाल्यानंतर पुढे येणार आहे.सदरची कार्यवाही गडचिरोलीचे उपवनसंरक्षक शैलेश मिना,अंबरलाल मडावी सहाय्यक वनसंरक्षक (जंकास) यांच्या मार्गदर्शनाखाली चातगांवचे वनपरीक्षेत्र अधिकारी सुनील सोनटक्के,आरआरटी टिम,नवेगांव-नागझिरा स्थित साकोली यांचे उपस्थितीत पार पडली.सदर घटनेचा तपास सुनिल सोनटक्के यांचेसह कर्मचाऱ्यांच्या नियंत्रणाखाली सुरु आहे.
- Advertisement -

