Thursday, April 16, 2026
Homeनागपूरपोलीस विभागात चालले तरी काय? चक्क महिला पोलिस उपनिरीक्षक अडकली एसीबीच्या जाळ्यात...

पोलीस विभागात चालले तरी काय? चक्क महिला पोलिस उपनिरीक्षक अडकली एसीबीच्या जाळ्यात…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
नागपूर :-एरवी पोलीस खात्याला लाच स्वीकारण्याचे ग्रहण लागले की काय? असा प्रश्न पडला आहे. ज्यांच्या खांद्यावर जनतेची सेवा करण्याची मोठी जबाबदारी आहे; असे सदरक्षणाय पैश्याच्या नादात कमावलेली इज्जत बेइज्जत करू लागल्याचा प्रकार हल्ली उघडकीस येऊ लागला आहे.नुकतेच एका जमीन प्रकरणात गुन्हा दाखल न करण्याच्या बदल्यात कोराडी पोलिस ठाण्यातील सहाय्यक पोलिस निरीक्षकास दोन लाखांची लाच घेतांना एसीबीच्या पथकाने बुधवारी दुपारच्या सुमारास रंगेहाथ अटक केल्याची घटना ताजी असतांनाच परत पुन्हा एकदा भ्रष्टाचारी तत्त्वांचा मुद्दा एमआयडीसी बुटीबोरी पोलिस ठाण्याच्या आवारात समोर आला आहे.चक्क महिला पोलिस उपनिरीक्षकाने चोरीच्या गुन्ह्यात आरोपी न करण्यासाठी एक लाख रुपयांची लाच मागत ३० हजार रुपये घेतल्या प्रकरणी एसीबीच्या जाळ्यात अडकल्याची घटना काल, गुरुवारी ६ फेब्रुवारीला सायंकाळच्या सुमारास घडली.प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती.ज्योत्स्ना प्रभू गिरी वय ३४ वर्षे असे अटक करण्यात आलेल्या महिला पोलीस उपनिरीक्षकाचे नाव आहे.
ज्योत्स्ना गिरी यांनी तक्रारकर्त्यास एका चोरीच्या गुन्ह्यातून निर्दोष सुटका करण्याकरीता लाचेची मागणी केली.त्यानुसार २६ वर्षीय तरुणास ठाण्यात बोलावून एक लाख रुपयाची मागणी करून त्याच्याकडील हिसकावून घेतलेला मोबाईल परत देण्याचे मान्य केले. तक्रारकर्त्यास लाच देण्याची मुळीच इच्छा नसल्याने त्याने याबाबत नागपुरातील एसीबीच्या कार्यालयात तक्रार दाखल केली.गिरी यांनी एक लाख रुपयांच्या बदल्यात ३० हजार रुपये घेण्याची तयारी दर्शविली. त्यानुसार एसीबीने काल गुरुवारी सापळा रचून ३० हजार रुपये घेतांना ज्योत्स्ना गिरी यांना रंगेहाथ अटक केली. गिरी ह्या मागील काही दिवसांपासून एमआयडीसी बुटीबोरी ता.हिंगणा पोलिस ठाण्यात गुन्हे प्रकटीकरण प्रमुखपदी कार्यरत होत्या.सदरची कारवाई एसीबीचे पोलिस अधीक्षक डॉ.दिगंबर प्रधान,अप्पर पोलिस अधीक्षक संजय पुरंदरे यांच्या मार्गदर्शनात उपअधीक्षक राकेश साखरकर,पोलिस निरीक्षक प्रशांत केदार, हवालदार पंकज घोडके,महेश सेलोकर,कांचन गुलबासे, सचिन किन्हेकर,प्रिया नेवारे यांच्या पथकाने केली.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

उष्णतेची लाट; उद्याला ‘या’ जिल्ह्यातील सर्व अंगणवाडी,प्राथमिक व माध्यमिक शाळा राहणार बंद..

उद्रेक न्युज वृत्त  वर्धा :-राज्याच्या विविध भागात उन्हाची तीव्रता वाढली आहे.भारतीय हवामान विभागाने आज,बुधवार १५ एप्रिल रोजी वर्धा जिल्ह्यास उष्णतेचा 'यलो अलर्ट' जाहीर केला होता.अश्यातच...

उद्याला सहपालकमंत्री ॲड.आशिष जयस्वाल गडचिरोलीत..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-राज्याचे वित्त,नियोजन,कृषी,मदत व पुनर्वसन,विधी व न्याय,कामगार राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे सहपालकमंत्री ॲड.आशिष जयस्वाल हे उद्या,गुरुवार १६ एप्रिल रोजी गडचिरोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत...

बिबट्याच्या हल्ल्यात चिमुकली ठार; आजची घटना..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-जिल्ह्याच्या साकोली तालुक्यातील परिसरात वाघिणीने धुमाकूळ घालून गुरुवार,१९ मार्च २०२६ रोजी बाम्पेवाडा येथील ५० वर्षीय वसंत गणपत मेश्राम यांचा जीव घेतला...

आता प्रत्येक लाभार्थी कुटुंबास मिळणार तीन लिटर रॉकेल..

उद्रेक न्युज वृत्त :-जमाना कितीही बदलला तरीही 'जुनं ते सोनं' अशी अवस्था केवळ आखाती देशातील युद्धजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर झाल्याचे चित्र आहे. महाराष्ट्र राज्याच्या विविध...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!