Saturday, September 5, 2026
Homeगडचिरोलीई-केवायसी न केल्यास राशन होणार बंद..! - गडचिरोली जिल्ह्यात ३ लाखाच्या वर...

ई-केवायसी न केल्यास राशन होणार बंद..! – गडचिरोली जिल्ह्यात ३ लाखाच्या वर सदस्यांची ई-केवायसी प्रलंबित..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-शासनाच्या आदेशानुसार सर्व अंत्योदय व प्राधान्य योजनेच्या सर्व शिधापत्रीकाधारकांनी आपल्या शिधापत्रीकेमधील सर्व सदस्यांची ई-केवायसी करणे आवश्यक आहे.यासाठी विशेष मोहीम सुरु असुन,येत्या २८ फेब्रुवारी २०२५ पर्यंत ई केवायसी न केल्यास,धान्य मिळणार नाही.यासाठी सर्व शिधापत्रीकाधारकांनी रास्तभाव दुकानात जावून ई-केवायसी करावी,असे आवाहन गडचिरोली जिल्हा पुरवठा अधिकारी प्रकाश पाटील यांनी केले आहे. तसेच नो नेटवर्क झोनमधील गावाकरीता,नेटवर्क असलेल्या ठिकाणी विशेष कॅम्प आयोजीत करुन ई-केवायसी करुन घेण्याबाबत तहसिलदार यांना आदेश देण्यात आले आहेत.
ई-केवायसी प्रक्रिया करण्यासाठी रास्तभाव दुकाने पुर्णवेळ सुरु ठेवावी.जिल्हा पुरवठा कार्यालयाकडून प्रत्येक महिण्यातील १ तारखेपर्यंत जिल्ह्यातील सर्व रास्तभाव धान्य दुकानात,लाभार्थ्यांकरीता धान्य उपलब्ध करुन देण्यात येते.प्रत्येक महिण्याच्या ७ तारखेला अन्नदिवस साजरा केला जातो,त्या दिवसापर्यंत जास्तीत जास्त लाभार्थ्यांनी धान्याची उचल करावी.तसेच ७ ते १५ तारखेपर्यंत अन्न सप्ताह साजरा केल्या जातो.त्यामुळे १५ तारखेपर्यंत रास्तभाव धान्य दुकानामधुन १०० टक्के लाभार्थ्यांनी धान्याची उचल करावी,असेही जिल्हा पुरवठा अधिकारी यांनी आवाहन केले आहे.
गडचिरोली जिल्ह्यातील अंत्योदय व प्राधान्य योजनेच्या गटातील शिधापत्रीकाधारकांना मोफत रेशनधान्य देण्यात येते,यासाठी सर्व लाभार्थ्यांची आधारशी निगडीत ई केवायसी रास्तभाव धान्य दुकानात होणे बंधनकारक आहे.’वन नेशन वन रेशन’ उपक्रमात देशभरात ज्या ठिकाणी लाभार्थी धान्य घेत आहेत.त्याच दुकानात त्यांची ई-केवायसी होणे अनिवार्य आहे.गडचिरोली जिल्ह्यात अंत्योदय व प्राधान्य योजनेच्या एकुण २२३९०५ शिधापत्रीका असुन ८४१८५१ सदस्य आहेत.त्यापैकी ५२१७१५ सदस्यांची इ-केवायसी पूर्ण झाली आहे.उर्वरीत ३२०१३६ शिधापत्रीकेतील सदस्यांची ई-केवायसी प्रलंबित आहे.त्यामुळे प्रलंबित असलेल्या सदस्यांनी तात्काळ ई-केवायसी करून घ्यावी; अन्यथा राशन मिळणे बंद होणार आहे.
नोंदणीकृत स्थलांतरीत व असंघठीत कामगारांना ई-श्रम पोर्टलवरील नोंदणीनुसार रेशन कार्ड वितरीत करण्यात येणार आहे.ज्या कामगारांकडे अजुनही रेशनकार्ड नाही,त्यांनी तातडीने तहसील कार्यालयामध्ये अर्ज करावा,त्यांना तातडीने रेशनकार्ड वितरीत करण्यात येईल,असे गडचिरोली जिल्हा पुरवठा अधिकारी यांनी कळविले आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

गांजाची वाहतूक; तब्बल ५ किलो ७४९ ग्रॅम गांजा जप्त,दोघेजण अटकेत..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-जिल्ह्याच्या बल्लारपूर-बामणी मार्गावर सापळा रचून पोलिसांनी ओडिशातून आणलेला तब्बल ५ किलो ७४९ ग्रॅम गांजा जप्त केला.कारवाईत दोन आरोपींना ताब्यात घेण्यात आले...

शिक्षक दिन व शिष्यवृत्ती पात्र विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा उत्साहात.. -शिष्यवृत्ती परीक्षेत देसाईगंज नगर परिषद शाळेचे १४ विद्यार्थी पात्र..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-शिक्षकांच्या कार्याचा गौरव आणि विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेला प्रोत्साहन देणारा प्रेरणादायी सोहळा आज,शनिवार ५ सप्टेंबर रोजी नगर परिषद देसाईगंजच्या वतीने शिक्षक दिनानिमित्त उत्साहपूर्ण वातावरणात...

बँकेचा कर्मचारी लोकसेवकाच्या व्याख्येतच बसत नाही; तर शासकीय कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल कसा होणार? – न्यायालयाने आरोपीवरील दाखल गुन्हे केले रद्द..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-बँकेचा कर्मचारी लोकसेवकाच्या व्याख्येतच बसत नाही; तर शासकीय कामात अडथळा आणला वा हल्ला केल्याचा गुन्हा दाखल तरी कसा होणार? असे म्हणत...

शिक्षक दिन उत्साहात संपन्न; ‘ज्ञानमित्र’ उपक्रमातून विद्यार्थी बनले विद्यार्थ्यांचे शिक्षक..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-देसाईगंजच्या महात्मा गांधी नगर परिषद उच्च प्राथमिक शाळा,नैनपूर वॉर्ड येथे आज,शनिवार ५ सप्टेंबरला शिक्षक दिन व स्वयंशासन दिन उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!